तरुणांवर तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकास अटक

अंबाई टँक परिसरात खाद्यपदार्थांच्या गाडीवर झालेल्या किरकोळ वादातून दोघा तरुणांवर तलवार हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचा माजी नगरसेवक दत्ता विलास टिपुगडे (वय ५०, रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. दरम्यान, यापूर्वी त्याचा मुलगा सागर टिपुगडे याला अटक केली होती.

उन्नाव मध्येहैदराबादची पुनरावृत्ती; बलात्कार पीडितेला पेटून देण्याचा प्रयत्न

यापूर्वी याच सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले.सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळय़ावर चाकूने वार करण्यात आले. पीडित तरुणी जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं.

मद्यधुंद जमावाकडून पोलिसांवर हल्ला

जीवबा नाना पार्क व राजारामपुरी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमावाने पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्यात करवीर पोलिस ठाण्यातील हवालदारासह दोन पोलिस जखमी झाले आहेत. तर राजारामपुरीतील मध्यवर्ती चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कॉन्स्टेबलला शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करत 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

ठाणे प्रतिनिधी| डोंबिवलीत आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात बिल्डर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात भाजपचा पदाधिकारी जबर जखमी झाला. तर या धुमश्चक्रीत नगरसेवकाचा भाऊ थोडक्यात बचावला. योगेश तळेकर असे जखमी पदाधिकाऱ्याच नाव आहे. जखमी तळेकर हे आजदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. तळेकर यांचा दिनेश राणे या बिल्डरबरोबर यापूर्वी 27 लाखांचा व्यवहार झाला होता. बिल्डर … Read more

किरकोळ वादातून तरुणाने केली वृद्ध आईची हत्या

ठाणे प्रतिनिधी | कल्याणच्या पश्चिम भोईवाडा भागातील गफूर मंझिल इमारतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमन मुल्ला या तरुणाने किरकोळ वादातून आपल्याच वृद्ध आईला जीवे मारल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली. लाटनं आणि इतर लाकडी वस्तूंचा वापर करून अमनने आपल्या आईच्या डोक्यात जोरदार घाव घातल्याचं पोलिसांना प्रथमदर्शनी पाहणीत दिसून आलं आहे. रुकसाना मुल्ला असं मृत वृद्धेचं … Read more