राज्यपालांनी सरकारच्या अजेंड्यावर चालायचे असते, विरोधी पक्षाच्या नाही – शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरकारी विमान वापरण्याच्या मुद्यावरुन सध्या राज्यपाल भगतसिंग कोशारी विरुद्ध ठाकरे सरकार असा नवीन वाद रंगला आहे. मुंबई विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरुवारी सरकारी विमानातून प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली. त्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या मुद्यावरुन सत्ताधारी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. .राज्यपालांचा हा अपमान असल्याचा आरोप भाजपने केला. … Read more

अखेर राज्यपाल स्पाईसजेटच्या विमानाने उत्तराखंडकडे रवाना

मुंबई । महाराष्ट्र सरकारने सरकारी विमानाने प्रवास करण्याला परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. स्पाईसजेट कंपनीच्या विमानाने राज्यपाल कोश्यारी मुंबईहून डेहराडूनला रवाना झाले. राजभवनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सरकारी विमानाने उत्तराखंडला निघाले होते. राज्यपाल कार्यालयाने आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. राज्यपाल … Read more

राज्यपाल vs ठाकरे सरकार वाद पेटणार ; राज्यपालांच्या विमानप्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद वाढत चालला आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. … Read more

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही ; शरद पवारांनी डागली तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून मुंबई मध्ये शेतकऱ्यांनी किसान मोर्चा काढला आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले. यावेळी शरद पवार … Read more

राज्यपालांनी घटनेचा खून करु नये ; संजय राऊतांची सडकून टीका

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यापालांनी घटनेचा खून करु नये अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न जाणून-बुजून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. विधनापरिषदेच्या 12 जागा 10 महिने झाले तरी रिकाम्या कशा ठेवू शकता असे विचारत घटनात्मक पदावर बसून घटनेचे मारेकरी होत आहात का? … Read more

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन ; मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांनी केलं अभिवादन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर किशोरी पेडणेकर, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. तर आरपीआयचे नेते रामदास आठवले हे देखील चैत्यभूमीवर येत अभिवादन … Read more

अर्णब गोस्वामी प्रकरणात राज्यपालांची उडी ; गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन करून अर्णबची सुरक्षा आणि आरोग्याबाबत व्यक्त केली चिंता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच घटनेवरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप शिवसेनेवर टीका करत आहे. अर्णबच्या अटकेवरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत आता राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही उडी घेतली आहे. कोश्यारी … Read more

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ असून त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे, ते आमच्या 12 सदस्यांची नावं नाकरणार नाहीत – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ आहेत. राज्यपाल घटनाबाह्य काम करणार नाहीत.  राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते राज्यापाल नियुक्त 12 सदस्यांची नावं नाकरणार नाहीत,” अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच “अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या स्पष्टवक्ता असल्यामुळे त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल,” असेही राऊतांनी … Read more

‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय राऊतांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  राज ठाकरेंनी राज्यपालांना थेट भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे वक्तव्य  शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊतांच्या विधानाला मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंह … Read more

राज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढीव बिल संदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला राज ठाकरे म्हणाले. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. भाजपचे बहुतेक नेते पवारांना मोठा नेता मानतात. आता राज्यपालही शरद पवारांना नेता मानत असतील तर आनंदच आहे, … Read more