नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवांनाच परवानगी

औरंगाबाद | कोरोना रुग्ण वाढीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान रात्री ८ ते सकाळी ५ यावेळेत बाहेर निघण्यास बंदी आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली आहे. मात्र या काळात नियम मोडणाऱ्या अनेक नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याने स्वत: जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले … Read more

मावशीकडे राहणाऱ्या मुलीचे अपहरण करून अत्याचार, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाळूज महानगर | १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर पुण्यात लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुध्द बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे निधन झाले असल्याने ती लहानपणापासून रांजणगाव परिसरात मावशीकडे राहात होती. तिची मावशी व काका हे दोघे १६ मार्चला कामासाठी घराबाहेर पडले होते. घरमालकाने तिच्या मावशीला … Read more

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांच्या कन्सलटिंगसाठी 10 नाही तर 2 हजार रुपये फी; मनपा प्रशासकांचे आदेश

औरंगाबाद | शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. शहरातील बहुतांश रूग्णांना खासगी रूग्णालयांतून उपचार घ्यावे लागत आहे. रूग्णांंना बाहेरून तपासण्या कराव्या लागत आहे, अशावेळी खासगी लॅबमधून चुकीचे अहवाल दिले जात असून रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नावाने होणारी रूग्णांची लूट थांबवा, असे आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय … Read more

बनावट कागदपत्रांआधारे नोकरी प्रकरण; आणखी दोघा जणांना अटक

औरंगाबाद | बनावट कागदपत्रांआधारे सरकारी नोकरी मिळविलेल्या उमेदवारांविरुद्ध तसेच कागदपत्रे हस्तगत केलेल्या १८८ जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेने रविवारी आणखी दोघांना अटक केली. निवृत्त क्रीडा उपसंचालक राजकुमार दत्तात्रय महादावाड (वय ५९) आणि क्रीडा अधिकारी भाऊराव रामदास वीर (वय ५२, रा. ताजनगर, शेवगाव जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. क्रीडा अधिकारी भाऊराव वीर आणि १५ मार्च … Read more

५ पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण, पोलीस आयुक्तालयातील नियोजित बैठक रद्द

औरंगाबाद | शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पाच  निरीक्षक कोरोनाबधित असल्याचे सोमवारी पोलीस आयुक्तांनी नियोजित केलेल्या क्राईम आढावा  बैठकीदरम्यान समोर आले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी नियोजित बैठक रद्द केली. शहरातील १७ पोलीस निरीक्षकांची कोरोना अँटीजन चाचणी सोमवारी करण्यात आली. त्यापैकी ५  पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, शहर पोलीस दलात आतापर्यंत ३९ अधिकारी आणि ३०२ … Read more

युट्युबवर आत्महत्येचे धडेघेत जावयाने सासरवाडीत संपविले जीवन…

औरंगाबाद | पत्नी मुलांना घ्यायला औरंगाबादेत सासरवाडीत आलेल्या 26 वर्षीय जावयाने आत्महत्या कशी करावी याचे युट्युब वरून धडे घेत गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज सकाळी हिमायतबाग परिसरात समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सचिन प्रकाश अहिरे वय-26 (रा.कल्याण, मुंबई) असे आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली … Read more

मार्च संपत आला तरी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार रखडले; जीएसटीची रक्कम २४ कोटींच्या घरात

औरंगाबाद | मार्च महिना संपत आला तरी राज्य सरकारकडून महापालिकेला जीएसटीची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. जीएसटीची रक्कम मिळावी, यासाठी पालिकेकडून सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. राज्य सरकारकडून महापालिकेला दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जीएसटीची रक्कम दिली जाते. सरकारकडून मिळणारी ही रक्कम २४ कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी सुमारे २१ कोटी रुपये … Read more

बोगस कागदत्रे सादर करून मिळवला जामीन, वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद |  जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करून जालना जिल्ह्यातील जामिनदाराने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी लाला चव्हाण (रा. खांबेवाडी, ता. जि. जालना) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी शिवाजी चव्हाण याच्याविरुद्ध गेल्या वषीर्पासून खटला सुरू आहे. या खटल्यातून जामीन मिळविण्यासाठी … Read more

५ हजारांची लाच घेताना दोन हवालदार एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद | न्यायालयाने लावलेली हजेरी बंद करण्यासाठी व गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांना रंगेहाथ अटक केली आहे. याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पोलीस हवालदार शेख अफसर शेख इलोमोद्दीन (वय ५२), रत्नाकर पुंडलिक बोर्डे (वय ५0) या दोघांनी गुन्ह्याच्या तपासकामी ५ हजार रूपयांची मागणी … Read more

विना मास्कविरोधात आता मनपासोबतच पोलिसांची कारवाई, विना मास्क फिरणाऱ्या 165 जणांना दंड

औरंगाबाद | महापालिकेसोबतच आता पोलिसांनाही विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्यानंतर मागील पाच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. कारवाईतील हा संथपणा पाहता मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी याबाबत सूचना केल्या. कारवाया वाढवा, जनजागृती करा, कारवाई करताना मास्कचेही वाटप करा असेही त्यांनी सर्व पोलीस निरीक्षक यांना सांगितले. दरम्यान सोमवारी विना मास्क … Read more