छत्रपतींच्या पादुका घेऊन येणाऱ्या ‘त्या’ शिवभक्तांवर गुन्हा दाखल; पंढरपुरात येणं पडलं महागात 

सोलापूर प्रतिनिधी । आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलभक्तांचा जणू स्नेह मेळावाच असतो. वारीसोबत विठ्ठलाला भेटण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. मात्र यावर्षी वारी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र मानाच्या पालख्या वाहनातून नेण्यात येणार होत्या. अशावेळी विनापरवाना सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील शिरशी येथील संदीप महादेवराव महिंद्र, योगेश उत्तमराव महिंद्र, तसेच पंढरपूर येथील किरण घाडगे हे पंढरपूर … Read more

छत्रपती शिवरायांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला; 22 दिवस पायी चालत गाठले पंढरपूर

सोलापूर प्रतिनिधी | रायगड किल्ल्यावरुन निघालेली छत्रपती शिवरायांची पालखी आज श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात दाखल झालीय. रायगडावरुन २२ दिवस पायी चालत या पालखीने पंढरपूर गाठले. या पालखीचे हे सातवे वर्ष आहे. भक्ती सोहळ्यामध्ये हा शक्तीचा सोहळा यांचा संगम झालाय. विशेष म्हणजे या पालखीला शासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. मात्र छत्रपतींच्या गनीमी काव्याने हे पाच मावळे … Read more

संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हेलिकॅप्टरने पंढरपुरात न्याव्यात – राम सातपुते 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढी एकादशी काहीच दिवसांवर आली आहे. यावर्षी पायी वारी रद्द करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मानाच्या पालख्या हेलिकॅप्टर अथवा विमानातून नेता येतील का याची चाचपणी सुरु असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. तर आषाढी एकादशी दिवशी संत भेटीची परंपरा अबाधित ठेवीत मानाच्या पालख्या … Read more

प्रतिपंढरपूर करहरमध्ये आषाढीचे धार्मिक विधी करून मंदिर बंद केले जाणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शासनाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव अर्थात वारी रद्द केली आहे. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीला धार्मिक विधी केले जाणार आहेत. तसेच मानाच्या पालख्या या वाहनातून आणल्या जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. यावेळेला सातारा येथील करहर हे प्रति पंढरपूर मानले जाते. येथेही नागरिकांनी दर्शनासाठी … Read more

कायद्याच्या चौकटीत राहून गोंदवल्यात ‘असा’ रंगला दिंडी सोहळा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री ब्रम्हचैतन्य महाराजांचे कुलदैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी आहेत. म्हणून गोंदवल्याच्या पायी दिंडीला विशेष महत्व आहे. ही परंपरा याआधी कधीच खंडित झालेली नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदीमुळे यात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. गोंदवल्यातील श्रींचे समाधी मंदिर अद्याप बंदच असले तरी आषाढी पायी वारीची परंपरा न मोडता शासनाच्या नियमांचे पालन … Read more

घरी बसून ‘अशी’ करा आषाढी वारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक उत्सव म्हणजे वारी होय. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठुरायाचे भक्त त्याच्या भेटीच्या ओढीने त्याला भेटायला पायी जातात. कोणताच भेदभाव न ठेवता समानतेचे, एकतेचे आणि बंधुतेचे सूत्र जपत एकमेकांना सहकार्य करत भाविक आपल्या माऊलीला भेटायला जात असतात. गेली अनेक वर्षे ही वारीची परंपरा सुरु असल्याचे सांगितले जाते. १३ व्या … Read more

वारीतील मानाच्या सात पालख्यांबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव सोहळा म्हणून पंढरीची वारी जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टाळ मृदूंगाच्या तालावर संतांच्या पालख्यांसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक  पंढरपूरला पायी जातात. यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे पंढरीची ही पायी वारी होणार नाही आहे. सरकारने कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे … Read more

वारीचे सांस्कृतिक महत्व काय? जाणुन घ्या ‘या’ काही विशेष गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची संपन्न परंपरा आहे. संतांचा इतिहास आहे. पंढरपूरच्या विठुरायाला आपला परमेश्वर मानून त्याच्या भेटीच्या ओढीने त्याचे भक्त पायी पंढरपूरला जात असतात. या वारीचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे लहानथोर, उच्च नीच असा काहीच प्रकार पाहायला मिळत नाही. सारेच भजन, कीर्तनात डांग होऊन आपल्या विठुरायाला भेटायला पायी जात असतात. साधारण १३ व्या शतकात सुरु … Read more

माघी यात्रेसाठी पंढरपूरात लाखो भाविक दाखल; कोरोना व्हायरस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूरात माघी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल होऊ लागले आहेत. अशातच कोरोना व्हायरसचे सावट निर्माण झाले आहे. वारी काळात कोरोना व्हायरस पसरू नये. यासाठी उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात दहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रूग्णासाठी मोफत तपासणी आणि औषधोपचार ही केले जाणार आहेत. यामध्ये स्वतंत्र वैद्यकीय अधिकार्यासह पाच … Read more

आमदार भालकेंच्या घरी मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार अन् काँग्रेसच्या काळजाचा चुकला ठोका

पंढरपूर प्रतिनिधी | आमदार भारत भालके यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांचा पाहुणचार घेतल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. आमदार भारत भालके भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला आता या प्रसंगामुळे अधिकच जोर चढणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारत भालके यांचा विठ्ठल … Read more