पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांवर मनपाची कारवाई

औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था नियमित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.   परंतु असे असतानाही काही नागरिक पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरणे, नळाला तोटी न लावणे, पाणी भरणे झाल्यावर रोडवर सोडून देणे, वाहने धुणे … Read more

शहरातील दर्गा परिसरात तब्बल 800 बेकायदा नळ

water supply

  औरंगाबाद – बेकायदा नळ घेऊन लाखो लीटर पाण्याची चोरी होत असल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. यामुळे महापालिकेने बेकायदा नळ शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन केले असून, या पथकाने शुक्रवारी गादिया विहार, त्रिशरण चौक व पडेगाव भागात सर्वेक्षण केले असता तब्बल 800 पेक्षा अधिक बेकायदा नळ आढळून आले. हे बेकायदा नळ आता बंद केले जाणार … Read more

नागरिकांना दिलासा! शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी वाढ

Water supply

औरंगाबाद – औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्यात 11 दल लिटर्सने वाढ झाली आहे. महानगरपालिका, जीवन प्राधिकरण तसेच एमआयडीसीने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील पाणी प्रश्नाचा आढावा घेतला. त्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा झाली. औरंगाबाद शहरासाठी सध्या … Read more

महापालिकेचा बेकायदा नळांवर ‘आक्रोश’

  औरंगाबाद – शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यात बेकायदा नळ कनेक्शन बंद करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, या पथकाने ज्या भागात नागरिकांच्‍या तक्रारी आहेत, तिथे बेकायदा नळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. भावसिंगपुरा भागात एकाच पाइपलाइनवर हजारो बेकायदा नळ असल्याचे समोर आले होते. त्यानुसार मंगळवारपासून … Read more

‘या’ महिन्यात होणार औरंगाबाद मनपा निवडणूक? 

औरंगाबाद – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक विभाग कामाला लागला आहे. आयोगाकडून शहराचा नकाशा मंगळवारी महापालिकेला प्राप्त होणार आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात महापालिकेची निवडणूक होईल, या अंदाजानुसार कामे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.   कोरोना संसर्ग व सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लांबणीवर … Read more

औरंगाबादेत पाणीप्रश्न पेटला, मनपा आयुक्तांवर दोघांचा हल्ला, सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे आयुक्त बचावले; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

औरंगाबाद – हातात कागदी फलक घेऊन महापालिकेत दाखल झालेल्या दोघांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यावर हल्ला चढवला. सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखल्याने आयुक्त बचावले. तुमचे प्रश्न संबंधितांना माहित असून ते सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे असे आयुक्तांनी सांगूनही ते दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आरडा-ओरड व मोबाईलमध्ये विनापरवाना चित्रीकरण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या … Read more

औरंगाबाद मनपा निवडणूक होणार पुढील वर्षीच 

    औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात केली. राज्यातील 14 महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार असून औरंगाबादसह इतर महापालिकांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होईल हे निश्‍चित झाले आहे. राज्यातील 14 महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यास सुरुवातही केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका घेण्याचे आदेश 4 … Read more

नियमित पाणीपुरवठ्यासाठी मनपाचा आजपासून नवीन प्रयोग

औरंगाबाद – उन्हाळ्यामुळे शहरातील पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जायकवाडी जलायशयातून येणारे पाणी अपुरे पडत असल्याने आता हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणी उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी या तलावापासून जटवाडा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र वाहिनी टाकण्यात येत आहे. आजपासून महापालिकेने ही मोहीम हाती घेतली असून यानंतर तरी शहराची पाण्याची तहान भागतेय का? शहराला चार दिवसांनी पाणीपुरवठा होऊ … Read more

बुधवारपासून लेबर कॉलनीवर हातोडा; अनेकांनी सोडली घरे

औरंगाबाद – उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने बुधवारी सकाळपासूनच धडक कारवाईला सुरूवात करणार आहे. यामुळे कारवाई अटळ असल्याची खात्री पटल्याने आता लेबर कॉलनी येथील अनेक नागरिकांनी घरे रिकामी करणे सुरु केले आहे. रविवारी सायंकाळपर्यंत अनेकांनी घरे रिकामी केली. मात्र, घरांचा ताबा पुनर्वसनाची लेखी हमीनंतर देण्यात येईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून … Read more

मनपा निधीतून शहरातील 81 रस्ते होणार गुळगुळीत

औरंगाबाद – स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील 111 रस्ते तयार करण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे सुरू होतील. त्यासोबतच मनपा निधीतून शंभर कोटी रुपये खर्च करून 81 रस्ते गुळगुळीत करण्याचे नियोजन सुरू आहे. अंदाजपत्रक तयार करून प्रशासकांची लवकरच मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतर लगेच निविदाही काढण्यात येणार आहे. निविदेत 50 कोटींचे दोन पॅकेज तयार केले जाणार असल्याची … Read more