गंगापूर तालुक्यातील कुख्यात दरोडेखोरांना पोलीसांनी केली अटक

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस स्टेशन हद्दीच्या परिसरात व इतर ठिकाणी चोरी, दरोड्यासारखे गुन्हे करून पळून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांची शिल्लेगाव पोलिसांनी गुप्तरित्या माहिती काढून त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. ताराचंद विरुपन भोसले, शक्तूर भोसले (दोघे रा. गाजगाव, ता. गंगापूर) या कुख्यात दरोडेखोरांच्या मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले … Read more

धूत हॉस्पिटल येथे 56 हजारासाठी अडवला मृतदेह

Dhoot Hospital

औरंगाबाद | कोरोनाची दुसरी लाट गेली असली तरी रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक सुरूच आहे. बुधवारी रात्री धूत हॉस्पिटलमध्ये पैठण तालुक्यातील चाळीस वर्षीय तरुणाचा मृतदेह 56 हजारांसाठी अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युवा सेनेच्या प्रशासनाला जाब विचारल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. धूत हॉस्पिटलमधील हि दुसरी घटना आहे. मागील महिन्यातच धूत हॉस्पिटमध्ये असाच एक … Read more

‘बाटु’चे मुख्य कार्यालय आता ‘इथे’ असणार; उदय सामंत यांची माहिती

uday samant

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल युनिव्हर्सिटीचे विभागीय कार्यालय औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु करण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. आता जिल्ह्यात शैक्षणिक संस्थेत वाढ होणार आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध शासकीय संस्थांचा आढावा सामंत यांनी बुधवारी घेतला. याबरोबरच तंत्रशास्त्र विद्यापीठ विभागीय … Read more

रेल्वे तिकीट बुक करून चढ्या भावाने विक्री करणारा तरुण गजाआड

औरंगाबाद : गेल्या एक वर्षापासून एक तरूण रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करत असल्याचे समोर आले आहे लासूर परिसरातील भानेवाडी येथील हा तरुण असून जास्तीच्या दराने दहा युजर आयडीच्या माध्यमातून तिकीट बुक करून देत असल्याचे रेल्वे सुरक्षा बलास समजताच त्याला अटक करण्यात आली. सागर त्रिभुवन (वय 24) रा. लासूर, (भानेवडी) असे काळाबाजार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याला … Read more

हृदयद्रावक! पाच लहान मुलांना सोडून आईवडिलांची आत्महत्या

suisaid

औरंगाबाद : पाच लहान मुले असून देखील आई- वडिलांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. संतोष कडू पाडळे (वय 38), संगीत संतोष पडले (वय 32) असे मृत पती पत्नीचे नाव आहे. नेहमीच्या कौटुंबिक भांडणाला कंटाळून ही आत्महत्या केली असल्याचे समजत आहे. ही सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव या ठिकाणी घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी … Read more

सलग दुसऱ्यादिवशीही लसीकरण ठप्प; केंद्र बंद तरी नागरिकांची गर्दी

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. लसीकरण हा एकच मार्ग नागरिकांना बाधित होण्यापासून वाचवू शकतो. तब्बल औरंगाबाद शहरात चार लाख लसीकरण झाले आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची गती पुन्हा मंदावणार असे दिसत आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी लसींचा पुरवठा न झाल्याने लसीकरण बंद पडले आहे. मात्र आज तरी लस मिळेल या … Read more

वाळूज महानगर प्रकल्प रद्दचा निर्णय; राज्य सरकार, सिडको, महापालिकेला हायकोर्टाने बजावली नोटीस

Waluj mahanagar

औरंगाबाद | सिडको वाळूज महानगर प्रकल्पाला 1991 पासून सुरुवात झाली होती. यात महानगर 1 आणि 2 उभारणीचे काम सुद्धा सुरु होते. परंतु मार्च 2020 मध्ये हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केली आहे. या सुनावणीत राज्य शासन आणि सिडको प्रशासन, औरंगाबाद महानगर … Read more

गतीमंद महिलेवर अत्याचार करणारा नराधम गजाआड; कॅफेचालकामुळे प्रकरण आले समोर

औरंगाबाद : शहरातील सिडको परिसरातील सतर्क कॅफेचालकामुळे गतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलीसांनी अटक केली आहे. आकाश उर्फ टोग्या भगवान तुपे (वय.२१, रा.एन.७ सिडको) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या फरार आरोपीचा पोलीसांकडून शोध सुरु आहे. कॅफेचालक त्याच्याकडील सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना त्याला हा धक्कादायक प्रकार दिसला. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत २४ तासांत … Read more

अँटिजेन चाचणी निगेटिव्ह अली तर आरटीपीसीआर करणे अनिवार्य

Corona Test

उस्मानाबाद : जिल्ह्याचे कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण विचारात घेण्यासाठी आरोग्य विभागाने आरटीपीसीआर तपासण्यांचाच निकष लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून, आता अँटिजेन तपासणी निगेटिव्ह आली तर आरटीपीसीआरसाठी सँपल घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिल्यात. त्यामुळे गेल्या आठवड्यात दररोज २०० पर्यंत होणाऱ्या तपासण्या आता ४०० वर पोहोचल्या आहेत. अँटिजेन … Read more

राज्यसरकारने भटके विमुक्त व ओबीसींची दिशाभूल थांबवावी -डॉ. धर्मराज चव्हाण

औरंगाबाद : आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात अली. डॉ. धर्मराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात अली. भटके विमुक्तांचे व ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व हलगर्जीने रद्द झाले. असे चव्हाण यांचे म्हणणे आहे . ओबीसीच्या व भटके विमुक्तांच्या नावाखालीजे आरक्षणाचे लढे उभे राहत आहेत. ते सर्व लढे जनतेची … Read more