चांदोली वन्यजीव परीसरातील नरक्याच्या गोडाऊनला आग; 3 वाहने जळून खाक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वारणावती (ता. शिराळा) येथील वन्यजीव कार्यालयाच्या शेजारी असलेल्या नरक्याच्या गोडाऊनला शनिवार दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या संशयास्पद आगीत करोडो रुपयांचा जप्त केलेला नरक्या व तीन वाहने जळून खाक झाली आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी दहा वनमजूर व वनपाल गारदी यांच्यासह ग्रामस्थांनी जिवाचे रान केले. सायंकाळी सातच्या दरम्यान अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळावर दाखल झाली. … Read more

मुंबईतील ‘अविघ्न पार्क’ इमारतीला भीषण आग; सर्वत्र धुराचे लोट

mumbai fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लालबागमधील ‘अविघ्न पार्क’ इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग वीजवण्याचे प्रयत्न सुरु आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. आज सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी ही आग लागली … Read more

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओला भीषण आग

Studio

खोपोली : हॅलो महाराष्ट्र – प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये जोधा अकबर सेट जवळील फायबर मुर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे आज दुपारी १२च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये शनिवार वाड्याचा सेटसुद्धा जळाला आहे. या आगीमुळे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे करून अजून समजू … Read more

सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग

पुणे | सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी 2 नंतर ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या आहेत. दरम्यान संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोव्हिशील्ड लसीला … Read more

अमेरिकेतील लॉस एंजेलिसपासून 70 किलोमीटर अंतरावर पोहोचली आग, आभाळ झाले लाल; फोटो पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारीच्या दरम्यान कॅलिफोर्नियाच्या आगीमुळे राज्यभर मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कॅलिफोर्निया राज्याच्या राज्यपालांनी त्यास या वर्षाची सर्वात वाईट शोकांतिका असे म्हटले आहे. सीएनएनच्या अहवालानुसार, ही आग आता अमेरिकेचे महत्त्वपूर्ण शहर लॉस एंजेलिसपासून अवघ्या 70 किमी अंतरावर आहे. या अहवालानुसार राज्यात मागील महिन्यात लागलेल्या या आगीत कमीतकमी 19 लोकांचा मृत्यू झाला … Read more

उत्तराखंड येथील जंगले आगीच्या विळख्यात; अनेक दिवसांपासून आग सुरूच

वृत्तसंस्था । देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण हे एक संकट देशासमोर असतानाच आता उत्तराखंड मध्ये एक नवीनच संकट येऊन ठेपले आहे. यावर्षीच्या सुरुवातीपासून काही ठराविक अंतराने उत्तराखंडच्या विविध भागातील जंगलांमध्ये आग लागते आहे. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते आहे. त्यामुळे हळूहळू जंगले जळत आहेत. या जळणाऱ्या जंगलांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत … Read more

उत्तराखंड मध्ये जंगलाला भीषण आग 

वृत्तसंस्था । उत्तराखंड मध्ये जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पौरी गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर येथील जंगलाला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तेथील वनअधिकारी अनिता कुंवर यांनी ही माहिती दिली आहे. एकूण ५-६ हेक्टर परिसरात ही आग पसरली असून तिला विझवणे अवघड झाले आहे. त्यामुळे अधिक पथकांना बोलावण्यात आले आहे. Uttarakhand: Forest fire broke … Read more

पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात भीषण आग 

पुणे । पुणे येथील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाला बोलावण्यात आले आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली आहे. हे अद्याप समजलेले नाही. तसेच किती हानी झाली आहे याचीही माहिती मिळू शकलेली नाही. Pune: Fire broke out at a chemical factory in Kurkumbh MIDC area. Five fire tenders have … Read more

शारजाह मध्ये ४७ मजली इमारतीला भीषण आग; ७ जण घायाळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी रात्री संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह येथे भीषण आगीमुळे अपघात झाला. अल नहदा, शारजाह येथील निवासी इमारतीत भीषण आगीत सात जण जखमी झाले आहेत. खलिज टाईम्सच्या वृत्तानुसार, या सात जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले, तर इतर पाच जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात नेण्यात आले. शारजाह सिव्हिल डिफेन्सचे महासंचालक … Read more

पाचगणीत १०३ वर्ष जून्या बिलिमोरिया हायस्कूलच्या इमारतीला आग

महाबळेश्वर प्रतिनीधी | जगप्रसिद्ध दोन नंबरचे पठार शैक्षणिक केद्र पाचगणी येथील 103 वर्षाची पार्श्वभूमी असणाऱ्या बिलिमोरि या इंग्रजी माध्यम हायस्कूलला आज सकाळी दहा वाजता अचानक आग लागल्याने शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र शाळेचा पहिला मजला हा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह म्हणून वापर केला जात … Read more