सोलापुरात आ. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

सोलापूर | भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर  शहरातील मड्डीवस्ती परिसरात दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे. याप्रकारामुळे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दगडफेकीचा प्रकार झाला आहे. ओबीसींच्या आरक्षण प्रश्नावर विविध सामाजिक संघटना तसेच ओबीसी प्रवर्गातील लोकांशी चर्चा करण्यासाठी … Read more

शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी, मी लहान असल्यापासून ते भावी पंतप्रधान आहेत : गोपीचंद पडळकर

सोलापूर | शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, मी लहान असल्यापासून ते भावी पंतप्रधान आहेत. तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं म्हणत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

राज्य सरकारच मराठा आरक्षणाविरोधात असून मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत : पडळकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून आघाडी सरकारवर विरोधकांकडून जोरात टीका केली जात आहे. आघाडी सरकार मराटह आरक्षण देण्यास अपयशी ठरल्याचाही आरोप काहींकडून केला जातो आहे. यात आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “मराठा आरक्षण व ओबीसींच्या विरोधात राज्य सरकार असून या सरकारमधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत आहे” … Read more

शरद पवारांची बदनामी करण्यासाठी भाजपने पडळकरांना आमदारकी दिली; मुश्रीफांनी फटकारले

musriff padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवारांची बदनामी करण्यासाठी भाजपने पडळकरांना आमदारकी दिली असून गोपीचंद पडळकर याना गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना फटकारले आहे. शरद पवारांमुळेच आरक्षण मिळालं नाही असा आरोप पडळकरांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले, पवारसाहेब मुख्यमंत्री नाहीत आणि पंतप्रधानही नाहीत, त्यांच्यामुळे … Read more

जर सगळं गावच करणार असेल तर सरकार काय करील? पडळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने कोरोनामुक्त गाव ही स्पर्धा आयोजित केली असून पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावरून ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल … Read more

मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही- गोपीचंद पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्ष भाजप कडून सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष्य केले जात असतानाच आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही असे पडळकर म्हणाले. महाविकास आघाडी सरकारला … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलं असताना आता ओबीसी प्रवर्गातील पदोन्नतीतील आरक्षणावरून सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सभागृहाने कायदा मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सभागृहाची होती, … Read more

सरकारला दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या मेव्याचा हेवा; पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी ठाकरे सरकारने चंद्रपूर मधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. वसुली सरकारला काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ आहे. सरकारला हा मेवा … Read more

महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपलेत? ; भाई जगतापांचा पडळकरांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील भाजचे आमदार गोपीचंद पडळकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पत्र लिहून निशाणा साधला होता. त्यानंतर आता काँग्रेसनेते भाई जगताप यांनी पडळकरांवर टीका केली आहे. “राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे…केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या … Read more

अजित पवार तुम्हाला आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतोय का? : गोपीचंद पडळकरांचा पत्राद्वारे सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर येथील पोट निवडणुकीत विजय प्राप्त केलेले भाजचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून महाविकार आघाडी सरकारवर वारंवार टीकास्त्र डागले जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पडळकरांनी पत्र लिहले असून त्यातून सरकारी नोकरीमध्ये असलेल्या पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द झाल्याच्या कारणांवरून निशाणा साधला आहे.  “दादा ! बहुजनांचे हक्क आणि अधिकार हे तुम्हाला बारामतीची जहागिर … Read more