फ्लॅटधारक शेतक-याला आठ जणांनी लावला 25 लाखांना गंडा

money

औरंगाबाद | फ्लॅटची इसार पावती करत शेतक-याकडून 25 लाखांची रक्कम उकळून फ्लॅट त्याच्या नावे न करता मामा-भाच्यासह आठ जणांनी गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2019 मध्ये घडला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैठण तालुक्यातील गणेश रावण ढोबळे (33, रा. जांभळी) यांच्या वडिलांच्या नावे असलेली काही जमीन … Read more

क्रांतीचौकात बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुण्यात पालक मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून पाहणी

chatrpati shivaji maharaj statue

औरंगाबाद : शहरातील औरंगाबाद येथे असलेल्या क्रांती चौकात बसवण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आणि चौथाऱ्याचे काम सूरु आहे. या चौथऱ्याचे यावर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचे काम पुण्यात सुरु असून औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ पुणे येथे जाऊन पाहणी केली. महाराष्ट्रातील हे या प्रकारचे शिवरायांचे आत्तापर्यंतचे सर्वात भव्य … Read more

जिल्ह्यातील पुराणवस्तुंचे जतन व संवर्धन करुन ऐतिहासाहिक स्थळांचे सुशोभिकरण करा-खा. इम्तियाज जलील

Tourist

औरंगाबाद | खासदार इम्तियाज जलील यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयास आज भेट देवुन विभागाच्या अंतर्गत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा केली. औरंगाबाद जिल्ह्यातील पुराणवस्तुंचे जतन व संवर्धन करण्यावर भर देवुन ऐतिहासिक स्थळांचे सुशोभिकरण करण्याच्या कामास गती देण्याच्या सुचना अधिक्षक मिलन कुमार चौले यांना केल्या. खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यात जगप्रसिध्द … Read more

औरंगाबादेतील बाजारपेठांमधील तुफान गर्दी ठरू शकते तिसऱ्या लाटेला आमंत्रण

औरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. कोरोनामुळे शहरात सकाळी सात ते सायंकाळी चार पर्यंत बाजारपेठा उघड्या ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. या वेळेमध्ये नागरिकांची बाजारपेठेत तर रस्त्यावरती वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. डेल्टा प्लसला रोखण्यासाठी शहरामध्ये निर्बंध लावण्यात आलेले आहेत. गेल्या 24 तासात शहरात तब्बल … Read more

यंदाही पंढरपुरात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार अभिषेक; विठ्ठल-रुक्मिणीला चढवला जाणार चांदीचा मुकुट

Pandharpur Waluj

औरंगाबाद | गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे आषाढी एकादशी घरी बसूनच साजरी करावी लागणार आहे. आषाढी एकादशी निमित्त औरंगाबाद येथील वाळूज पंढरपूर येथे दरवर्षी हजारोच्या संख्येने वारकरी येत असतात. त्याचबरोबर याठिकाणी यात्रा देखील भरवण्यात येते. परंतु यावर्षी वारकरी आणि भाविकांना घरीबसूनच वारीचा आनंद घ्यावा लागणार आहे. यंदा यात्रा भरणार नसली तरीही पंढरपूर येथील … Read more

पंधरा दिवसानंतर पाऊस परतल्याने पिकांना जीवनदान, दुबार पेरणीचे संकट टळले

औरंगाबाद : गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शहरवासीसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मागच्या पंधरा दिवसापासून पाऊस नसल्याने पिकाने माना टाकून दिल्या होत्या. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट सतावत होते. आता पाऊस पडल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. आणि पिकांनाही जीवनदान मिळाले आहे. मागच्या महिन्यात 28 जूनला शहरात … Read more

पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर जनशक्ती शेतकरी संघटनेने उगारले आसूड

औरंगाबाद : शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासाठी बँका सतत टाळाटाळ करत आहेत. त्यात अजून भर म्हणजे पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक हा तर गंभीर विषय होत चालला आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँकांवर जनशक्ती शेतकरी संघटना आसूड उगारणार असल्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांनी पत्रकार परिषदेत दिला. शिवसेनेचे राज्य असतांना, त्यांच्या राज्यातही शेतकरी व … Read more

कंपनीचे शटर उचकटून 9 लाखाची चोरी; चोरट्याला पोलिसांनी केली अटक

वाळूज | वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीचे शटर उचकटून 9 लाखाचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला टोळीतील एका चोरट्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. आकाश प्रल्‍हाद भालेराव वय 21 (रा.आंबेडकर नगर ,जोगेश्वरी तालुका गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे .त्याच्याकडून पोलिसांनी 6 लाख 30 हजाराच्या चोरीचा माल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले कोमलकुमार लुनावत … Read more

अधिसभेच्या 3 रिक्त जागांसाठी स्थायी समितीची बैठक संपन्न

bAMU

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्रकरणावरील रिक्त झालेल्या जागांवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी गुरुवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत 12 जुलै रोजी अधिसूचना जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रामुख्याने सभेच्या वतीने रिक्त जागा भरण्यात येणार आहे. विद्यापीठीय अध्यापक प्रवर्गातून समाजशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. स्मिता अवचार … Read more

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केली क्लस्टरच्या कामाची पाहणी

Cluster Project

औरंगाबाद | शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात विविध नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाकडून क्लस्टरची योजना राबविण्यात येत आहे. या कामाचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी घेतला आहे. त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सूचना दिल्या आहेत. या क्लस्टरमध्ये वाळूज, जोगेश्वरी, कासोडा, आदी गावांचा समावेश आहे. क्लस्टर निधीमधून ड्रेनेजलाईन, व्यायामशाळा, बस … Read more