रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा ; भाजपने शिवसेनेला डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरा वरून भाजपला टोला लगावला होता.  ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला होता.दरम्यान भाजप आमदार अतुल आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेवर तोफ … Read more

हा न्यायालयाचा अपमान! भाजपकडून संजय राऊतांविरोधात कारवाईची मागणी

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयानं लक्ष घालण्यासारखे देशात अनेक विषय आहेत. शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतं आहे. … Read more

जयंतराव, लाळघोटेपणाची पण हद्द झाली – भाजप नेत्याची खोचक टीका

Jayant Patil NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल 80 वा वाढदिवस होता. देशभरातून शरद पवार यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव झाला. दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल जयंत पाटील यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम-सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात … Read more

ही तर ठाकरे सरकारची हुकूमशाही ; रिपब्लिक चॅनेल सीईओंच्या अटकेनंतर भाजपच ठाकरे सरकारवर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक चॅनेलचे चे सीईओ विकास खानचंदानी यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही सुरू आहे”, अशी टीकाअतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केली. पोलिसांनी कोणत्याही कागदपत्रांशिवाय खानचंदानी यांना अटक केल्याचं रिपब्लिक … Read more

पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…..भाजपची खोचक टीका

Sharad pawar Uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस…. याच निमित्ताने शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातील अग्रलेखातुन शरद पवारांची भरभरून स्तुती केली आहे.दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती वाटत आली. पवारांची हत्तीची चाल व वजिराचा रुबाब उत्तरेच्या ‘जी हुजुरी’ नेत्यांना अडचणीचा ठरला असता. त्यातून पवार बेभरवशाचे नेते असल्याची हाकाटी कायम सुरू ठेवली गेली, असं … Read more

“शिवसेना जाणत्यांच्या खांद्यावर आणि काँग्रेसच्या मांडीवर” ; लव्ह जिहाद वरून भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी लव्ह जिहादबाबत कायदा करण्याबद्दल मागणी केली आहे. शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘सामना’ वृत्तपत्रामध्ये लव्ह जिहादवर एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार … Read more

कोरोना झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकही जण फडणवीसांप्रमाणे सरकारी रुग्णालयात भरती का झाला नाही? भाजपचा सवाल

मुंबई । ”विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना झाल्यानंतर सरकारी रुग्णालयात भरती झाले. यावरुन सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे. मग कोरोनाची लागण झालेल्या 16 पैकी एकाही मंत्र्याने शासकीय रुग्णालयात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही?” असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला विचारलाय.. (BJP MLA Atul … Read more

शेतकऱ्यांसाठी मदत हवेय ना? मग केंद्रासोबत कशाला कटुता वाढवता- अतुल भातखळकर

मुंबई । राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळणे आवश्यक आहे. मग अशावेळी राज्य सरकार केंद्रासोबत कटुता कशाला वाढवत आहे, असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. (BJP leader Atul bhatkhalkar criticized Thackeray govt) सीबीआयला राज्यात थेट तपासासाठी दिलेली सर्वसाधारण परवानगी काढून घेण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. टीआरपी … Read more

अनिल देशमुख महाविकास आघाडीतील जोकर ; भाजपा नेत्याची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सुशांत आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे. “अनिल देशमुख महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर,” असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “गृहमंत्री अनिल देशमुख हे … Read more

इथं विषय चाललाय काय, आपण बोलताय काय! रोहित पवार आणि भाजप नेत्यात ट्विटवर शाब्दिक बाचाबाची

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळं विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार आणि भातखळकर यांच्यात ट्विटवर वॉर सुरु झालं आहे. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? घरी बसल्याबद्दल सर्वाधिक चर्चा राज्यात कुणाबद्दल चालली आहे ते ठाऊक … Read more