ऐन निवडणुकीत भाजपने मनसे उपाध्यक्ष फोडून त्याला दिली उमेदवारी

नाशिक प्रतिनिधी| राजकरणात कधी काय होईल हे काहिच सांगता येत नाही. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपने मनसेचे उपाध्यक्ष राहुल ढिकले यांना नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तुम्ही बातमी वाचत असताना त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलेला असेल. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज … Read more

चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढल्या ;मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा

पुणे प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा चंगच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला आहे. याच निर्धारातून काँग्रेस आघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अद्याप देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोथरूडचा उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मनसेला … Read more

भाजपची चौथी यादी जाहीर ; तावडे खडसेंचे तिकीट कापले तर रामराजेंच्या जावयाला कुलाब्याचे तिकीट

मुंबई प्रतिनिधी |भाजपने आपली चौथी यादी जाहीर करत तिकीट वाटपाचा कार्यक्रम आटपला आहे. यामध्ये विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांना ब्रेक लावत त्यांचे तिकीट कापले आहे. तर मुक्ताई नगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कुलाब्यात विद्यमान आमदाराचे तिकीट कापत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जावयाला तिकीट देण्यात आले आहे. … Read more

भाजपचा कसबा ; शिवसेनेचा सवता सुभा ; काँग्रेसची गटबाजी ; बहुरंगी लढत

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरातील मध्य वस्तीत असणारा कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात भाजपने लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांची लढत सोपी नाही. कारण त्यांच्या विरोधात उभा राहिलेले सर्वच उमेदवार तगडे आहेत. तर शिवसेने या मतदारसंघात बंडखोरी देखील केली आहे. पुण्याच्या महापौर असणाऱ्या मुक्ता … Read more

स्वतःच्या उमेदवारीबद्दल एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट

जळगाव प्रतिनिधी | भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला पक्ष तिकीट देणार नाही असा गौप्यस्फोट केला आहे. पक्षाने आपल्याला विचारले होते की तुम्हाला सोडून कोणाला तिकीट द्यायचे तुम्ही सांगाल त्याला आम्ही तिकीट देऊ असे खडसे म्हणाले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. एकनाथ खडसे यांना पक्षाने डावलल्याने त्यांचे कार्यकर्त्ये अत्यंत संतप्त झाले आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या … Read more

मोहिते पाटलांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीची जबर खेळी

माळशिरस प्रतिनिधी |  राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकून रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराला शरद पवार नेमके काय उत्तर देणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले होते. अशातच कधी काळी मोहिते पाटलांचे कट्टर वैरी असणारे उत्तरराव जानकर यांना राष्ट्रवादीत घेऊन शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आहे. उत्तमराव जानकर यांनी २००९ … Read more

वडिलांसाठी मुलाची माघार ; ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक भाजपचे उमेदवार

नवी मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या गेशन नाईक यांना भाजपने चांगलाच धक्का देत बेलापूर मधून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विचारपूस करायला सुरुवात केली. त्यानंतर गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी एक पाऊल मागे येत वडिलांसाठी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे ऐरोली मतदारसंघातून … Read more

एकनाथ खडसेंच्या उमेदवारीवर गिरीश महाजन म्हणतात

जळगाव प्रतिनिधी |  भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत देखील नाही. त्यामुळे खडसेंपुढे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी करण्याच्या पवित्र्यात आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी या बद्दल सूचक वक्तव्य केले आहे. गिरीश महाजन यांनी आपल्या पारंपरिक जामनेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. … Read more

परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महायुतीच्या मित्रपक्षांनी केली घुसखोरी

परभणी प्रतिनिधी| गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागेसाठी राजकीय पक्षांकडून तिकीट वाटपामध्ये अनपेक्षित उलटापालट झाली असून जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय बंडखोरांच्या ‘इंट्री’मुळे बहुरंगी निवडणूक लढती होणार आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यावेळी महायुतीच्या मित्रपक्षांनी घुसखोरी केल्याने सेनेचे पाथरी आणि जिंतूर बालेकिल्ले मात्र लढती पूर्वीच ढासळले आहेत. महायुतीच्या जागा वाटपामुळे शिवसेनेची स्वतःच्या घरात चांगलीच गोची झाली आहे. … Read more

मोहोळचे आमदार रमेश कदम यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयाचा जामीन मंजूर

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे बडतर्फ आमदार रमेश कदम यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता जमीन मंजूर केला आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप असल्याने कदम हे तुरुंगात आहेत. त्यांना ३ ते ६ तारखेच्या दरम्यान निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जामीन मंजूर झाला आहे. रमेश कदम यांच्यासाठी न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळात बोगस लाभार्थी … Read more