मराठवाड्याच्या वाट्याला आली ६ मंत्रिपद, मंत्रीपदी यांची लागली वर्णी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याच्या वाट्याला सहा मंत्रिपद आली आहेत. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जणांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. यातील काँग्रेसकडून मोठं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच असून, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून मराठवाड्यातून अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे याना संधी देत त्यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल केलं. तसेच राष्ट्रवाडीकडून राजेश टोपे हे मंत्रिपदाची शपथ घेतलेले मराठवाड्यातील दुसरे मंत्री ठरले.

२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेचा अधिकृत शासन निर्णय आता समोर आला असून या कर्जमाफीचा फायदा २ लाख किंवा २ लाखाच्या आत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे अशाच शेतकऱ्यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २ लाखापेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी या कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या … Read more

महिला सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना ह्या सूचना

संपूर्ण देशभरात महिला अत्याचारांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यानी महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करत याबाबत पोलीस दलाला सूचना केल्या.

विधयेकाबाबत स्पष्टता आल्याशिवाय राज्यसभेत मतदान करणार नाही- मुख्यमंत्री ठाकरे

विधेयकाबाबत जोवर स्पष्टता येणार नाही, तोवर त्याला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी आता घेतली आहे.

भीमा-कोरेगाव दंगलीत हेतुपुरस्सर गुन्हे नोंदविले आहेत- धनंजय मुंडे

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे पत्र लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.