वाकड्या पुलावर क्षेत्रमाहुलीच्या युवकाचा अपघातात जागीच मृ्त्यू

कोरेगाव | वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्रुक येथे वाकड्या पुलावर संरक्षण कठाडे नसल्याने मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुलावरून खाली गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथील युवक लखन राजगे (वय- 27) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लखन राजगे हा वाठार स्टेशनवरून पिंपोडे बुद्रुकच्या दिशेने हिरोहोंडा स्प्लेनडर या दुचाकीवरून क्रमांक … Read more

थरारक ! सिल्लोड जवळ फिल्मी स्टाईल अपघात; एक ठार

accident

औरंगाबाद – सिल्लोड शहरात मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे दाक्षिणात्य फिल्मी स्टाईलने झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये वाहनाने तीन, चार पलट्या घेत रस्त्याच्या कडेला ते फेकले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिल्लोड शहरालगत असलेल्या भराडी फाटा येथून शहरात … Read more

साताऱ्यात टेम्पो- दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार

सातारा |  शहरातील गुरुवार बागेजवळ पिकअप टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारील युवकाचा जागीच मृत्यू झाला.  शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास झाला हा अपघात झाला. या अपघातात विनायक संपतराव साळुंखे (वय – 35 वर्षे रा. पिलानीवाडी, ता. सातारा) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, विनायक साळुंखे हा दुचाकीवरुन समर्थ मंदिरकडून पोवई नाक्याकडे … Read more

औरंगाबाद- जळगाव महामार्गावर भिषण अपघात; तीन गंभीर जखमी

accident

औरंगाबाद – औरंगाबाद- जळगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून वाळू भरण्यासाठी जाणारे टिप्पर व काळीपिवळी टॅक्सीत समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. औरंगाबाद- जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील चिंचखेडा येथे घडलेल्या या अपघातात तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. शेख सलीम … Read more

BREAKING NEWS : खंडाळा येथे सहा वाहनांच्या विचित्र भीषण अपघात 3 ठार, व्हॅगनारचा चक्काचूर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे – बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ जवळ धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकने उडवलेल्या चारचाकी वाहनांतील 3 ठार झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झालेले असून वाहनांची रांग लागलेली होती. अपघातात 2 जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. सातारा येथून पुण्याकडे निघालेल्या … Read more

सांगोला- मिरज रोडवर ट्रक -ओमनीचा अपघात, 3 ठार तर 13 जखमी

सोलापूर | भरधाव आलेल्या मालट्रकने ओमनी कारला समोरुन जोराची धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातामध्ये कार चालकासह तिघेजण जागीच ठार झाले. तर कारमधील लहान मुले, महिला, पुरुष असे 13 जण जखमी झाले. हा अपघात सांगोला – मिरज रोडवरील करांडेवाडी उड्डाणपुलाजवळील सर्विस रोडवर घडला. ही घटना सोलापूरच्या सांगोला -मिरज रस्त्यावर घडली आहे. हा अपघात इतका भयंकर होता, … Read more

काय सांगता ! मयत दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा दाखल

MIDC waluj police station

औरंगाबाद | एरव्ही गुन्हा हा जिवंत व्यक्ती विरोधात दाखल होते. परंतु वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात भरधाव व निष्काळजी दुचाकी चालवून स्वत:च्या मृत्युस व अन्य एकास गंभीर जखमी करण्यास कारणीभूत ठरलेल्या मयत दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, पंढरी गवई (रा. रांजणगाव) व अनिल वाघमारे (रा. सातारा परिसर) हे दोघे बांधकाम … Read more

घराची भिंत कोसळून पती-पत्नी गंभीर जखमी

Wall collaps

हिंगोली : औंढा नागनाथ येथील रहीम चौक परिसरामध्ये राहत असलेल्या इसाखोद्दीन जाहिरोद्दीन खतीब यांच्या घरावर शनिवारी दुपारी तीन वाजता शेजारच्या घराची भिंत कोसळली. यात इसाखोद्दीन जहिरोद्दीन खतीब व त्यांची पत्नी आरेफाबी इसाखोद्दीन खतीब हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या तीन शेळ्यांवर भिंत कोसळून त्या जागीच ठार झाल्या त्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या मुलीचे … Read more

कोविड लसीकरणासाठी जाणारी वृद्ध महिला विचित्र अपघातात ठार

Accident

औरंगाबाद | कोविडचा दुसरा डोस घेण्यासाठी मुलीसह भाचीसोबत पायी जात असलेल्या वृध्देला दुचाकीने धडक दिल्यानंतर पाठीमागून आलेल्या भरधाव जीपने चिरडले. या विचित्र अपघातात वृध्देचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. हा अपघात हडको कॉर्नरसमोर गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडला. गौरी तपनकुमार मंडल वय 56 (रा. एन-१३, भरतनगर, हडको) असे अपघातातील मृत वृध्देचे नाव आहे. भरतनगरातील गौरी मंडल … Read more

मोकाट जनावरांनी भररस्त्यात मांडले ठाण; वाहनधारकांच्या जीवाला धोका

cow

औरंगाबाद | शहरातील कलेक्टर ऑफिस जवळ आज भररस्त्यात मोकाट जनावरे बसलेले आढळून आले. यामुळे नागरिकांना वाहन चालकांना अडचण निर्माण होत असून अनेक अपघातही होत आहेत. शहरात वाहनांची वर्दळ असलेल्या कलेक्टर ऑफिस जवळील चौकात गाईंचा घोळका भररस्त्यात बसलेला होता. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रस्ता काढूनच जावे लागत होते. या मोकाट जनावरांमूळे कलेक्टर ऑफिस कडून टीव्ही सेंटरकडे … Read more