धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न; मुख्यमंत्री येडियुरप्पांची हजेरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत आहे. कोरोनाचे संकट आणखी वाढू नये म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने लॉकडाउनची घोषणा केली. त्याचबरोबर लॉकडाउनच्या काळात कुणीही घराबाहेर पडू नये. गर्दीचे कार्यक्रम टाळा असं आवाहन मोदी यांनी केलं होतं. पण, भाजपा आमदारानेच लॉकडाउनच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. कळस म्हणजे तीन हजार पाहुण्यांमध्ये … Read more

खंत! आता राज्यसभेची उमेदवारी देऊन उपयोग नाही- एकनाथ खडसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाकडून एकनाथ खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सुत्रांची माहिती आहे. आपल्याला विधानसभेतच आपल्याला रस होता, आता राज्यसभेची उमेदवारी देऊन उपयोग नाही अशी तीव्र नाराजीची भावना एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा दर्शवली. गेल्या वर्षी विधानसभेसाठी भाजपने एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली नव्हती. विधानसभा लढवण्याची पूर्ण तयारी केलेल्या खडसेंनी विधानसभेसाठी आपला अर्जही … Read more

मध्यप्रदेश सरकारला कोणताही धोका नाही!- ज्योतिरादित्य सिंधिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मध्यप्रदेशात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर प्रतिक्रिया देत, आम्ही सगळे सोबत आहोत, मध्यप्रदेश सरकारला कोणताही धोका नाही असा दावा काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला आहे. “ही भाजपाची जुनी सवय आहे, पण ते यामध्ये यशस्वी होणार नाही, आम्ही सर्वजण सोबत आहोत. मध्य प्रदेश सरकारला कोणताही धोका नाही.” असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं … Read more

दिल्ली हिंसाचार: भाजपा नगरसेवकानं हिंसक जमावापासून मुस्लीम कुटुंबाचे वाचवले प्राण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालपासून हिंसाचाराच्या आगीत राजधानी दिल्ली धुमसत आहे. ईशान्य दिल्लीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये रविवारी आणि सोमवारी हिंसाचार उफाळला. त्यानंतर मंगळवारी देखील शहरातील काही भागांमध्ये दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना सुरुच आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून १५० जण जखमी झाले आहेत. हा हिंसाचार प्रामुख्यानं मुस्लिम बहुल … Read more

खासदार जयसिध्देश्‍वर स्वामींचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द; उच्च न्यायालयात मागणार दाद

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. मागील आठवड्यात त्यावर अंतिम सुनावणी झाली होती. समितीच्या सदस्यांनी कायद्याचा अभ्यास करुन दक्षता पथकाच्या अहवालाचा आधार घेतला. त्यानुसार डॉ. महास्वामी यांनी दिलेले पुरावे बनावट असल्याचे सिध्द झाल्याने हा निर्णय घेतल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले. सोलापुरातील … Read more

सरन्यायाधीशांनी भाजपाला फटकारलं; राजकारणासाठी कोर्टाचा वापर करू नका!

भाजपाचे प्रवक्ते गौरव बन्सल यांनी पश्चिम बंगालमध्ये कथितरित्या होत असलेल्या राजकीय हत्यांविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. सरन्यायाधीश बोबडे यांच्यासमोर या याचिकेवर सोमवारी सुनवाणी झाली आहे. या प्रकरणात भाजपाच्या वतीनं ज्येष्ठ वकील गौरव भाटिया बाजू मांडत होते, तर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टात उभे होते.

कोल्हापुरात संजय राऊत यांच्या विरोधात भाजपाने केलं निदर्शन

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपने जोरदार निदर्शने करत संताप व्यक्त केलाय. शिवसेनेचे संजय राऊत म्हणजे वाचाळवीर असल्याची टीका भाजपा महानगर अध्यक्षांनी केली.

‘पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’; चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे. ‘पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’ असा सज्जड दम पाटील यांनी दिला आहे. सोलापूरमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यावेळी संवाद साधताना ते बोलत होते.

पंकजा मुंडें बद्दलच्या ‘त्या’ सर्व अफवा – चंद्रकांत पाटील

भाजपा च्या मोठ्या नेत्या आणि माजी महीला बाल कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मागील काही दिवसांपासून भाजपा सोडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. पंकजा मुंडे या त्यांच्या हक्काच्या परळी मतदार संघातून विधानसभेसाठी उभ्या होत्या. मात्र त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कडून त्यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव पंकजा मुंडेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहीली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं.

कुणाचाही सरकार येऊ द्या, फक्त भाजपचे नको!- राजू शेट्टी

राज्यात अजूनही सरकार स्थापन होताना दिसत नाही आहे. मात्र, भाजपला राज्यात विरोधी बाकावर बसविण्याच्या पक्का निर्धार शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीने केला असताना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवा असं विधान केला आहे.