महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला, सरकारकडून आज दहा हजार लसींचे डोस मिळण्याची शक्यता

औरंगाबाद | महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला आहे. पालिका आता नवीन साठ्याच्या प्रतीक्षेत आहे. आज दहा हजार लशींचे डोस प्राप्त होतील, असे मानले जात आहे. सरकारच्या निर्देशानुसार शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणीची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ८५ हजार व्यक्तींचे लसीकरण महापालिकेच्या माध्यमातून झाले आहे. सरकारकडून महापालिकेला लस पुरविली जाते. पालिकेच्या माध्यमातून विविध आरोग्य केंद्रे … Read more

नागरिकांनी ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी साधला फेसबूक लाइव्हद्वारे संवाद

औरंगाबाद | मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. औरंगाबाद जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहे, ही जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोनावर कसा अटकाव आणता येईल, काय उपाययोजना कराव्या लागतील, नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे, अशा अनेक मुद्द्यावर आज फेसबूक लाइव्हमध्ये माहिती दिली. … Read more

यंदा होळी सणावर कोरोनाचे सावट, साखर गाठींच्या विक्रीवर होणार परिणाम…

औरंगाबाद | होळीच्या सणाला गाठींचे खास महत्त्व आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये गाठीची विक्री कमी होत आहे. यंदा संपूर्ण राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गाठींच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शहरातील दुकाने सध्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या गाठ्यांनी सजली आहेत. होळीपूजन गाठीशिवाय अपूर्ण असते. नवीन लग्न झाल्यावर वधूमंडळी वरास गाठीची भेट देतात. शिवाय, शेजाऱ्यांना, आप्तांनाही … Read more

नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवांनाच परवानगी

औरंगाबाद | कोरोना रुग्ण वाढीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान रात्री ८ ते सकाळी ५ यावेळेत बाहेर निघण्यास बंदी आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली आहे. मात्र या काळात नियम मोडणाऱ्या अनेक नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याने स्वत: जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले … Read more

‘लॉकडाऊन‘मध्येही होणार विद्यापीठ परीक्षा, २६, ३०, ३१ व १ एप्रिल रोजीचे विद्यापीठाचे पेपर ठरल्यावेळीच

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु आहेत, बीड जिल्हयात २६ मार्च ते ४ एप्रिल ‘लॉकडाऊन‘ आहे तथापि या काळातील सर्व पेपर संबधित महाविद्यालयात होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पदवी अव्यावसायिक अभ्यासक्रम अभ्यासक्रमांच्या … Read more

रात्रीची संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची कारवाई…

औरंगाबाद | शहरात रात्री आठनंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी वाहने थांबवून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाई करत दंड वसूल केला. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी रात्री आठनंतर विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात … Read more

शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करा, केंद्रीय अवर सचिवांनी पत्राद्वारे दिले प्रशासनाला आदेश

औरंगाबाद | केंद्र व राज्य सरकारने शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने या निधीतून शहरात निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश नुकतेच केंद्रीय अवर सचिवांनी प्रशासनाला दिले आहे. औरंगाबाद शहरातील नागरिक सुरज अजमेरा यांनी शासन निधीतून पालिकेमार्फंत शहरात … Read more

महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना घ्यावी लागणार काळजी

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्यातून राजस्थान मधील कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्यापूर्वी ७२ तासांच्या आतील  आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, उत्तर पश्चिम रेल्वेने एका पत्राद्वारे सांगितले असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. राजस्थानमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राजस्थान राज्यात जाताना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक केले आहे. कोणत्याही … Read more

दहावी- बारावीच्या विद्यार्थिनींना बुरखा घालून परीक्षा देऊ द्या, हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने केली बोर्डाकडे विनंती

औरंगाबाद | दहावी- बारावीच्या परीक्षेत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनीना बुरखा किंवा स्कार्फ घालून परीक्षा देण्याची अनुमती द्यावी, यासह आदी मागण्यांसाठी हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ औरंगाबाद  विभागीय सचिव  सुगता पुन्ने यांची भेट घेतली. हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या वतीने बोर्डाच्या सचिव पुन्ने यांच्याशी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा … Read more

दिलासादायक…! घाटी रुग्णालयातील २५ रुग्णांना पाठविले घरी

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा एकीकडे ७२ हजार पार गेला आहे. त्यामुळे चिंता जरी वाढली असली तरी दुसरीकडे बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याने दिलासा मिळाला आहे.  घाटी रुग्णालयात आज पुन्हा २५ रुग्णांना सुट्टी देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. घाटीत आज आयसीएमआरच्या नवीन नियमानुसार २५ … Read more