Satara News : पट्टेरी वाघाचे कातडे अन् नखांच्या तस्करीप्रकरणी महाबळेश्वरच्या तिघांना अटक; 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पट्टेरी वाघाचे कातडे व वाघ नखांची तस्करी केल्या प्रकरणी महाबळेश्वरच्या 3 जणांना बोरीवली (मुंबई ) पोलीसांनी अटक केली आहे. ज्या पट्टेरी वाघाच्या कातड्याची व नखांची तस्करी केली. तो वाघ नक्की कुठला? कोणी त्याची शिकार केली? महाबळेश्वरच्या तिघा तस्करांचा पट्टेरी वाघाच्या शिकारीत सहभाग कसा काय? याचा तपास सद्या मुंबई पोलिसांकडून केला जात … Read more

Satara News : पुसेसावळी दंगल अन् नूरहसनच्या मृत्‍यूप्रकरणी आणखी 23 जणांना अटक; ‘त्या’ 16 जणांना आज कोर्टात करणार हजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील दंगल आणि नूरहसन शिकलगार यांच्‍या मृत्‍यूप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्ह्यात 23 जणांना अटक करण्‍यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास स्‍थानिक गुन्‍हे शाखेकडून केला जात असून अटकेतील त्‍या 23 जणांना काल सायंकाळी सातारा येथे आणण्‍यात आले. तर शासकीय कामात अडथळा आणल्‍याप्रकरणी अटकेत असणाऱ्या 16 जणांच्‍या पोलिस कोठडीची मुदत संपत … Read more

अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात; स्वतःच केलं आत्मसमर्पण

Amritpal Singh arrested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खलिस्तान समर्थक आणि वारीस पंजाब दीचा प्रमुख असलेला अमृतपाल सिंग याला मोगा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतःच हे आत्मसमर्पण केलं आहे. तब्बल ३६ दिवसांनंतर अमृतपाल पोलिसांच्या हाती लागला आहे. अजनाळा घटनेनंतर अमृतपाल फरार झाला होता. अमृतपाल सिंह हा 18 मार्चपासून फरार होता जेव्हा त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर पोलिस कारवाई सुरू … Read more

भाजप आमदाराच्या मुलाला लाच स्वीकारताना अटक; घरात सापडले तब्बल 6 कोटी

BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे सत्तासंघर्षांवरून राज्यात शिंदे-ठाकरेंमध्ये वाद सुरु असताना असताना दुसरीकडे कर्नाटकात राजकारणात एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे येथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील सत्ताधारी भाजपा आमदारपुत्राला तब्बल 40 लाखांची लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील हर हर महादेव चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात आहेत. विधियाना मॉलमधील हर हर महादेव चित्रपटाचा शो आव्हाड यांनी बंद पडला होता. यावरून आव्हाड यांना ताब्यात घेतले आहे. अटकेनंतर आव्हाड यांनी ट्विट करत याबाबात माहिती दिली. ठाणे येथील वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांची आज मारहाण प्रकरणी … Read more

जुगार अड्ड्यावर छापा : 8 जण ताब्यात तर 1 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त

Borgaon Police Raid

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायळी गावात तीन पानी जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण 1 लाख 68 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सायली गावात गेल्या … Read more

अडीच लाखांच्या दुचाकींची चोरी : दोघा चोरट्यांचा अटक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरामध्ये दुचाकी चोरींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या चोरींचा तपास करत सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नुकतीच एक कारवाई कारवाई केली. त्यामध्ये 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या बुलेट व बजाज पल्सरची चोरी करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना काल अटक केली. किशोर हणमंत माने (वय 20, रा. … Read more

माजी सैनिकाची रायफल चोरल्या प्रकरणी दोघांना अटक

Satara Police

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतीळ संभाजीनगर येथील निवृत्त माजी सैनिकाच्या घरातून परवानाधारक बाराबोर रायफल व 14 जिवंत काडतुसे चोरी करणाऱ्या दोघा जणांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका पुरुष व महिलेचा समावेश असून दोघेही आरोपी बहीणभाऊ आहेत. दोघेही मूळचे कर्नाटक राज्यातील आहेत. प्रवीण रामू पवार (वय 19) व त्याची … Read more

राज ठाकरे यांना तात्काळ अटक करा : माजी आमदाराचे उपोषण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मशिदीवरील भोंगे काढून टाका असे म्हणून भारतीय घटनेविरोधात काम करणाऱ्या व दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांना तात्काळ अटक करावी. या मागणीसाठी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा ठाकरे घराण्यात जन्म झाला असला तरी त्यांचे … Read more

कराडच्या भाजी मंडईत रेकाॅर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त

कराड | मलकापूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून सातारा स्थानिक गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस असा एकूण 65 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी कराड शहरातील भाजी मंडई परिसरात ही कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मलकापूर येथील … Read more