औरंगाबादमध्ये पोलीस सप्ताहाचं उद्घाटन, पोलिसांच्या कामगिरीवर प्रकाशझोत

२ जानेवारी हा पोलीस स्थपना दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने पोलीस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज या सप्ताहाचे उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.

नरेंद्र मोदींच्या रुपाने ‘हिटलर’चा पुनर्जन्म – जितेंद्र आव्हाड

औरंगाबाद, हॅलो महाराष्ट्र टीम – नरेंद्र मोदींच्या रूपाने हिटलरचा पुनर्जन्म झाल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. औरंगाबाद येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आयोजित केलेल्या मोर्चात ते बोलत होते. आजही आसाममधील १४ लाख हिंदूंकडे कागदपत्रे नाहीत. आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या अनेक परिवारांकडे, भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, ते लोक जुने पुरावे कोठून … Read more

औरंगाबादध्ये गुप्तहेराच्या माहितीवरुन दोन वाहन चोऱ्या उघड, दोघांना अटक

गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार जिन्सी गुन्हे शोध पथकाने दोन आरोपी ताब्यात घेवुन कारवाई करत त्यांचेकडुन दोन मोटारसायकल आणि तीन हातगाडी जप्त केल्या आहेत. जिन्सी पोलीस ठाणे येथील दोन आणि जवाहर नगर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा यामुळे उघडकीस आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची धडप; मोर्चेबांधणीला सुरुवात

राज्यात नव्या आघाडीमुळे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणे बदलायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखण्यात येत आहे.

 परीक्षेच्या तणावामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मृत अक्षय हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरचे शिक्षण घेत होता. शेवटच्या वर्षाचे त्याचे सहा विषय राहिले होते. त्यामुळे तो पाच ते सहा दिवसांपूर्वीच बीडहुन औरंगाबादेत राहणाऱ्या चुलत भाऊ जयदीप मानेकडे राहायला आला होता

 लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेचे लैंगिक शोषण,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल  

 शहरातील रेल्वस्टेशन परिसरातील पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लॉजमध्ये नेऊन लैगिंक शोषण करणाऱ्या नराधमाविरोधात वेदांतनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदविला. व्यवसायात दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून या महिलेचे २ लाख रुपये घेऊन फसवणूकही केल्याचेही समोर आले आहे. शेख जुबेर शेख अब्दुल अजीज असे या आरोपीचे नाव आहे.

कुंटणखान्याच्या दलालांना ग्राहक पुरवणारा अटकेत; पोलिसांची तडकाफडकी कारवाई

औरंगाबाद शहरातील बीड बायपास रोडवरील राजेशनगर आणि यशवंतनगर भागातील कुंटणखान्याच्या दलालांना ग्राहक पुरविण्याचे काम करणाऱ्या एजंटच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. मनोज जाधव असे संशयिताचे नाव असून, तो ग्राहकांनाही महिलांचे फोटो पाठवत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कुंटणखान्यावर ७ डिसेंबरला छापा टाकून चार दलाल आणि ग्राहकांना ताब्यात घेतले आहे.

बँकमधील सायरन वाजू लागल्याने मध्यरात्री खळबळ; पोलीस,नगरसेवकांची पळापळ

बँकमधील एटीएम मशीनच्या सुरक्षेसाठी एटीएम सेंटर मध्ये सायरन लावल्याचे सर्वत्र पाहण्यात येत. मात्र अशा एका सायरनमुळे रात्री सर्वांना कश्या पद्धतीने मनस्ताप होऊ शकतो याचा प्रत्यय सिडको एमआयडीसी च्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना आला. एन-१ परिसरातील सिंडीकेट बँकेचा सायरन शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास अचानक वाजण्याचा सुरू झाला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. सायरनचा आवाज आल्याने स्थानिक नगरसेवक मनोज गांगवे, विशाल गंगावणे, गणेश गांगवे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तिथे कोणीच नसल्याचे आढळून आले.

बेपत्ता पत्नीच्या शोधात पती हैराण; पोलिसांना काही पत्ता लागेना

शहरातील एका खासगी सुरक्षा रक्षकाची पत्नी जुलैमध्ये बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांना अजूनही त्याचा शोध लागला नाही. या प्रकरणात तक्रारदार पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. न्यायालयाने पोलिस आयुक्त, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी तपासाबाबत काय पावले उचलली आहेत. अशी विचारणा करत १३ डिसेंबरपर्यंत अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते.

४ थ्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू;कामगार सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या इमारतीचे रंगकाम करणाऱ्या कामगाराचा चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यासंदर्भात क्रांती चौक पोलीस ठाण्यात हा घटनेची नोंद करण्यात आली आहे.