जिल्हा प्रशासन अन् स्थानिक लोकप्रतिनिधी रत्नागिरीचा सत्यानाश करतायत – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। माजी खासदार निलेश राणे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून ते नेहमी कार्यरत असतात. कोकणात सध्या कोरोना सोबत नुकत्याच येऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासन व स्थानिक लोप्रतिनिधींनी रत्नागिरी जिल्ह्याचा सत्यानाश करतायेत असा आरोप करत कोकण आयुक्ताना पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून … Read more

मुख्यमंत्री मातोश्रीला का राहतात? कोरोना संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ‘कोरोनाच्या संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात?’ असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.  यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरेंनी जो काही राग आहे, तो आमच्यावर काढावा. … Read more

देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘हे’ आहे कारण

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ५.३० वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात या दोघांची भेट होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मागचे २ दिवस निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकण दौऱ्यावर होते. यानंतर आता निसर्ग चक्रीवादळाबाबत भाजपच्या मागण्यांचं निवेदन भाजप मुख्यमंत्र्याना देणार आहे. कोरोनावरील सर्वपक्षीय बैठकीनंतर … Read more

‘निसर्गग्रस्त’ कोकण वासियांच्या मदतीसाठी शरद पवारांनी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

रत्नागिरी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणचा दोन दिवसीय पाहाणी दौरा केला. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरांसह, आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचं, शेतीचं अतिशय नुकसान झालं आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा, असं शरद पवार यांनी पाहाणी दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितलं … Read more

निसर्गग्रस्तांना NDRFच्या नियमापेक्षा जास्त मदत देणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई । निसर्ग चक्रीवादळाने राज्यात मोठे नुकसान झाले.चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. घरांची मोठी पडझड झाली असून वृक्षही कोसळून पडलेत. शेतीच्या नुकसानासोबतच महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळांचे ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जास्तीची मदत करणार असल्याचा निर्णय राज्य … Read more

किरकोळ कार्यकर्त्यांसारखे राजनाथ सिंग टीव्हीवर टीका करतायत – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांना उत्तर दिले आहे. आणि अशा पद्धतीने स्वतःचे काम करण्यास अपयशी ठरल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी छोट्या राजकीय कार्यकर्त्यांसारखी टीका करणे … Read more

म्हणुन फडणवीसांनी मानले शिवसेनेचे आभार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात अभिनेता सोनू सूद याने स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी गाड्यांची उपलब्धता करून दिली होती. यानंतर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सोनू सूदचा भाजपने प्यादा म्हणून वापर करून त्याला समाजसेवकाचा मुखवटा लावला’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला उत्तर … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळ नुकसान पाहणीसाठी शरद पवार उद्यापासून २ दिवस कोकण दौऱ्यावर

मुंबई । ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शरद पवार हे २ दिवस कोकण दौरा करणार आहेत. आपल्या कोकण दौऱ्यात शरद पवार रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

‘या’ तारखेला मुंबईत मान्सून होणार दाखल

मुंबई । नुकत्याच होऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सून उशिरा येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु १ जूनला मान्सून केरळ मध्ये अगदी नियोजित वेळेत पोहोचला होता. तसेच तो तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांपर्यंतही सहज पोहोचला होता. त्यामुळे आधी अंदाज वर्तविण्यात आलेल्या वेळेत अर्थात पुढील दोन तीन दिवसात मान्सून मुंबई मध्ये दाखल होईल असे … Read more

निसर्गग्रस्तांना १०० कोटींची मदत तुटपुंजी; राज्य सरकारने ७५ टक्के नुकसान भरपाई द्यावी- फडणवीस

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज फेसबुकद्वारे पत्रकार परिषद घेऊन चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना अधिक मदत करण्याची मागणी केली. राज्य सरकारने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगडला १०० कोटींची केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी असून नुकसानग्रस्तांना नुकसानाच्या ७५ टक्के मदत जाहीर करावी, असं ते म्हणाले. चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. … Read more