भाजी विक्रीसाठी वेळ वाढवून द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू

vegetable sellers

औरंगाबाद | शहरामध्ये डेटा प्लसचा संसर्ग रोकण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याअंतर्गत सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वाजेपासूनते 4 वाजेपर्यंत सर्व दुकाने चालू ठेवण्याची मुभा आहे. त्यामध्ये आठवडी बाजार देखील चालू ठेवण्याची मुभा आहे. मात्र या निर्णयावर भाजी विक्रेते नाराज असून, पीर बाजार येथील भाजी विक्रेत्यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. हॅलो महाराष्ट्रने भाजी विक्रेते … Read more

खेर्डा प्रकल्पात पाणी सोडण्याची जलसंपदा विभागाला निवेदनातून मागणी

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील खेर्डा प्रकल्पात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. दिनेश पाटेकर यांनी नुकतीच निवेदनाद्वारे गोदावरी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. पुढे निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, बालानगरसह परीसरात जूनमध्ये शेवटच्या आठवड्यात पडलेल्या जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी कशीबशी खरीप पेरणी केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे आता कोवळी पिके … Read more

मुलगी पसंत नाही म्हणत मागितला एक लाख रुपये हुंडा, नातेवाईकांसह नवरदेवावर गुन्हा दाखल

औरंगाबाद : 50 हजार रुपये हुंडा दिल्यानंतर ही मुलगी पसंत नाही सांगत अजून एक लाख रुपये हुंडा द्या म्हणत लग्न मोडल्याची घटना मुकुंदवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी नवदेव आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर बाबुराव कोंगळे, बाबुराव कोंगळे, सागरची आई आणि दोन बहिणी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे पीडितेचे … Read more

कॅनॉट प्लेसमध्ये उभारणार महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा

maharana pratap

औरंगाबाद | शहरातील सिडको कॅनॉट प्लेस गार्डनमध्ये महापालिकेकडून महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. महापालिकेने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे हा पुतळा धातूचा असून त्याची उंची 16 फूट असणार आहे. खाली 18 फूट उंच चौथरा बांधून त्यावर हा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 85 लाख रुपयांचा खर्च होणार असल्याचे महापालिकेकडून … Read more

अखेर…या वर्षाच्या शेवटी क्रांतीचौकातील पुतळ्याचे काम पूर्ण होणार

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद | औरंगाबादेतील क्रांतीचौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढवण्याचे काम चार वर्षांपासून सुरु आहे. परंतु अजूनही या चौथऱ्याची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झालेले नाही. 1962 मध्ये शिवसैनिकांकडून क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. शहरात एकात्मिक रस्ते विकास योजना राबवण्यात आली. यावेळी क्रांतीचौकात उड्डाणपूल … Read more

दहावीच्या निकालाचे 99.87% काम पूर्ण

result of the assessment

औरंगाबाद |23 जूनला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा निकाल भरण्यास सुरुवात झाली होती. यापैकी 2 जुलैपर्यंतच्या मुदतीत जिल्ह्यातील 99.87 टक्के विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी ऑनलाईन भरले आहे. जिल्ह्यातील 97 विद्यार्थ्यांचे निकाल भरणे अजुन बाकी असून, 601 विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी भरले आहे. परंतु, त्यांची अजून ऑनलाईन निश्चिती केली नाही. … Read more

महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या कामाला वेग; लवकरच होणार भूमिपूजन

Women and neonatal

औरंगाबाद | शहरात तब्बल सात वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीसाठी दूध डेअरी येथील जागेतील जुने बांधकाम पाडण्यात येत आहे. परंतु हे काम संथगतीने सुरू होते. आता आठवडाभरात या जागेचे सपाटीकरण पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतर भूमिपूजन होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी दिली आहे. दूध डेअरी येथील … Read more

दरोडेखोरांचे शहरात थैमान; तब्बल ८ दिवसात ४ घर फोडीली

Robbary

औरंंगाबाद : कुटुंबियासह बाहेरगावी गेलेल्या सुदाम दगडू वाघ (वय ४८,रा.पटेलनगर,चिकलठाणा) यांचे घर फोडून चोरट्याने २० हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ जून ते ३ जुलै दरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत हर्सुल परिसरात असलेले मोबाईल रिपेरिंगच्या दुकानाचे पाठीमागील पत्रा उचकटून चोरट्यांनी २३ हजाराचा ऐवज चोरून … Read more

डेल्टा प्लसचा शहरात एकही रुग्ण नाही; तरी बाजारांवर निर्बंध का?- जिल्हा व्यापारी महासंघ

Unlock

औरंगाबाद : शहरात डेल्टा प्लसचा एकही रूग्ण नाही. तरी सुद्धा शासनाने नवीन नियमावली लागू करत बाजारपेठेच्या वेळा कमी केल्या. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संक्रमणामुळे व्यापारी व व्यापाऱ्यांवर अवलंबून असणारे कामगार व त्यांचे कुटुंब प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. शासनाकडूनही व्यापाऱ्यांसाठी कोणतेही आर्थिक पॅकेज मिळत नाही. यासंदर्भात व्यापारी महासंघाच्या कार्यकर्ते व सदस्य यांनी आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली. … Read more

मौलाना आझाद चौकातील दुकानाला आग; आगीत 1 दुचाकी जळून खाक

औरंगाबाद : येथील मौलाना आझाद चौकातील आचल ट्रेडिंग या दुकानाला आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये एक दुचाकी जागीच जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. दुकानाला आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आणि त्यांना आग विझविण्यात यश आले. या आगीत दुकानाचे किती नुकसान … Read more