सोलापूरच्या महापौरांना कोरोनाची लागण 

सोलापूर । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. सोलापूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. आता सोलापूरच्या महापौर आणि त्यांच्या पतीलाही कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. या दोघा पती पत्नीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही माहिती समजताच जिल्ह्यात गोंधळ उडाला आहे. सोलापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आणखी ४० रुग्ण वाढले आहेत. अशातच या पती पत्नींना कोरोनाची लागण … Read more

परीक्षा रद्द पण बॅकलाॅग राहिलेल्यांचे काय? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं काय हा प्रश्न आता मिटला आहे. त्याबाबत परीक्षा रद्द केल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि मागील परीक्षांमधील गुंणानुसार श्रेणी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे मागील परीक्षेत विषय राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्न अद्याप शासनाने सोडविला नाही. … Read more

सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा; शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरु

मुंबई । भाषिक तत्त्वानुसार मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. या भाषेनेच राज्याला सांस्कृतिक, सामाजिक ओळख निर्माण करून दिली आहे. म्हणून या भाषेचे जतन तसेच विकास करणे ही शासनाची जबाबदारी आहे. यादृष्टीने राज्य शासनाने राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये किमान इयत्ता ८ वी पर्यंत मराठी भाषा अध्यापन व अध्ययन अनिवार्य व्हावे या दिशेने … Read more

फायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच? फैसला उद्या..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महाविद्यालयीन परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. केवळ अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. तशी माहितीही देण्यात आली होती. पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या परीक्षा रद्द कराव्यात असा विचार सुरु आहे. अंतिम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा १६ ते ३१ मेच्या दरम्यान होणार होत्या. … Read more

शाळा, महाविद्यालयं सुरु झाल्यास कसं असणार त्यांचं कामकाज? घ्या जाणून..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटकाळात शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने बैठका घेतल्या होत्या त्याचप्रमाणे या आपत्कालीन परिस्थितीत शैक्षणिक सत्राबाबत शासनाने राज्य शिक्षक परिषदेकडे काही सूचना मागितल्या होत्या. त्यानुसार परिषदेने नियोजन प्रारूप आराखडा सादर केला आहे. अशी माहिती या परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गवळे व उपाध्यक्ष मोहन ओमासे यांनी दिली आहे. हे प्रारूप तयार करण्यासाठी … Read more

दूरदर्शनवर भरणार शाळा? राज्य सरकारने केंद्राकडे मागितली वेळ

नवी दिल्ली । राज्यातील कोरोना संकट अद्याप स्थिर आहे. त्यामुळे दरवर्षी १५ जूनला सुरु होणाऱ्या शाळा यावर्षी संचारबंदीनंतर कधी सुरु करायच्या यावर शासन विचार करत होते. राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी काही दिवसापूर्वी यासंदर्भात एक आढावा बैठकही घेतली होती. या बैठकीत राज्यातील शाळा १५ जूनला सुरु होण्याची कोणतीच शक्यता वर्तविण्यात आली नव्हती. मात्र एका मुलाखतीत मुख्यमंत्री यांनी … Read more

टोळधाडीच्या वाढत्या प्रादुर्भावाने विदर्भातील शेतकरी हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण मध्ये नाकतोड्यांची टोळधाड आली होती. तिथे त्यांचे योग्य नियोजन झाले नसल्याने ते डिसेंबरमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर आले होते. आता भारतातील अनेक भागात पिकांवर संकट बनून या टोळधाडी थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण … Read more

अमरावती च्या धामणगावात २१ वर्षीय तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती च्या धामणगार रेल्वे येथे नागपूर येथून आल्यानंतर ताप आल्याने प्रथम धामणगाव,अमरावती त्यानंतर सावंगी मेघे येथे दाखल केलेल्या एका एकविस वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. शहरातील धवनेवाडी परिसरातील एक तरुणी मागील पंधरा दिवसापूर्वी नागपूर येथून आली होती. ताप खोकला असल्याने ३ मे रोजी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी … Read more

कराड-तासगाव महामार्गावरील कृष्णा पुल बनला धोकादायक; प्रशासनाचे दुर्लक्ष

कराड – तासगाव या मुख्य महामार्गावरील कार्वे गावानजीक असलेला कृष्णा पुल धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. या पुलावरील स्लॅबचा भाग सुटला असुन पुलाला देखील भगदाड पडले आहे. या पुलाच्या दोन गाळ्यांमध्ये मोठी फुट पडली असल्यामुळे पुलावरील अवजड वाहतुकीमुळे या ठिकाणी दुर्घटनेची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

रास्ता गेला खड्ड्यात !!! २५ वर्षांपासून बुलडाण्यातील गिरणी गावाची खड्डे कहाणी..

बुलढाणा प्रतिनिधी ।  महाराष्ट्रात सध्या सर्वत्र खड्डे पुराण सुरु आहे. एक वेळ शहरातील रस्त्यांची प्रशासन कशी-बशी बोळवण तरी करते मात्र ग्रामीण भागाला सावत्र वागणूक मिळते. अशीच वागणूक गेल्या २५ वर्षांपासून एका गावाला मिळत आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील गिरणी हे एक गाव. पण गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी गावाने चकचकीत रस्ता पाहिला नाही … Read more