13 वर्षीय शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू

Pazer lack

औरंगाबाद | मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भांबर्डा शिवारात घडली. साई कैलास भिसे (वय13) रा.भांबर्डा ता. जिल्हा औरंगाबाद असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी दुपारी आपल्या पाच मित्रांसोबत दुधड येथील लाहुकी नदीवरील सिमेंट बंधारा येथे तो पोहोण्यासाठी गेला होता. पण त्या ठिकाणी खूप … Read more

चिकलठाणा येथे होणाऱ्या क्रीडा संकुलाची शेतकऱ्यांकडून तोडफोड; 8 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

chikalthana police station

औरंगाबाद | चिकलठाणा येथील शासकीय गायरान जमिनीवर क्रीडा संकुल उभारण्याच्या अगोदर आम्हाला मोबदला द्या किंवा दुसरीकडे जमीन द्या. अशी मागणी सात ते आठ शेतकऱ्यांनी चार दिवसांपूर्वी कोणशीलेची तोडफोड केली आहे. त्याचबरोबर काम करणार्‍या मजुरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी एमआयडीसी चिकलठाणा येथे घडली. याप्रकरणी भाऊसाहेब रंगनाथ बर्थडे, प्रकाश बरडे, संजय बाबुराव … Read more

मॅफोड्रोनड्रग्स विकणारा तस्कर गजाआड; आयुक्तांच्या विशेष पथकाची कर्णपुऱ्यात कारवाई

Mafodrondrugs

औरंगाबाद | व्हाईट मॅजिक नावाने ओळखला जाणारा प्रतिबंधित मॅफोड्रोन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सापळा रचून कर्णपुरा मैदानातून गजाआड केले आहे.त्याच्या ताब्यातून अमली पदार्थासाहित सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. जुनेद खान जावेद खान असे अटक करण्यात आलेल्या विक्रेत्यांचे नाव आहे. … Read more

एक्स-बॅण्ड डॉप्लर रडार औरंगाबादमध्ये बसवावे – हवामान अभ्यासकांची मागणी

X-band Doppler radar

औरंगाबाद | मराठवाड्यातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे आहे. पण हा अंदाज मिळत नसल्याने मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी, ढगफुटी आणि पावसामुळे शेतीचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे मराठवाड्यातील हवामानाचे संशोधन आणि विश्लेषण होण्यासाठी एक्स-बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यात यावे, अशी मागणी शेतकरी, हवामानअभ्यासक आणि उद्योजकांकडून होत आहे. ‘हवामानाचा अचूक अंदाज, … Read more

सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्यास चोरट्यांची बेदम मारहाण; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर

Murder

औरंगाबाद | अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्यास चोरट्यानी दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत 25 वर्षीय पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीरपणे जखमी आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील खांबाला फाटा वस्तीवर घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की मग या मागे … Read more

नवीन रस्ता फोडल्याचे लक्षात येताच मनपा आयुक्तांनी केली जेसीबी जप्त

JCB

औरंगाबाद | एमजीएम समोरील कैलासनगरकडे जाणारा मुख्य रस्ता अँपल रुग्णालयाने फोडण्याचा प्रकार गुरुवारी मनपा शासनाच्या निर्दनाश आला. शहरात एकीकडे सिमेंटचे रस्ते तयार होत आहेत. त्याची काळजी न घेताच बेजबाबदारपणे रस्ते फोडण्यात आले. त्यामुळे मनपाकडून रस्ते फोडणारा जेसीबी जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. संबंधित अधिकारी व अँपल रुग्णालयाची चौकशी करून दोषी आढळ्यास … Read more

मनपाकडून औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी 70 कोटी रुपयांची तरतूद

aurangabad mahanagar

औरंगाबाद : महापालिकेने आपला स्वहिस्सा म्हणून 70 कोटी रुपयांची तरतूद स्मार्ट सिटीसाठी केली आहे. शहरात स्मार्ट सिटी अभियानातून विकास कामे होत असून जुलै महिन्यात ही रक्कम खर्च केली जाणार आहे. महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी याविषयी माहिती दिली. केंद्र सरकारच्या महत्वाशी स्मार्ट सिटी अभियानात औरंगाबाद शहराचा 2016 मध्ये समावेश करण्यात आला होता. … Read more

घाटी रुग्णालयातील कामगारांना कायमस्वरूपी करण्यासाठी खा. इम्तियाज जलीलसह आ. जैस्वाल यांना निवेदन

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय, औरंगाबाद येथील कोविड योद्धे कथित कंत्राटी कामगार यांना सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा या बाबतचे निवेदन गुरुवारी देण्यात आले. महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे खासदार इम्तियाज जलील व आमदार प्रदीप जैस्वाल यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात आयटक संघटनेकडून रु. 242/- रोजाच्या तोकड्या पगारावर हे 164 … Read more

पुन्हा एकदा 9 दुचाकीसह एक कार लंपास; वाहनचोरी रोखण्यात पोलीस यंत्रणा अयशस्वी

Bike

औरंगाबाद | गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. ही वाहनचोरी रोखण्यात पोलिस यंत्रणा अपयशी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात चोरट्यांनी 9 दुचाकी वाहने पळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. या प्रकरणी संबधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. युनूस शब्बीर खान पठाण (रा. चौकावाडी) यांची दुचाकी (एम एच 20 सी ए … Read more

औरंगाबाद ते मुंबई इंडिगोची विमानसेवा 12 जुलैपासून सुरू

औरंगाबाद : कोरोनामुळे बंद करण्यात आलेली औरंगाबादची हवाई सेवा पूर्वपदावर येत आहे. 12 जुलै पासून औरंगाबाद ते मुंबई विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. हाती आलेल्या माहितीनूसार आठवड्यातून चार दिवस ही सेवा सुरु असेल सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार ही सेवा सुरु राहणार आहे. कोरोनामुळे इंडिगोने औरंगाबादवरून सुरु असलेल्या सर्व सेवा बंद केल्या होती. काही दिवसापूर्वीच … Read more