आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार- बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीमध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे. नुकतंच झालेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून दमदार कामगिरी करणाऱ्या भास्कर जाधव यांनी पुन्हा हे पद स्विकारन्याची तयारी दर्शवली पण वनखाते काँग्रेसला देऊन विधानसभा अध्यक्षपद नको अशी भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान याबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना विचारल असता त्यांनी स्पष्टच प्रतिक्रिया दिली. … Read more

भास्कर जाधवांची दुसऱ्या दिवशीदेखील बॅटिंग, भाजपची अभिरुपविधानसभा उधळवली

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. तोदेखील वादळी स्वरूपाचा ठरला आहे. भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने प्रतिविधानसभा भरवली होती. यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देत भाजपची प्रतिविधानसभा बंद केली. भाजपच्या आमदारांनी आज सकाळी सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. विरोधी … Read more

रवी राणा यांनी राजदंड पळवला, कोणत्याही स्टंटबाजीला थारा दिला जाणार नाही- भास्कर जाधव यांनी ठणकावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण होता. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं होत. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला सुरुवात होताच भाजप आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवला. या घटनेनंतर तालिका अध्यक्ष यांनी संताप … Read more

हा तर पळपुट्यांचा रडीचा डाव ; निलंबनानंतर भातखळकर आक्रमक

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात ठाकरे सरकार वर सातत्याने टीका करणाऱ्या अतुल भातखळकर यांचाही समावेश आहे. दरम्यान या कारवाई नंतर भातखळकर आक्रमक झाले असून हा तर पळपुट्यांचा … Read more

विरोधी आमदारांनी मला शिवीगाळ केली, राज्याच्या इतिहासात असं कधी झालं नाही; भास्कर जाधवांनी विरोधकांना सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. त्यावेळी त्यांनी मला आई बहिणीवरून शिवीगाळ केली असा गंभीर आरोप करत संभागृहातील हे वर्तन लांछनास्पद असून काळिमा फासणारी आहे आहे असे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हंटल. भास्कर जाधव म्हणाले, विरोधी आमदारांनी मला शिवीगाळ केली ठराव मांडण्याआधीच विरोधकांनी गदारोळ … Read more

विधानभवनात भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन … Read more

लोकांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? पोलीसही हप्ते घेतातच ना ? भास्कर जाधवांचे धक्कादायक वक्तव्य

रत्नागिरी । ‘लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडले, पोलीसही हप्ते घेतातच ना!’ असं वादग्रस्त विधान शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. . भास्कर जाधव यांनी आपल्या गुहागर मतदरासंघातील एका राजकीय कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. भास्कर जाधव यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे अवैध दारुविक्रीसाठी कारवाई झालेल्या एका शिवसेना पदाधिकाऱ्याची … Read more

आइस्क्रीमवर 10 रुपये जास्त घेणे ‘या’ रेस्टॉरंटला पडले महागात, 10 रुपयांसाठी ठोठावण्यात आला 2 लाख रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई सेंट्रल मधील शगुन व्हेज रेस्टॉरंटमध्ये 6 वर्षांपूर्वी आईस्क्रीम पॅकेटवर दहा रुपये जास्तीचे आकारणे महागात पडले. जिल्हा फोरमने या रेस्टॉरंटला यासाठी सुमारे 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, फोरमने ग्राहकांना नुकसान भरपाईचे आदेश देखील दिलेले आहेत. फोरमने आपल्या आदेशानुसार असे सांगितले की, 24 वर्षांपासून रेस्टॉरंटला दररोज सुमारे 40 ते 50 … Read more

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे ‘हे’ ६ आमदार नाराज, सामनातूनही नाराजीचा सूर

मुंबई । महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत अनेकजण नाराजी असल्याची माहिती समोर येते आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्यांना संधी न देता पक्षाने तीन अपक्ष आमदारांना संधी दिल्याने हा नाराजीचा सूर आहे. एकीकडे मुंबईतून सुनील राऊत यांना संधी न मिळाल्याने ते … Read more

आपलं अस्तीत्व टिकवण्यासाठी राणेंची केविलवाणी धडपड; भास्कर जाधवांची टीका

ठाकरे सरकार न म्हणता राज्यसरकार म्हणावं असा आक्षेप राणेंनी घेतला  होता. त्यावरून जाधव यांनी राणेंचा चांगलाच  समाचार घेतला आहे