शेतावरून चोरलेल्या 43 मोटारी हस्तगत : कराड तालुक्यातील 7 जण ताब्यात

Electric Motor Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पेरले व कालगाव (ता. कराड) गावातील सात जणांनी मिळून कराड तालुक्यातील कालगांव, पेरले, भुयाचीवाडी, खराडे वगेरे गांवामध्ये विहिरीवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या चोरट्यांच्याकडून ताब्यात घेवून चोरीस गेलेल्या 43 इलेक्ट्रीक मोटारी, गुन्हा करताना वापरलेली हत्यारे, गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल असा एकुण 2 लाख 36 हजार रुपये किंमतीचा … Read more

जयवंत शुगर्सची डिस्टीलरी ठरली राज्यात सर्वोत्कृष्ट

Jaywant Sugars

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन 2021-22 या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला जाहीर करण्यात आला आहे. साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सेंद्रीय शेतात कोणती पिकं? पहा

Mahabaleshwar Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवस मूळगावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे गावच्या यात्रेसाठी आले आहेत. परंतु गावाकडे येताच त्यांनी पहिल्यांदा शेतात जावून पिकांची पाहणी केली. राज्यात सर्वत्र मुख्यमंत्री यांची शेतीचा विषय चर्चेत असतो. त्यामुळे गावाकडील या शेतीत नक्की कोणकोणती पिकं आहेत, याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. कारण हेलिकॅप्टरमधून जाणारा शेतकरी या विधानामुळे … Read more

शेतकरी आक्रमक : सह्याद्री कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या हवा सोडली

sugarcane Sahyadri factories

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात ऊसदर जाहीर होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. दोन दिवसापूर्वी एक ट्रॅक्टर पेटविला होता, कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली होती. आता सह्याद्री साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या वाहनांची हवा अज्ञातांनी सोडली आहे. त्यामुळे ऊस दर संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळू लागला आहे. या प्रकारामुळे ऊस दराचे आंदोलन आता चिघळू … Read more

कमी खर्चात करा ‘या’ फळाच्या लागवडीची शेती; मिळेल हेक्टरी 25 लाखांपर्यंतचे उत्पन्न

Dragan Frut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती करत असताना शेतकऱ्यांसमोर सातत्याने वेगवेगळी संकट येतात. या संकटाचा सामना करत शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतही चांगले प्रयोग करतात. आज बदलत्या परिस्थिती प्रमाणे पारंपारिक शेतीला बगल देत शेतकरी नव नवीन प्रयोग करू लागले आहेत. त्याच्यासाठी आक अशा फळांची शेती खूप फायदेशीर ठरली आहे. ती म्हणजे ड्रॅगन या फळाची होय. याची माहिती घेत … Read more

महाराष्ट्राने शेती विकासाचा तेलांगण पॅटर्न राबवावा : दशरथ सावंत

कराड | विकासाच्या बाबतीत तेलंगण राज्य गेल्या सात वर्षात सूक्ष्म नियोजनाच्या बळावर प्रगती साधू लागले आहे. यामध्ये कृषी क्षेत्रात त्यांनी केलेले काम क्रांतीकारी असून हा शेती विकासाचा तेलांगण पॅटर्न महाराष्ट्राने राबवावा, असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दशरथ सावंत यांनी तेलांगणाच्या कृषी क्षेत्रातील झालेल्या बदलाची माहिती … Read more

राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर करण्यात आला असून याबाबतची प्रक्रिया बुधवार ७ सप्टेंबर पासून सुरू होत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व … Read more

अभिनंदन कुठे करता, सरकारने 11 हजार 644 कोटी रुपयांचा चुना लावलाय : राजू शेट्टी

कोल्हापूर | नुकतेच केंद्र सरकारने अल्पमुदतीच्या कृषी कर्जावरील व्याज सहाय्य योजनेसाठी 34, 856 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली. यामधून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे अल्पकालीन कर्ज सात टक्के व्याजदराने मिळण्यास मदत होईल. याबाबत सगळीकडे चर्चा असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनतेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी केलेली ही घोषणा म्हणजे “11, 644 … Read more

जावळी तालुक्यात रानगव्यांचा धुडगूस : भातपिकाचे नुकसान मात्र वनविभाग शांतच

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावळी तालुक्यातील मौजे खांबील परिसरातील 25 एकराहून अधिक भात शेती रानगव्याने पूर्णतः नष्ट केल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच या परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना आता रानगव्याने नुकसान केले आहे. शेतीचे नुकसान होत असताना वनविभागाने मात्र याकडे कानाडोळा केला असल्याची तक्रारी शेतकऱ्यांकडून … Read more

शेतकऱ्यांची 1 हजार 530 कोटीची थकीत एफआरपी द्या, अन्यथा आक्रमक आंदोलन : राजू शेट्टी

Raju Shetty

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी राज्यात आज 23 जिल्ह्यात जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टी व महापूरामुळे नष्ट झालेली आहेत. तरी अद्यापही सरकारने मदत जाहीर केलेली नाही. अनेक जमिनी वाहून गेलेल्या असून विहीरी कोसळल्या आहेत.  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आजही 1 हजार 530 कोटीची एफआरपी थकीत आहे, याबाबत शासनाने ठोस कार्यवाही न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय … Read more