निधी खर्च करण्यात सुद्धा ठाकरे सरकार अकार्यक्षम; अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जीएसटी चे पैसे मिळत नसल्याचे रडगाणे गाऊन प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाच्या महामारीत तरी अधिक कार्यक्षमता दाखवत नियोजनबद्ध विकासकामे करण्याची आवश्यकता होती, परंतु २०२० – २१ या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात नमूद एकूण तरतुदीपैकी केवळ ४५ टक्के निधी खर्च केला असून त्यातही धक्कादायक बाब म्हणजे एकूण वितरीत निधीच्या केवळ … Read more

प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली. गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेलगत बसलेले आहेत.हे मोदींना दिसतं नाहीये का ? आणि वर हे महाशय त्यांना त्रास देत आहेत तसेच त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.२१५ … Read more

पेरलेले सोयाबीन उगवले नाही ; शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे खरीप हंगामात शेतात मोठ्या कष्टाने पेरलेले सोयाबिन पीक उगवले नसल्याने आता दुबार पेरणी कशी करावी या प्रश्नाने उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाथरी तालुक्यातील मर्डसगाव येथे शुक्रवार २६ जून रोजी घडली आहे. तालुक्यातील मर्डसगाव येथील तरुण शेतकरी विष्णु उद्धवराव शिंदे वय ३४ असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव … Read more

सावकारीच्या जाचातून शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील संजय कदम या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहा शेजारी शेतीच्या औषधाची बाटली आढळून आली होती. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली होती. संजय कदम यांची पत्नी जयश्री कदम यांनी माझे पती सावकारीच्या जाचातून त्यांनी औषारी औषध प्राशन करून आत्महत्या … Read more

सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली प्रतिनिधी ।  कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील ३६ वर्षीय शेतक-याने सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. गणेश रामराव चव्हाण असं शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या आत्महत्येनंतर गावावर शोककळा पसरली. मयत चव्हाण अल्पभूधारक शेतकरी होते. मागील तीन वर्षापासून शेतात नापिकीच सुरू होती. त्यातच मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसानं शेतात लागवड केलेले सोयाबीन पिकाचे नुकसान … Read more

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी पुत्रानं विषारी औषध पिऊन संपवलं जीवन

यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका तरुण शेतकरी पुत्रानं काल रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागोराव वामन खोके (२८) असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे. काल घरच्या मंडळींना शेतात जाऊन येतो असे सांगून नागोराव घरातून निघाला होता. संध्याकाळ होऊन तो घरी न परतल्याने … Read more

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, एनसीआरबीच्या अहवालात समोर आली बाब

सरकारी धोरण आणि निसर्गाच्या लहरी कचाट्यात सापडून देशात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच आहे. शेतमालाला मिळणारा अनियमित भाव आणि दुष्काळ यातून देशातील शेतकरी आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतच आहे. याचा पुरावाच नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राइम ब्युरो रेकोर्ड्सच्या अहवालाने दिला आहे. या अहवालानुसार देशात सन २०१८ मध्ये देशभरात १० हजार ३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात दुर्दैवाची बाब म्हणजे या अहवालातून महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे.

शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार – रघुनाथदादा पाटील

सोलापूर प्रतिनिधी । शरद पवार जसे चांगल्या कामाचे श्रेय घेतात तसेच अपयशाची जबाबदारी घेणेही गरजेचे असल्याचं मत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलं आहे. चांगल्या कामाचे श्रेय आम्ही त्यांना देवू मात्र शेतकरी आत्महत्यांचीही जबाबदारी त्यांनी स्विकारावी असं पाटील म्हणाले आहेत. पुढे बोलताना पंडित जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी शेतकरी विरोधी धोरणे राबविल्याची टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले कि, शेतकरी कर्जबाजारी होण्याचं मुख्य कारण हे शेतमालाला न मिळणार भाव आहे. अमी कारण म्हणजे याबाबतच सरकारी धोरण. जोपर्यंत सरकार शेतमालाच्या भावाबाबत धोरण बदलत नाही शेतकरी विरोधी कायद्यात बदल करणार नाही तोपर्यंत शेतकरी कर्जबाजारी राहणार आहे. राज्यात नवीन सरकार आलं असलं तरी केवळ चेहरे बदलले आहेत सरकार तेच आहे. तरी सुद्धा यासरकाराला शेतकरी धोरणात बदल करण्यासाठी भाग पडण्याची भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली आहे. रघुनाथ पाटील यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेचा अधिकृत शासन निर्णय आता समोर आला असून या कर्जमाफीचा फायदा २ लाख किंवा २ लाखाच्या आत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे अशाच शेतकऱ्यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २ लाखापेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी या कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या … Read more

संपूर्ण कर्जमाफी सोबत शेतकऱ्यांना हेक्टरी लाख रुपये द्या – राजू शेट्टी

परभणी प्रतिनिधी । राज्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसानंतर झालेल्या प्रचंड नुकसानी नंतर उभे करण्यासाठी संपूर्ण कर्ज माफी आणि हेक्‍टरी लाख रुपयांचे अनुदान देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी परभणी मध्ये केली आहे. परभणी येथे आयोजित मोर्चासाठी शेट्टी गुरुवारी आले असता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी केली आहे. ‘केंद्र सरकारकडून राज्याला सापत्न वागणूक मिळत … Read more