अयोध्येत राममंदिरच..!! मशीद बांधण्यासाठी ५ एकर जागा मिळणार

 दिल्ली प्रतिनिधी | भारत देशात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या अयोध्या खटल्याची अंतिम सुनावणी आज सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली. वादग्रस्त जागेवर राम मंदिर बनणार असल्याचं कोर्टाच्या निकालातून सिद्ध झालं आहे. या निकालात सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच ५ एकर जागा देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई, नवनिर्वाचित सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. चंद्रचूड … Read more

खुशखबर! मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली |मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच येत्या दोन आठवड्यात याचिकाकर्ते पुन्हा याचिका सादर करू शकतात असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सादकर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या समावेशासहित असणाऱ्या त्रीसदस्यीय न्यायपीठाने हा … Read more

अयोध्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने दिली मध्यस्तीसाठी १५ ऑगस्टची मुदत

Untitled design

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या राम जन्मभूमी / बाबरी मशीद प्रकरणी मध्यस्ती करण्यासाठी तज्ञ लोकांची समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष  न्या. एफ.एम.आय. खलीफुल्ला यांनी आज आपल्या समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात  सादर केला आहे. अहवालाचे परीक्षण केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी मध्यस्तीसाठी १५ ऑगस्टची मुदत वाढ दिली आहे. मोदींच काय, भाजपचा कोणताच नेता २३ मेनंतर … Read more

राहुल गांधींवरील खटल्याची आज सुनावणी

Rahul gandhi supreem court

भिवंडी | ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच महात्मा गांधी यांची हत्या केली’ असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांनी भिवंडीतील प्रचार सभे दरम्यान केला होता. त्यावरुन राजेश खुंटे या रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाने राहुल यांच्यावर भिवंडी न्यायालयात मानहाणीचा खटला दाखल केला होता. राहूल यांनी मागील तारखे वेळी मला आरोप मान्य नाहीत असा दावा केला होता. त्यानंतर आज खटल्याची … Read more

….नाहीतर ताजमहाल उद्ध्वस्त करा – सर्वोच्च न्यायालय

thumbnail 1531312025433

दिल्ली : ‘तुम्ही ताजमहालाकडे लक्ष दिलेलं नाही. ताजमहालचं संवर्धन करण्याची तुमची इच्छाशक्तीच दिसत नाही. तुम्हाला ताजमहालाचा संभाळ करता येत नसेल तर तसं सांगा, ‘आम्ही त्याला टाळं ठोकू किंवा तुम्ही तो उद्ध्वस्त करा’ अशा कडक शब्दात आज सर्वोच्च न्यायालयाने केन्द्र सरकार व भारतीय पुरातत्व विभागाला सुनावलं आहे. ताजमहालाच्या संवर्धनाच्या संदर्भातील एका खटल्यावर सुनावणी देताना न्यायालयाने ही … Read more

समलिंगी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

thumbnail 15312232757161

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज समलिंगी प्रकरणावर सुनावणी सुरु झाली आहे.समलिंगी संबंधांना बेकायदेशीर ठरवणारे भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ रद्द करण्यात यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या गेलेल्या दोन खटल्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. याचिकाकर्त्याच्या वतीने आज बाजू मांडण्यात आली. अरविंद दातार यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली. तर सरकारच्या बाजूने तुषार मेहता यांनी … Read more

आता सर्वोच्च न्यायालयाचे थेट प्रक्षेपण

thumbnail 1531143592175

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कसे चालते आणि कोर्ट नेमके करते काय असा प्रश्न नेहमीच सर्वसामान्य लोकांना पडत असतो. या प्रश्नांची उत्तरे आता मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज आता लाइव्ह होणार आहे. न्यायालयात चालणाऱ्या कामकाजाचे आता थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. न्या.चंद्रचूड यांनी एका खटल्याचा निकाल देताना “न्यायालय हे खुले आहे” असे मत व्यक्त केले … Read more

निर्भयाच्या बलात्कार्यांना फाशीचीच, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

thumbnail 1531134303619

दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील गुन्हेगार मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकुर, पवन गुप्ता या चार आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्या.अशोक भूषण यांनी याचिका फेटाळताना असे मत मांडले की गुन्हेगारांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर तेव्हाच पुनर्विचार केला जातो जेव्हा कायद्यात काही त्रुटी असतात. कायदा अगदी सक्षम असल्याने आम्ही … Read more

मुस्लिमांना वेगळी न्यायालये, ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाची मागणी

thumbnail 1531129827280

दिल्ली : ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्ड च्या वतीने देशभर शरिया न्यायालये (दारुल कजा) उभारण्याचा घाट घातला आहे. यासाठी मुस्लिम लॉ बोर्डाची राष्ट्रीय बैठक नुकतीच पार पडली आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात अशी न्यायालये उभारण्यात येणार आहेत. मुस्लीम समाजातील कौटुंबिक कलहाचे मसले या कोर्टात सोडवले जाणार आहेत. मुस्लिम बोर्डच्या या निर्णयाला भाजपा आणि सपाचा विरोध आहे. … Read more

अयोध्या विवाद प्रकरणी १३ जुलैला न्यायालयीन सुनावणी

thumbnail 1530936800048

दिल्ली : अयोध्या विवाद प्रकरणी १३ जुलैला न्यायालयीन सुनावणी होणार आहे. याआधी १७ मे रोजी यापुढील सुनावणी उन्हाळ्याची सुट्टी संपल्या नंतर सुरू होईल असे सुनावणीदरम्यान न्यायालयाने जाहीर केले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एसए नजीर यांच्या न्यायपीठाने १७ मे रोजी हिंदू संघटनांचा युक्तिवाद ऐकला होता. आता १३ जुलै रोजी मुस्लीम पक्षकारांची … Read more