देशातील या पाच राज्यांत निवडणुका जाहीर; जाणुन घ्या तारखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगाल, आसामसह तमिळनाडू, केरळ या राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात येत्या काही दिवसातच निवडणुका होणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली आहे. आज निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्यामुळे या राज्यांमधील निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची प्रतिक्षा संपलीय. … Read more

अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी बिगबॉस सिझन २ मध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे अभिजित बिचुकले होय. बिगबॉस च्या घरात जाण्यापासून ते चर्चेत आलेच मात्र त्याआधीही त्यांच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या जोशामुळे आणि आपण मुख्यमंत्री होणार या आत्मविश्वासामुळे ते चर्चेत होतेच. बिगबॉसच्या घरातही ते अनेकविध कारणांनी वादातीत राहिले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे खूब मनोरंजन ही केले. त्यानंतर … Read more

वंचित च्या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई । अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून राजीनामा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हा रीतसर पक्ष प्रवेश झाला आहे. मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असतानाच हे राजकीय वादळ ही … Read more

ज्येष्ठांना डावलून ‘या’ तरुण चेहर्‍यांना मिळणार मंत्रीपद, पहा संभाव्य मंत्र्यांची यादी

मुंबई | उद्या 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. शिवसेनेच्या खात्यातून बच्चू कडू यांना मंत्रिपद दिले जाईल. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेल्या अदिती तटकरे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी निश्चित समजली जाते. … Read more

सोलापूर मधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदान व्यवस्थित पार पडत आहे, तसेच नागरिकही मोठ्या उत्साहात मतदानाला जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु सोलापूर मधील सूतगिरणी परिसरात राहणाऱ्या सुमारे १ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधीना मतदान करूनही आपल्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत म्हणून हे पाऊल उचललं असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

ठाण्यातील १८ विधानसभा मतदार संघातील ९०० कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा?

वारंवार सुचना, पत्रव्यवहार करुनही विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणार्‍या ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातील तब्बल ९०० कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रथम प्रशिक्षण वर्गास हजर राहून दुसऱ्या प्रशिक्षणवर्गास गैरहजर राहणाऱ्या सदर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरु झाली आहे.

पालघर जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार, ५० कार्यकर्त्यांनी ठोकला पक्षाला रामराम

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सेना युती होणार की नाही या संदर्भात अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता, पण अखेर युती झाली. पुढे तिकीट वाटपातही आयारामांना झुकत माप देत निष्ठावंताना डावलण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या त्यामुळे शिवसैनिक चांगलेच नाराज झाले आहेत. याच नाराजीतून मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना डहाणू तालुक्यात ५० प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला आहे. तेव्हा ऐन मतदानापूर्वी कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे शिवेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातं आहे.

महाराष्ट्रात शत्रुघ्न सिन्हा करणार विरोधकांना ‘खामोश’

एकेकाळी भाजपची स्टार शॉटगन असणारे शत्रुघ्न सिन्हा आता काँग्रेसच्या बाजूने विरोधकांना खामोश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचाराच्या राजकीय शिमग्यात विरोधाकांना प्रचारात नामोहरम करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हांच्या रूपाने काँग्रेसला त्याच्यासाठी नवा चेहरा मिळाला आहे.

जागावाटपात ‘स्वाभिमानी’ला ५ जागा, शिरोळमधून राजू शेट्टी की सावकार मादनाईक?

कोल्हापूर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळसह राज्यातील पाच जागा मिळाल्या आहेत. यामुळे इच्छुकांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल सुरू झाली आहे. शिरोळ मधून सावकर मादनाईकांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांचा दबाव वाढला तर ऐन वेळी स्वाभिमानीचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची … Read more

सांगली जिल्ह्यात भाजप-सेना युतीच्या संभ्रमाने वाढली चिंता

सांगली प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे, जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची भाजप आणि शिवसेनेकडून तयारी सुरु आहे. मात्र युती झाल्यास सेनेने जिल्ह्यातील विधानसभेच्या वाट्याच्या चारही जागा ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इस्लामपूर, पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ या तिन्ही विधानसभेच्या जागा भाजपने लढविण्याचा निर्धार करीत रणनिती … Read more