पठ्ठ्यांनी थेट JCB नेच फोडले ATM; मशिनमध्ये 27 लाख रोख रक्कम (Video)

सांगली | आरग ( तालुका मिरज ) येथे जेसीबीच्या सहाय्याने ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा अजब प्रकार घडला आहे. त्यामुळे गावात मोठी खळबळ माजली. ही घटना शनिवारी मध्य रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. सदर एटीएम मध्ये 27 लाखांची रोख रक्कम रोकड होती. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. मध्य रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. एटीएम च्या … Read more

खाजगी सावकारीसह खंडणीचा गुन्हा; गुंड छोट्या बाबरला महिला पोलिसाचीही साथ

सांगली | सांगलीतील गावभाग मध्ये राहणार्‍या एका तरुणाने व्याजाने घेतलेले 1 लाख रुपये व्याजासह 2 लाख 7 हजार रुपये देऊनही अधिकचे चार लाख रुपये देण्यासाठी चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी गुंड छोट्या बाबरसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका महिला पोलिसाचा देखील … Read more

काँग्रेस, भाजपच्या महिला नगरसेवकांनी पळवला महापौरांचा राजदंड; तुफान राडा पहाच

सांगली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर सांगली महानगरपालिकेची महासभा ऑफलाईन घेण्यात आली होती. या महासभेत मागील ऑनलाइन महासभेत आलेल्या विषयाच्या मंजुरीवरून जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी सभा सुरू होताच दफन भूमीच्या पॉईंट ऑफ ऑर्डरवरून जोरदार गदारोळ घालण्यास सुरवात केली. या गदरोळातच महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विषयाला मंजुरी दिला. यावेळी … Read more

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक : अध्यक्ष- उपाध्यक्ष पदासाठी ‘ही’ नावं जवळजवळ निश्चित

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची अधिसूचना सोमवारी निघाली. 6 डिसेंबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होईल. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शिराळ्याचे आ. मानसिंगराव नाईक आणि उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या जयश्रीताई पाटील यांची नावे जवळजवळ निश्चित झाल्याचे समजते. मात्र यासाठी पुन्हा एकदा महाआघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकीच्या फेर्‍या होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली गतीमान होणार असल्याचे स्पष्ट झाले. महाआघाडीचे … Read more

सिगरेट आणायला उशीर झाल्यानं मित्रांनीच काढला मित्राचा काटा; मृतदेहाचे तुकडे केले अन्…

murder

सांगली : हॅलो महाराष्ट्र – मिरज तालुक्यातील भोसे या ठिकाणी मित्रांनीच मित्राची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कूपनलिकेत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृताचे नाव दत्ता झांबरे असे आहे. हि घटना २७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीच्या अमोल खामकर आणि सागर सावंत या दोन मित्रांना अटक केली आहे. मिरज ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा … Read more

धक्कादायक ! प्रेमप्रकरणातून तरुणीची विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या

Sucide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज याठिकाणी एका 20 वर्षीय नर्सनं विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. हि तरुणी एका खाजगी रुग्णालयात परिसचारिका म्हणून कार्यरत होती. दरम्यान मंगळवारी सायंकाळी तिने विषारी इंजेक्शन घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. या नर्सने प्रेमप्रकरणात ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पोलिसांना घटनास्थळी सुसाइड … Read more

महिलेच्या गळ्यातील सोने चोरणे पडले महागात, गावकऱ्यांनी दिली ‘हि’ भयंकर शिक्षा

crime

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी एका चोराला जमावाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. संबंधित चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर तो पळून जात असताना गावातील लोकांनी पाठलाग करत त्याला पकडले. यानंतर गावातील संतप्त जमावाने चोरट्याचे हात … Read more

चिकन विक्रेत्याच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार; सांगलीमधील घटना

Rape

मिरज : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. असे असले तरी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सतत निर्माण होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना सांगलीतील मिरज याठिकाणी घडली आहे. यामध्ये एका 25 वर्षीय तरुणाने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपी युवकाने पीडित मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून अन् गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार … Read more

शेतमजुराची धारदार शस्त्राने वार करून हत्या, सांगलीमधील घटना

murder

सांगली : हॅलो महाराष्ट्र – कडेगांव तालुक्यातील तडसर या गावात धनाजी भीमराव कोळी या शेतमजुराची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. हि घटना बुधवारी दुपारी घडली आहे. या प्रकरणातील आरोपी अजून फरार आहे. त्याबाबत चिंचणी- वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण कुंडलमधील शेतमजूर धनाजी कोळी हे तडसर या … Read more

धक्कादायक ! महिलेचा 2 चिमुकल्यासह आत्महत्येचा प्रयत्न

River Death

जत : हॅलो महाराष्ट्र – सांगलीमधील जत या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने रागाच्या भरात आपल्या 2 चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. यामध्ये 2 चिमुकल्याचा मृत्यू झाला असून महिला मात्र बचावली आहे. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास खैराव या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने लोणार परिसरात … Read more