आता तरी चंद्रकांत पाटलांनी बोलघेवडेपणा बंद करावा’ ; विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांतदादांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ‘विधान परिषदेच्या 6 जागाही जिंकू, पुणे तर एकहाती जिंकू’, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. पण पुणे तर सोडाच पण भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्यावरुन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला हाणलाय. चंद्रकांत दादांनी आता बोलघेवडेपणा बंद … Read more

चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा ; अरुण लाड यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचा गड असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाला  महाविकास आघाडीने सुरुंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. भाजप आणि मुख्यत्वे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो. दरम्यान, चंद्रकांतदादांनीच माझा विजय सोपा केला, असा टोलाही अरुण लाड यांनी विजयानंतर लगावला आहे. चंद्रकांतदादांनी माझा विजय सोपा केला. कारण … Read more

 हा तर मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास – सुप्रिया सुळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या दोन्ही मतदारसंघात भाजपला खिंडार … Read more

भाजपच्या गडाला खिंडार ; नागपूरमध्ये अभिजीत वंजारी यांचा विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी हे विजयी झाले आहेत. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे … Read more

हिंमत असेल तर एकएकटे लढा ; भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांचे महाविकास आघाडीला आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीला केलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालंय. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेला एकप्रकारे सूचक इशारा … Read more

महाविकासआघाडी विरोधात जावली भाजपाचे कुडाळ येथे आंदोलन

सातारा प्रतिनिधी | कुडाळ, ता.जावली येथील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय जनता पार्टी जावली तालुका यांचे वतीने आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांच्या नेतृत्वाखाली जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नियोजनात आज आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतेच कृषी सुधारणा विधेयक २०२० पारित करून संपूर्ण देशातील समस्त शेतकरी … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more

महाजॉब्स योजना महाविकास आघाडीची, की शिवसेना-राष्ट्रवादीची? काँग्रेस नेत्याचा सवाल

पुणे । महाविकास आघाडी सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याचं काँग्रेसने पुन्हा अधोरेखित केलं आहे. राज्य सरकारनं अलिकडेच सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेस नाराज झाली आहे. या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करताहेत, तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय- शरद पवार

पुणे । महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता, नाराजी वगैरे काहीही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करताहेत. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे’, असे नमूद करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले. शरद पवार यांची आज पुण्यात व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी … Read more

महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोधचं काय पण आंतरपाटही नाहीये; राऊतांचे फडणवीसांना उत्तर

मुंबई । भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार अंतर्विरोधानेच पडणार असल्याचं विधान केलं होतं त्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं. महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोधचं काय पण आंतरपाटही नाहीये, हे सरकार ५ वर्ष पूर्ण करेल असा विश्वास संजय राऊत यांनी आज बोलून दखवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद … Read more