औरंगाबाद ‘स्मार्ट शहरात’ तब्बल 635 कोटी रुपयांची कामे सुरू

Aurangabad cycle track

  औरंगाबाद – स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतिम टप्प्यात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने मार्चएण्डला अठरा कामांच्या 635 कोटींच्या निविदा अंतिम केल्या आहेत. ही कामे टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आली असून, सर्वात मोठे काम म्हणजे 317 कोटींचे रस्ते आगामी नऊ महिन्यात होणार आहेत. स्मार्ट सिटी अभियानातील कामांच्या निविदा 31 मार्चपर्यंत अंतिम करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. … Read more

मनपा निधीतून शहरातील 81 रस्ते होणार गुळगुळीत

औरंगाबाद – स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील 111 रस्ते तयार करण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे सुरू होतील. त्यासोबतच मनपा निधीतून शंभर कोटी रुपये खर्च करून 81 रस्ते गुळगुळीत करण्याचे नियोजन सुरू आहे. अंदाजपत्रक तयार करून प्रशासकांची लवकरच मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतर लगेच निविदाही काढण्यात येणार आहे. निविदेत 50 कोटींचे दोन पॅकेज तयार केले जाणार असल्याची … Read more

‘स्मार्ट सिटी’त औरंगाबाद देशात चौदावे 

Aurangabad cycle track

औरंगाबाद – केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनने ‘इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड काँटेस्ट’च्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर केला. या निकालात देशभरातील 75 शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद शहर देशपातळीवर चौदाव्या क्रमांकावर आहे. राज्यपातळीवर औरंगाबाद शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. स्मार्ट सिटी मिशनमधील या यशाने ऐतिहासिक व पर्यटन, औद्योगिक नगरी असलेल्या या शहराच्या सन्मानात … Read more

आता एका क्लिकवर भरता येणार मालमत्ता कर

औरंगाबाद – नागरिकांना आता एका क्लिकवर मालमत्ता कर भरता येणार आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने ‘नागरिक मोबाईल ॲप’ तयार केला आहे. त्याच बरोबर नागरिकांना त्यांच्या समस्यांची नोंद देखील या ॲपच्या माध्यमातून करता येईल. २६ एप्रिलपासून हे ॲप नागरिकांच्या सेवेत येणार आहे. शहरातील मालमत्तांचे आणि नळ जोडण्याचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात … Read more

एकाच कंत्राटदाराकडे स्मार्ट सिटीच्या 317 कोटींच्या रस्त्यांची कामे

औरंगाबाद – स्मार्ट सिटी प्रशासनामार्फत 317 कोटी रुपयांतून करण्यात येणारी रस्त्यांची सर्व कामे एकाच कंत्राटदाराने मिळवली. यामुळे राजकीय मंडळींसह कंत्राटदारांना मध्ये खळबळ उडाली आहे. 11 ते 15 टक्के कमी दराने निविदा आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी फक्त नऊ महिन्यांचा अवधी असून निर्धारित वेळेत एकाच कंत्राटदाराकडून 108 रस्त्यांची कामे पूर्ण होतील का, याविषयी शंका उपस्थित केली जात … Read more

भारनियमनामुळे शहरातील लाखांवर घरांची वीज गुल

औरंगबाद – विजेच्या वाढत्या मागणीमुळे शहरातील ज्या भागात थकबाकी आणि वीजचोरी अधिक आहे, अशा 38 फिडरवर काल महावितरणला भारनियमन करावे लागले. शहरात एक ते तीन तासांपर्यंत भारनियमन केल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी दिली. यामुळे शहरातील जवळपास एक लाख ग्राहकांच्या घरात वीज गुल झाली होती. राज्यात विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मागणी … Read more

महापालिकेने 1728 कोटी रुपयांतून दाखविले शहराच्या विकासाचे ‘स्वप्न’

औरंगाबाद – महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी 2022-23 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. 1728 कोटी 15 लाख 80 हजार रुपयांचा अर्थसंकल्प असून, 1726 कोटी 39 लाख 71 हजार रुपये अपेक्षित खर्च आहे. त्यामुळे एक कोटी 76 लाख नऊ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रशासक पांडेय यांनी सलग तिसऱ्या वर्षी अर्थसंकल्प … Read more

सत्ताधाऱ्यांविना मनपाचा तिसरा अर्थसंकल्प आज होणार सादर

औरंगाबाद – महापालिकेतील सत्ताधाऱ्यांविना आज सलग तिसरा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तिन्ही अर्थसंकल्प सादर करण्याचा मान प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना मिळत आहे. प्रशासक अस्तिक कुमार पांडेय आज दुपारी साडेतीन वाजता प्रशासकीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक वॉर्डाला एक कोटी रुपये विकास कामांसाठी देण्यात येणार आहेत. शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांसाठी 200 कोटी … Read more

औरंगाबादकरांना भर उन्हाळ्यात ‘लोडशेडिंग’चा शॉक

औरंगाबाद – औरंगाबाद शहराला तब्बल 3 वर्षानंतर उन्हाळ्यात पुन्हा एकदा भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे शहरातील वीज बिलाची थकबाकी व वीज वितरण हानी अधिक आहे. अशा 22 फिडरवर मंगळवारी सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान महावितरणने भारनियमन केले. ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी तातडीने भरून सहकार्य करावे, अन्यथा पुढील काही दिवस भारनियमन अपरिहार्य आहे, … Read more

एप्रिलपासून पुर्ण क्षमतेने धावणार स्मार्ट शहर बस

smart city bus 1

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा महापालिकेच्या स्मार्ट बसवरही झाला आहे. माजी सैनिकांच्या मदतीने कशाबशा 100 पैकी 11 शहर बस सुरू ठेवल्या आहेत. मात्र, आता प्रशासनाने खासगी एजन्सीच्या माध्यमातून 360 चालक- वाहक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खासगी एजन्सीकडून निविदा मागविण्यात आल्या आहे. लॉकडाउननंतर सुरू झालेली स्मार्ट सिटी बस एसटी महामंडळातील कर्मचारी संपामुळे पुन्हा अडचणीत … Read more