आजपासून शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा; सरकार निर्णयाला हायकोर्टात आव्हान

सोलापूर प्रतिनिधी । आजपासून (29 फेब्रुवारी) राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रकही शासनाकडून जारी करण्यात आले आहे. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवार सुटी राहणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात … Read more

‘एलबीटी’ पोटी सांगली मनपाला दिले जाणारे अनुदान सरकारने थांबवले

राज्य सरकारने ‘एलबीटी’च्या नुकसान भरपाईपोटी दिले जाणारे स्थानिक स्वराज्य संस्थाचे अनुदानही थांबवले असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे सांगली महापालिकेला एक तारखेच्या आत जमा होणारे १२ कोटी ६९ लाख रुपयाचे एलबीटीचे अनुदान दहा तारीख ओलांडली तरी न आल्याने कर्मचार्‍यांचे पगार थांबले आहेत. दरम्यान महापालिका प्रशासनाने घरपट्टी वसूलीतून देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. कर्मचार्‍यांचे पगार थकल्याने कर्जाच्या हप्त्याचे संकट निर्माण झाले आहे. सध्या ‘एलबीटी’चे अनुदान आले नाही तर महापालिकेसमोर एलबीटी कर वसुली करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती आहे.