अखेर कॉमेडीयन मुनव्वर फारुकीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर; भाजप आमदार मुलाच्या तक्रारीवर झाली होती अटक

नवी दिल्ली । हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून गेल्या महिनाभरापासून तुरुंगात बंद असलेल्या स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला अखेर सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. आरोपीला नियमांना धुडकावत अटक करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता. या अगोदर मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं मुनव्वर फारुकी याला जामीन देण्यास नकार … Read more

दिल्लीतील हिंसाचारानंतरही मोदी-शहा गप्प का?; संजय राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यातच प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानं शेतकरी आंदोलनाला नवं वळण मिळालं आणि त्यानंतर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलन स्थळी परिस्थिती तणावपूर्वक बनली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी, शाह यांची काही जबाबदारी आहे की … Read more

शेतकर्‍यांना भडकवणार्‍या अबु आझमी अन् त्यामागील खर्‍या मास्टरमाइंडचा शोध घ्या; भाजप आमदाराचे अमित शहांना पत्र

मुंबई । दिल्लीतील हिंसाचाराचं कनेक्शन हे आझाद मैदातील भाषणांशी लावत याबाबत चौकशीची मागणी करणारे पत्र भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkalkar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना लिहलं आहे. या पात्रात अतुल भातखळकर यांनी आझाद मैदातील आंदोलनात अबू आझमींनी चिथावणीखोर भाषण केलं असून, त्या मागचा बोलवता धनी कोण हे शोधा, असं आवाहनही भातखळकर यांनी या पत्रात … Read more

आयुष्मान CAPF योजनेचा शुभारंभ, 10 लाख जवानांना होणार फायदा; अमित शहांची मोठी घोषणा

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुवाहाटीमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी (CAPF) आयुष्मान सीएपीएफ योजनेची (Ayushman CAPF Healthcare Scheme) घोषणा केली आहे. आयुष्मान सीएपीएफ योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून केंद्रीय आरोग्य विमा कार्यक्रमांचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळपास 10 लाख केंद्रीय सैन्य दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा मोठा फायदा … Read more

अमित शाहांचा सौरव गांगुलीच्या पत्नीला फोन ; सर्वतोपरी मदतीचं दिलं आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता.  सौरव गांगुली सध्या कोलकातामधील वुडलॅन्ड्स रुग्णालयात उपचार घेत आहे. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सौरव गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलीची पत्नी डोना गांगुलीला फोन करुन त्याच्या प्रकृतीची विचारपूस … Read more

खासदार सुजय विखेंना मिळणार केंद्रात मंत्रिपद? शहा यांच्या भेटीनंतर केलं ‘हे’ सूचक विधान

अहमदनगर । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सध्या सुरू आहेत. अशातच भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना आता केंद्रीय मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांची घेतलेली भेट आणि शिर्डीमध्ये केलेल्या सूचक वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रातील भाजपच्या सरकारचे धोरण, तरुणांना अनुकूल आणि विरोधकांना शह देण्यासाठीची रणनिती याचा फायदा घेत विखे यांना … Read more

अंबानींच्या ऑफिसवर मोर्चा काढण्यापूर्वीच बच्चू कडूंना नागपुरातचं रोखलं; वरिष्ठांच्या आदेशावरून कारवाई?

नागपूर | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पण बच्चू कडू यांना पोलिसांनी नागपुरातच रोखून धरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडू यांना वरिष्ठांच्या आदेशानुसारच अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा आदेश देणारे वरिष्ठ कोण? असा प्रश्न आता उपस्थित … Read more

मोदी सरकारचा ‘हा’ प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला! १४ तारखेला पुकारले देशव्यापी धरणे आंदोलन

नवी दिल्ली । दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या 14 व्या दिवशी मोठ्या घडामोडी घडत आहेत. मंगळवारी झालेल्या भारत बंदनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आज केंद्रातील मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना नवा प्रस्ताव देण्यात आला. पण शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा हा कायदा दुरुस्ती प्रस्ताव एकमताने फेटाळला आहे. नव्या कायद्यात किमान आधारभूत … Read more

शेतकरी आंदोलन: …तर पंतप्रधान आणि गृहमंत्री स्वत: जाऊन शेतकऱ्यांशी बोलतील!

मुंबई । केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ सुरू असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सरकारनं दबावाखाली येण्याची गरज नाही. केवळ मनानं विचार करणं गरजेचं आहे. डोक्यानं नव्हे. आपला देश कृषिप्रधान देश आहे. तसं आपण मानत असू तर शेतकऱ्यांचं ऐकायलाच हवं. आपण शेतकऱ्यांचं … Read more

GHMC Election Result: हैदराबाद महापालिकेत भाजपाची जोरदार मुसंडी; ओवेसींच्या गडाला भगदाड

हैद्राबाद । हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली असून आज ११२२ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. असदुद्दीन ओवैसी यांचा गड जिंकण्यासाठी भाजपनं आपला सगळा जोर लावलाय. त्यामुळे ही निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरलीय. सुरुवातीला आलेल्या कलानुसार भाजपाने जोरदार मुसंडी मारलेली आहे. (GHMC Election Result 2020) एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गडामध्ये भाजपा ४० जागांवर आघाडीवर … Read more