औरंगाबाद विद्यापीठ आवारात अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांना पोलिसांचा चाप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शहरातील दोन वेगवगळ्या महाविद्यालयातील युवकांना सार्वजनीक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी दोन युवकांना आज बेगमपुर पोलिसांनी अटक केली. यात टीकटॉक प्रेमींची दर दिवशी नव्याने भर पडत आहे. यामुळे विद्यापीठात येणा-या प्रत्येकाला याचा नहाक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे विद्यापीठ प्रशासन डोळे झाक करत असल्याच पहायला मिळत आहे.

गाणे वाजवण्यावरुन सख्ख्या भावाला भोसकले

नागपूर प्रतिनिधी | मोबाईलवर गाणे वाजवण्यावरुन सख्ख्या भावाने दुसर्‍याला भोसकल्याची धक्कादायक घटना शनिवारी नागपूर येथे घडली. सदर घटनेमुळे प्रतापनगर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सतत मोबाइलवर गाणे वाजविण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. लहान भाऊ ऐकतच नसल्याने रागाच्या भरात मोठ्या भावाने त्याच्या पोटात चाकू भोसकला. ही घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्यीतील … Read more

औरंगाबादमध्ये पोलीस सप्ताहाचं उद्घाटन, पोलिसांच्या कामगिरीवर प्रकाशझोत

२ जानेवारी हा पोलीस स्थपना दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने पोलीस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज या सप्ताहाचे उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.

परतवाड्यात सायकल रॅली काढून नवीन वर्षाचं स्वागत; स्वस्थ आरोग्य ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन

अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथे नवीन वर्षाचं स्वागत सायकल रॅलीद्वारे करण्यात आले. यावेळी शहरातील परतवाडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सदानंद मानकर यांनी जयस्तंभ चौक ते अष्टमहासिद्धी पर्यंत पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सायकल चालवून आपले व इतरांचे आरोग्य स्वस्थ ठेवत नवीन वर्षी भरगोस सायकल चालवा असा संदेश दिला.

अमरावती शहरात तरुणाला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न, हल्लेखोर आरोपी अटकेत

अमरावती शहरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाला चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आनंदनगरात घडली. अभिजित ऊर्फ गोलू अरुण पार्डीकर असे जखमीचे नाव आहे. अरुणवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात हल्लेखोर आरोपी शंकर गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक: आसाममध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार

गुवाहाटी | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन ईशान्य भारत धुमसत आहे. बुधवारी आसाममध्ये निदर्शने होत असताना पोलिस आणि आंदोलकांतमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सांगितले की परिस्थितीवर मात करण्यासाठी डिब्रूगडमधील पोलिसांनी आंदोलकांवर रबर गोळ्या झाडल्या आणि लाठीचार्जही केला. त्याच वेळी, गुवाहाटीमधील विद्यार्थ्यांनी मुख्य जीएस मार्ग बंद केला, त्यानंतर सचिवालयाजवळ पोलिसांशी चकमकी झाल्याचे वृत्त आहे. Assam: Protest being held … Read more

पुतण्याने केला चुलत्याचा निर्घृण खून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जत तालुक्यातील जालीहाळ बुद्रुक येथे शेतजमिनीचा वादातून पुतण्यानीच चुलत्याचा दगडांनी ठेचून खून केल्याची खळबळ घटना आज उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महादेव पुजारी असे खून झालेल्या व्यक्तीच नाव आहे.

ठाण्यामध्ये १८ काँग्रेस नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे बाळासाहेब थोरातांचे आदेश

गुरुवारी झालेल्या भिवंडी महापौर निवडणुकीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी मतदान करून निवडून दिल्याने काँग्रेसचे बंडखोर इम्रानवली खान यांच्या गळ्यात उप महापौर पदाची माळ गळ्यात पडली. आता यानंतर काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी यांनी थेट ठाणे गाठत पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांच्याकडे काँग्रेस पक्षाचा बनावट व्हीप काढून तो वृत्तपत्रात जाहीर केल्याने याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणं पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला भोवलं

लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सत्ताप्पा चौगुले असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा कर्मचारी राधानगरी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेत डाटा एंट्रीच काम करतो. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रपूर जिल्हयात जुन्या वादातून तरुणानं केली ६० वर्षीय वृद्धाची हत्या

जुन्या वादातून युवकाने एका ६० वर्षीय वृद्धावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली भिवापूर वॉर्डातील माता नगरात रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जोगिंदरसिंग टाक असे मृतकाचे नाव असून अक्षय मुळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.