विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराजबाबा चव्हाण की संग्राम थोपटे ? एकंदरीतच कल काय सांगतोय त्यासाठी वाचा ही बातमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यामुळे रिक्त झालेले विधानसभा अध्यक्ष पद नेमकं जातंय कुणाकडं असा प्रश्न आता सगळ्यांनाचं पडलाय. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू झाल्या असून, हे पद कॉंग्रेसकडेच राहणार असे सांगितले जाते. शरद पवारांनी देखील या संदर्भात “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडेच राहील याला दुजोरा दिला होता. त्यामूळे काँग्रेसच्या … Read more

महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय, अशी जहरी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. चंद्रकात पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत महाविकास आघाडी … Read more

विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही ; मराठा आरक्षणावरून नरेंद्र पाटील संतापले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड:- राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप कडून सतत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही अस … Read more

मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फायलीवरील शेराच बदलला ; मंत्रालयातील घटनेने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका फायलीसोबत छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेरा दिल्यानंतर तो बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून या सगळ्याचा छडा लावण्यासाठी मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडिया’च्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

ठाकरे सरकारचा दणका ; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई … Read more

चंद्रकांत पाटलांच्या गावातच आघाडीत बिघाडी ; अजित पवार म्हणतात…

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रपणे महाविकास आघाडी सरकार चालवत असले तरी स्थानिक पातळीवर वर अशीच आघाडी आहे असं नाही. त्यातच आश्चर्य म्हणजे भाजपचे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांच्याच गावात चक्क काँग्रेस – राष्ट्रवादीने भाजपला साथ दिली असून शिवसेनेला एकाकी पाडलं आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले … Read more

हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार – केशव उपाध्ये यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे महाविकास आघाडी सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारवर घणाघात केला आहे. एकामागून अनेक ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली. उपाध्ये म्हणाले, “न्यायालयाकडून सरकारमधील विविध मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध … Read more

CMO कडून पुन्हा एकदा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर ; महाविकासआघाडीत तणाव वाढणार ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना आग्रही असताना काँग्रेसने मात्र तीव्र विरोध केला आहे. यावरून महाविकास आघाडी मध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या @CMOMaharashtra या अधिकृत ट्वीटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याने त्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असतानाच आज … Read more

प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवायला तुम्ही कशाला राज्य चालवतायत ?? प्रवीण दरेकरांचा सरकारवर प्रहार

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद नामकरण मुद्दा सध्या राज्यात जोरदार चर्चेत आहे. औरंगाबाद नामांतरावरून आघाडी मध्ये ठिणगी पडली असतानाच आता भाजपने थेट शिवसेनेवर हल्ला केला आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे बंद केलं पाहिजे. अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर … Read more

राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे ; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. एकीकडे औरंगाबादच्या नामांतरासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. त्यातच आता मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेने राज्यातील … Read more