सोनिया गांधींचा शरद पवारांना फोन, सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?

विशेष प्रतिनिधी | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन एकमत नसल्याचे घडामोडींवरुन दिसत आहे. अशात आता शरद पवार यांना सोनिया गांधी यांनी फोनवर चर्चा केल्याचे समजत आहे. सोनिया गांधी यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना चर्चेसाठी पाठवले आहे. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, … Read more

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात, काँग्रेसचा ‘हा’ नेता मांडणार बाजू

मुंबई प्रतिनिधी | राज्यात सरकार स्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग आला असून राज्यपालांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. मात्र आता शिवसेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या कडून सेनेने सदर याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी … Read more

राज्यात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट, राज्यपालांची राष्ट्रपतींना शिफारस?

विशेष प्रतिनिधी | राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी चर्चा सुरु आहे. राज्यपाल यांनी राष्ट्रपतींकडे आपला अहवाल पाठवला असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात शिफारस केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. राज्यपालांनी राष्ट्रवादीला मंगळवार संध्याकाळी ८:३० … Read more

राज्याला राष्ट्रपती राजवटीमध्ये ढकलण्यासाठी प्रयत्न- संजय राऊत

राज्यात निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवडे उलटले तरी सत्तेसाठीचा दावा कोणत्याही पक्षाने केलेला नाही आहे. दरम्यान निवडणूक निकालाप्रमाणे सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले होते मात्र भाजप असमर्थ ठरले. त्यामुळे आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रित केला आहे. मात्र महत्वाची बाबा म्हणजे आता सत्तास्थापनेसाठी दिलेल्या अवधीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

राज्याला स्थिर सरकारची आवश्यकता, शरद पवारांशी माझी चर्चा – पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. भाजप मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही, शिवसेना मुख्यमंत्री मिळण्याच्या अटीवर ठाम आहे, राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसण्यावर ठाम आहे अशा परिस्थितीत काँग्रेसची भूमिका काय? हे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर आज प्रतिक्रिया दिली.

राज्यात राष्ट्रपती राजवट? अॅटर्नी जनरल व राज्यपालांच्या दरम्यान चर्चा

मुंबई प्रतिनिधी | राज्यात अद्याप कुठल्याही राजकीय पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्याच्या अॅटर्नी जनरलला राजभवनात चर्चेसाठी बोलावले आहे. अॅटर्नी जनरलच्या सल्ल्यानंतरच राज्यपाल आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र भाजपने उद्या संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यमान विधानसभेचा … Read more