राम मंदिरासाठी लॉकडाऊनमध्येही दानाचा प्रचंड ओघ सुरुच; जमा झाली ‘इतक्या’ कोटींची देणगी

अयोध्या । देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर सील करण्यात आल्या आहेत. सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे अद्याप बंद आहेत. परंतु या लॉकडाऊन दरम्यानही राम मंदिर बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात मोठी देणगी जमा झाली आहे. राम मंदिर बांधकामासाठी … Read more

आम्ही भाजपपासून वेगळे झालो, हिंदुत्वापासून नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान पत्रकारांनी हिंदुत्वाबाबत विचारलेल्या एका प्रश्नांला … Read more

अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा- सचिन सावंत

सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली होती. राऊत यांच्या माहितीवर सचिन सावंत यांनी काँग्रसेची भुमिका मांडत शिवसेनेला उपरोधक टोला लगावला.

अयोध्येत राम मंदिर होणार यांवर शिवसेना नेहमी ठाम राहिली -संजय राऊत

‘अयोध्येतील आंदोलनात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसैनिकांनी बलिदान दिले आहे. बाबरी मस्जिद पाडल्यावर हे काम शिवसैनिकांनी केले असेल तर ते गर्वाचे असल्याचे एकाच वाघाने म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. राम मंदिरचा मुद्दा शिवसेनेने नेहमीच जीवंत ठेवलाय. अयोध्येत राम मंदिर होणार, असे सांगत काहींनी पळ काढला. मात्र, शिवसेना ठाम राहिली.’ असे विधान संजय राऊत यांनी केले.

‘अयोध्या प्रकरणी’ आज अंतिम सुनावणी?

अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी आज (बुधवार) सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याबाबत मंगळवारी संकेत दिले. मंगळवारी अयोध्या प्रकरणी सुनावणीचा ३९ वा दिवस होता. तसंच सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद बुधवारी पूर्ण करण्याचे आदेशही काल झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंची आता ‘पंढरीची वारी’ !

Uthhav Thackray in Pandharpur

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवदर्शनाचा धडाकाच लावल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात अयोध्या दौरा करून आल्यानंतर आता ठाकरे ‘पंढरीची वारी’ करणार असल्याचे समजत आहे. येत्या २४ डिसेंबर रोजी ठाकरे विठ्ठलाच्या चरणी लीन होणार असून पंढरपूरात जाहीर सभा घेणार आहेत. मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. “राममंदिराच्या मुद्द्यावर झोपलेल्या कुंभकर्णाला … Read more