सहाय्यक वायरमनचा वीजेचा शॉक लागून जागीच मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील खालकरवाडी गावचे हद्दीत माळ नावचे शिवारात महावितरणच्या इलेक्ट्रॉनिक लोखंडी पोल वर काम करणाऱ्या ६० वर्षीय सहाय्यक वायरमनचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.९ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ‌‌ विष्णू रामचंद्र खालकर (वय६०) रा. खालकरवाडी ता.कराड असे शॉक लागून जागीच मृत्यू झालेल्याचे नांव आहे. सदर … Read more

विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  खांबावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या जनमित्राचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. इंद्रजित लालासाहेब थोरात (वय २४, रा. चचेगाव, ता. कराड) असे त्याचे नाव आहे. आणे येथील नांगरे वस्तीवरील शेतीपंप लाईनला बिघाड झाला होता. हा बिघाड दुरूस्ती करण्यासाठी इंद्रजितसह अन्य एक जनमित्र आणि वायरमन हे तिघेजण सोमवारी, दि. २९ सकाळी आणे … Read more

कराड तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येची शंभरी पार , तर शहरात 52 रुग्ण कोरोनाच्या विळख्यात

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. शनिवारीही कोरोनाबाधितांच्यात वाढ झाली. कराड शहरात शनिवारी चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरातील रुग्ण संख्या ५२ झाली असून तालुक्याची रुग्णसंख्या 101 इतकी झाली आहे. पालिका प्रशासनाच्या विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना कराडकरांना केलेल्या आहेत. कराड शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. अशात … Read more

अजितदादांच्या सभेला कोविडचा नियम नाही मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नियम : राजू शेट्टी

raju shettty ajitdada

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे. आम्हांला कोविडचा नियम अन्‌ परवा पंढरपूरला अजितदादांची सभा झाली, त्याला कोविडचा नियम नाही. जनरल मिटिंग होणार त्याला कोविडचा नियम नाही. आम्ही आम्हांला कोविडचा नियम, आम्हांला जमावबंदी. आम्ही काय गुन्हा केला आहे. कराडला येताना आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच काय कारण होतं. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा … Read more

कारखान्यांची आरआरसी केली नाही तर “धमाका” करणार ; राजू शेट्टी यांचा इशारा

raju shetty 1

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ज्या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही, त्यांची आरआरसी करायला आम्ही तयार आहोत, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ५ एप्रिल पर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही. तर यापूर्वी झाला नाही, असा धमाका गनिमीकाव्याने करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज कराड येथे … Read more

सहकारमंत्र्यांच्या सह्याद्रीवर धरणे धरण्यास जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी रक्कम अद्याप दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर गुरुवार (दि.२५) आजपासून धरणे आंदोलन करण्यासाठी निघालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांच्या शाब्दिक वादावादी झाली. राजू शेट्टी यांनी राज्याचे सहकार मंत्री आपल्या कारखान्याचे … Read more

महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

shambhuraj desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात शासकीय आकडेवारीनुसार गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहीती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी पोलिसांच्या कामांची माहीती आकडेवारीनिहाय त्यांनी पत्रकारांना दिली. राज्यात हुंडाबळीचे गुन्हे २, आत्महत्येस प्रवृत्त करणे १०७, ॲसिड हल्ले २, … Read more

विरोधकांनी स्वत:च्या सत्तेच्या काळात कारखान्यात काय दिवे लावले? : डॉ. अतुलबाबा भोसले

Atul baba

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  कराड:- कृष्णा कारखान्याच्या सत्तेसाठी जे विरोधक आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, त्यांनी स्वत:च्या सत्तेच्या काळात कारखान्यात काय दिवे लावले?, असा सवाल कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला. वारुंजी व पार्ले येथील कृष्णा कारखाना सभासद संपर्क बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे … Read more

पाटण तालुक्यातून स्फोटकांचा मोठा साठा पोलिसांनी केला हस्तगत

 कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी नवारस्ता (ता. पाटण) येथील डोंगरालगत अवैधरीत्या सुरू असलेल्या दगड खाणी (क्रशर) वर पाटणचे तहसिलदार योगेश्‍वर टोंपे यांनी बुधवारी अचानक कारवाई करून दोन्ही खाणी सिल केल्या आहेत. या ठिकाणी स्फोटकांचा मोठा साठा पाटण पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी एकजणास ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पाटण पोलिसांनी … Read more

नगराध्यक्षा व भाजपचे नगसेवक टक्केवारीच्या मानसिकतेत ; नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांचा हल्लाबोल

 कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड, (प्रतिनिधी)- अर्थसंकल्पातील अनेक गोष्टीत बदल होतो आहे. त्या गोष्टीही नगराध्यक्षांसह त्यांच्या सहकाऱ्यांना खटकल्याने त्यांनी गोंधळ घातला आहे असा आरोप करत नगराध्यक्षा व त्यांचे नगसेवक टक्केवारीच्या मानसिकतेत असल्याने कराडच्या विकासाचा खोळंबा झाला आहे असा हल्लाबोल जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी केला पत्रकार परिषदेत केला. श्री. यादव म्हणाले, अर्थसंकल्पीय सभेत … Read more