आता अजिंठा लेणीत फक्त एक हजार पर्यटकांना प्रवेश

Ajanta caves

औरंगाबाद | जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत आता दररोज सुरू राहणार असून प्रतिदिन फक्त एक हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. आता लेणी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पर्यटकांसाठी सुरू असणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांना सकाळी सात ते चार वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. यापूर्वी लेणीमध्ये दोन हजार पर्यटकांना प्रवेश … Read more

वराहाच्या धडकेत सायकलस्वार वॉचमनचा मृत्यू

Pig bites

औरंगाबाद | कामावर निघालेल्या वॉचमनच्या सायकलला वराहाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चितेगाव जवळ घडली आहे. विलास देवराव आदमाने वय-60 वर्षे (रा.पांगरा, चितेगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अदमाने हे चितेगाव येथे वाचमनची नोकरी करत होते. 25 जून रोजी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास … Read more

सिल्लोड तालुक्यात पिसाळलेल्या वानरांचा सुळसुळाट; पिसाळलेल्या वानरांने तोडला तरुणाच्या पायाचा लचका

औरंगाबाद : शेतामध्ये फवारणी करत असताना एका तरुण शेतकऱ्यावर पिसाळलेल्या दोन वानरांनी अचानक हल्ला केला आहे. यामध्ये वानरांनी त्याच्या पायाचे लचके तोडल्याने तरुणाच्या पायाला मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे. यामधील पिसाळलेला वानराने या अगोदर देखील धोत्रा परिसरातील एका महिलेवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील शेतकरी भागवत पाडळे वय 30 वर्ष (रा. … Read more

जुन्या मोंढ्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Suside

औरंगाबाद | राहत्या घरी छताच्या बल्लीला साडीच्या साहाय्याने गळफास घेत एका 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शहरातील जुना मोंढा भागातील तक्षशिलानगरमध्ये समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. किशोर पॉटर्स नाडे वय-35 (रा. तक्षशिलानगर, जुना मोंढा, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की,  किशोर हा एका … Read more

बामु विद्यापीठाच्या पेटसह पात्र विद्यार्थ्यांसाठी 15 जुलैपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ

bAMU

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ‘पेट’ साठी दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. पेटमध्ये पात्र तसेच पेट मधून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यास 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने पीएचडी एंन्ट्रन्स टेस्ट् (पेट पेपर पहिला व दुसरा) जानेवारी व मार्च महिन्यात 45 विषयात … Read more

एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेतर्फे बी. ए. आणि एम. ए. अॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमाला सुरुवात

MIT School of Indian Civil Service

औरंगाबाद | एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर येथील “एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस विद्याशाखेतर्फे बी. ए. एडमिनिस्ट्रेशन आणि एम.ए. एडमिनिस्ट्रेशन या दोन अभ्यासक्रमाची सुरुवात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली आहे. या विद्याशाखेतर्फे बारावीनंतर चार वर्षाचा बी. ए. हा पदवी अभ्यासक्रम आणि पदवीनंतर तीन वर्षाचा एम. ए. हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू … Read more

उद्या मराठा क्रांती मोर्चाला मिळणार नवीन दिशा; छ.संभाजीराजे मराठवाडा दौऱ्यावर

Maratha Kranti Morcha

औरंगाबाद | छत्रपती संभाजी महाराज मराठवाड्याच्या दौर्‍यावर येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि जिल्ह्यातील समन्वयक व समाजबांधवांची वेरुळ येथे बैठक होणार असून मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे … Read more

एन-6 संभाजी कॉलनीत ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर; पिण्यासाठी देखील दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Drainage water on the road

औरंगाबाद | सिडको एन-6 सेक्टर संभाजी कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसापासून ड्रेनेज लाईन चोकअप मधील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने सर्वत्र घाणीचे राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाण पाणी दारात वाचत असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे सुद्धा कठीण झाले आहे. काही दिवसापूर्वी अशीच एक घटना मथुरा नगर भागात घडली होती. पुन्हा एकदा असाच प्रकार संभाजीनगर … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 9 रुग्णवाहिकांचे उद्घाटन

Inauguration of ambulances

औरंगाबाद | येथील जिल्हा परिषदच्या प्रांगणात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 9 रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले. आज दुपारी दोन वाजता हे उद्घाटन करण्यात आले. या रुग्णवाहिका ग्रामीण भागामध्ये धावणार असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना काळात दिलासा मिळणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून ग्रामीण रुग्णालयासाठी मोठी मदत ठरणार आहे. तसेच ज्या गरोदर महिला आहेत … Read more

डॉ. बा.आ.म. विद्यापीठात यूजीसीने मनुष्यबळ विकास केंद्रात 20 कोर्सेसना दिली मान्यता

bAMU

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठतील मनुष्यबळ विकास केंद्रात 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये 20 कोर्सेसला मान्यता मिळाली आहे. वर्षभरातील अभ्यासवर्ग या वेळेसही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अशी माहिती संचालक डॉ. एन. बांदेला यांनी गुरुवारी दिली. गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्व कोर्स ऑनलाईन घेण्यात आले. विद्यापीठात तीन दशकांपासून एचआरडीसी सुरु आहे. विद्यापीठाणे 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी … Read more