नानार प्रकल्प होणे शक्य नाही – उद्धव ठाकरे

thumbnail 1531574359243

पुणे | सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर आदी जिल्ह्याच्या पक्ष बांधणीसंबधी उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात बैठक घेतली होती. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नाणारवर शिवसेनेची भुमिका काय? असा प्रश्न विचारला असता ‘आम्ही नानार कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही’ असे उद्धव ठाकरे यांनी जाहिर केले. ‘शिवसेना कोकणच्या माणसांना मृत्यूच्या जबड्यात लोटणार नाही’ असेही ठाकरे यावेळी म्हणाले. … Read more

विजय मल्ल्या सारखे स्मार्ट बना, मोदींच्या मंत्र्यांचा सल्ला

thumbnail 1531558210792

हैद्राबाद | विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी आसुसले असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील आदिवासी मंत्री जुएल उरांव यांनी मल्ल्याबाबत स्तुतीसुमने उधळली आहेत. हैदराबाद येथील आदिवादींच्या उद्योग सम्मेलनात बोलत असताना ‘मल्ल्या सारखे स्मार्ट बना’ असा सल्ला उरांव यांनी उपस्थितांना दिला आहे. ‘विजय मल्ल्याला बघा तो किती स्मार्ट व्यक्ती आहे. त्याने पहिल्यांदा माहिती मिळवली. नंतर बँका आणि राजकारणी यांना … Read more

राज्यसभेच्या रिक्त जागांवर लागली यांची वर्णी

thumbnail 1531558770050

नवी दिल्ली| राज्यसभेच्या रिक्त चार जागी राष्ट्रपतींनी राकेश सिन्हा, शेतकरी नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ माहापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह यांची वर्णी लावली आहे. कोण आहेत त्या चार व्यक्ती? राकेश सिन्हा हे संघ विचार धारेचे आहेत. तसेच भाजपची आणि आरएसएस ची बाजू माध्यमात समर्थपणे मांडतात. सिन्हा यांचे ‘राजकीय पत्रकारिता’ नावाचे हिंदी भाषेतील पुस्तक विशेष … Read more

सिंहगड घाटात कोसळली दरड, घाट रस्ता राहणार सहा दिवस बंद

thumbnail 1531557957716

पुणे | सिंहगडावर दरड कोसळल्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा घाट रस्ता बंद झाला आहे. आज सकाळी सततच्या पावसामुळे घाट रस्तात दरड कोसळली आहे. त्यामुळे सिंहगडावर जाणारी सर्व वाहतूक बंद झाली आहे. सतर्कतेचा मार्ग म्हणून सहा दिवस वाहतूक बंद ठेवून भविष्यात कोसळू शकेल आशा भागांची पहाणी करण्यात येणार आहे. सहा दिवसानंतर रस्ता वाहतुकी साठी खुला करण्यात येणार … Read more

तुकोबांचे आज काटेवाडीत गोल रिंगण, तर माऊलींचे लिंबाबाच्या माळावर उभे रिंगण

thumbnail 1531556575743

बारामती | वारीतील उत्कंटा वाढवणारी बाब म्हणजे रिंगण. गोल रिंगण आणि उभे रिंगण असे रिंगणाचे दोन प्रकार पडतात. दोन्ही रिंगणात घोड्यांच्या वेगवान हालचाली उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात. बारामती भागात धनगर समाज मोठया संख्येने असल्याने येथे मेंढरांच्या रिंगणांची परंपरा अनेक वर्षापासून पाळली जाते. आज तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडी मुक्कामी येणार आहे. त्यासाठी पालखी मार्गावर काटेवाडीच्या रणावरे … Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अजब कारभार, नापास विद्यार्थ्यांना केली पदवी प्रदान

thumbnail 1531556716003

औरंगाबाद | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अजब कारभाराने शिक्षण क्षेत्राला हादरा बसला आहे. मराठवाडा विद्यापीठाने चक्क दोन नापास विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली आहे. तीन अथवा चार वर्षाचे विद्यापीठाचे पदवी शिक्षण पूर्ण केल्या नंतर त्या विद्यार्थ्यास पदवी प्रदान करण्यात येते. विद्यार्थी नापास झाल्यास त्यास सर्व विषयात पास झाल्यावरच पदवी करता अर्ज करता येतो. परंतु मराठवाडा विद्यापीठाने … Read more

मुंबईच्या समुद्राला आज येणार सर्वात मोठी भरती

thumbnail 1531556156445

मुंबई | अगोदरच पावसाने झोडपून काढलेल्या मुंबईकरांच्या समस्येत आणखी एक भर पडली आहे. आज दुपारी एक वाजता समुद्राला तीव्र भरती येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. समुद्राच्या लाटा पाच मीटर येवढ्या मोठ्या उंचीवर उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमावस्येला समुद्राला भरती येत असते. काल अमावस्या होती तरीही समुद्र खवळलेल्या अवस्थेत असल्याचे समजते. कालचमुंबईच्या नरिमन पॉईंटवर … Read more

रणनितीकार प्रशांत किशोर महानिवडणुकीला राहणार भाजपाच्या तंबूत

thumbnail 1531546900478e0a5ae

टीम HELLO महाराष्ट्र | आपल्या निवडणूक नियोजन कौशल्याने देशाचे लक्ष वेधून घेतलेले प्रशांत किशोर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा सोबत राहणार आहेत. मधल्या काळात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना प्रशांत किशोर यांचे महत्व समजले आहे. म्हणून त्यांच्याशी जुळवून घेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्याची तयारी भाजपने केली आहे. २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर … Read more

२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचे बांधकाम सुरु होणार – अमित शहा

thumbnail 1531542796292

हैद्राबाद | निवडणुका जवळ आल्या की राम मंदिराचा मुद्दा नेहमीच तापू लागतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राम मंदिराच्या दृष्टीने सूचक विधान केले आहे. ‘२०१९ च्या निवडणुकी पूर्वी राम मंदिराचे बांधकाम सुरू झालेले असेल’ असे विधान करुन शहा यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. तेलंगणा राज्याच्या भाजपा एककाची संघटनात्मक बैठक घेण्यासाठी अमित शहा काल … Read more

मुंबईत अंडी डजना मागे २० रुपयांनी महागली

thumbnail 1531541182009

मुंबई | लोकसंख्येने महाकाय असणारे मुंबई शहर दररोज ३७ लाख डजन अंडी पोटात ढकलते. मात्र आता अंड्यांचा भाव वाढल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. मुंबईत बरसत असणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच त्याचा वाहतुकीवर ही परिणाम झाला आहे. परिणामी मुंबईत येणारी अंड्याची वाहने रोखली गेली आहेत. त्यामुळे ५५ रुपये डजन मिळणारी अंडी आता ७५ रुपये … Read more