सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शरद पवार यांनी मानले आभार; ‘महाविकासआघाडी’ तर्फेही स्वागत

मुंबई प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयाचे महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. आज असलेल्या संविधान दिनाच्या दिवशी न्यायालयाच्या या निर्णयाने लोकशाहीचा व भारतीय संविधानाचा विजय झाला अशी प्रतिकिया महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. शरद पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले व पुढील शब्दात न्यायालयाचे आभार देखील मानले, “राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची … Read more

सुप्रीम कोर्ट निकाल । महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणीचे आदेश; गुप्त मतदान नको

दिल्ली प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान करणारी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तापेच सोडविण्यासाठी उद्याच बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. यामुळे फडणवीस सरकार यांची उद्या अग्निपरीक्षाच असेल असे म्हणावे लागेल. या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेत उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी … Read more

बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट; सत्तास्थापनेच्या दृष्टीने खलबत सुरु

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचले आहेत. आगामी राजकीय समिकरणांच्या दृष्टीने थोरात पवार भेटीला अधिक महत्व प्राप्त झालंय.

राज्यात आम आदमी पक्षाला नोटापेक्षाही कमी

दिल्लीत सत्ता गाजवणाऱ्या आम आदमी पक्षाला राज्यात अजूनही अस्तित्व तयार करता आले नाही आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठी निराशा हाती आली आहे. दिल्लीची सत्ता असणाऱ्या आपला राज्यात केवळ ०.१ टक्के मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे राज्यात नोटाला १.३५ टक्के मिळाली आहेत.

अमित शहा यांनी केली उद्धव ठाकरेंशी ‘फोन पे चर्चा’; लवकरच होणार दोघांत बैठक

विधानसभा निकालात सर्वात जास्त जागा मिळवत भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेचा तिढा अजून कायम आहे. सध्या शिवसेना ५६ तर भाजप १०५ जागा मर्यादित राहिली आहे. मात्र राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. त्यामुळे शिवसेना नेमके कोणासोबत सरकार स्थापन करणार हा मोठा प्रश्न सध्या चर्चेत आहे. अशा परिस्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोन जरी शुभेच्छा देण्यापुरता नसून सत्तास्थापनेच्या व्यवहारासाठी झालेला आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.

वंचित बहुजन आघाडीने ‘यांच्या’ २३ जागा पाडल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन या दोन पक्षांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी हा वेगळा प्रयत्न राज्यात राबविताना समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांना प्राधान्य देण्याचा विचार केला. दलित आणि मुस्लिम मतांचा विचार यामध्ये प्रामुख्याने करण्यात आला होता.

संजय राऊतांनी शेअर केले भाजपाला डिवचणारे व्यंगचित्र

काल जाहीर झालेल्या विधानसभा निवडणु निकालात शिवसेना-भाजपाच्या महायुतीने मोठे यश मिळवले. असे असले तरी सुद्धा ‘आघाडी’ने सर्वांना जोरदार धक्का दिला आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. महायुतीची अब कि बार २२० पार ची घोषणा हवेत विरली असून, भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागांवर मर्यादित राहावे लागले. त्यामुळे शिवसेनेनंही मुख्यमंत्रिपदासाठी भाजपावर आतापासूनच दबाव टाकण्यास सुरुवात केले आहे.

सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने ‘बाळासाहेब ठाकरे’ स्टाईलने विचार करावा- बाळासाहेब थोरात

‘आता शिवसेनेने ठरवायचे आहे की त्यांनी भाजपच्या किती दबावाखाली राहायचे, काँग्रेसकडे शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव आल्यास आम्ही केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेऊ’ असं महत्त्वपूर्ण विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं.

या ६ कार्यकर्त्यांनी हिरावला भाजप-सेना युतीचा महाजनादेश

विशेष प्रतिनिधी । साधारणतः लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी सेना-भाजपच्या वाटेवर जायला सुरुवात केली होती. आर्थिक घोळ केलेल्या नेत्यांना आपापल्या संस्था आणि जागा वाचवण्यासाठी हे पक्षांतर करावं लागल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यामध्ये प्रामुख्याने गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर, रश्मी बागल, मधुकर पिचड, वैभव पिचड, उदयनराजे भोसले, दिलीप सोपल, शेखर गोरे, गोपीचंद पडळकर, … Read more

‘या’ मतदारसंघात निवडून येण्यासाठी अपक्षच असावं लागतं

महाराष्ट्रा बरोबरच हरियाणा राज्याचे विधानसभा काल जाहीर झाले. निवडणुकांचे जाहीर प्रत्येक निकालात आश्चर्यकारक असे काही निकाल लागत असतात. हरियाणात असाच एक मतदारसंघ आहे पंडुरी जेथे कायम अपक्ष उमेदवार निवडून येतो. पंडुरी विधानसभा मतदारसंघ हरियाणातील कैथल जिल्ह्यातंर्गत येतो.