भविष्यात सेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या..

मुंबई । भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिदिनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मृतिस्थळावर अभिवादन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नावर पंकजांनी सूचक प्रतिक्रिया दिली शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही. शिवसेना-भाजपची युती 2014मध्येही … Read more

शिवसेनेसोबत एकत्र एकत्र येण्याच्या वक्तव्यावरून चंद्रकांतदादांचा यु-टर्न, म्हणाले..

पुणे । राज्यातील जनतेच्या हितासाठी आजही आपण शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य नुकतचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरुन आता पाटील यांनी यु-टर्न घेतला आहे. माझं विधान उलट्या पद्धतीने माध्यमांनी दाखवलं असं सांगत शिवसेनाच काय इतर कुठल्याही पक्षाला आमचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं ते म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी … Read more

चंद्रकांतदादांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! रोहित पवारांनी काढला चिमटा

पुणे । विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०५ आमदार निवडून आल्यानंतरही राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्याने भाजप नेत्यांमधील अस्वस्थता पावलोपावली दिसत असते. त्यातूनच एखाद्या नेत्याचं विधान येतं आणि मग त्यानंतर महाविकास विरूद्ध भाजपा यांच्यात कलगीतुरा बघायला मिळतो. काल मंगळवारी अचानक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यास तयार असल्याचं विधान केलं होतं. या विधानावरून कर्जत जामखेड मतदारसंघाचे … Read more

शिवसेनेसोबत एकत्र येण्याच्या चंद्रकांतदादांच्या विधानाची फाडणवीसांनी काढली हवा, म्हणाले..

मुंबई । विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०५ आमदार निवडून आल्यानंतरही राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्याने भाजप नेत्यांमधील अस्वस्थता पावलोपावली दिसत असते. त्यातूनच एखाद्या नेत्याचं विधान येतं आणि मग त्यावरून चर्चांना ऊत येतो. असाच काहीसा भाजपमधील विसंवादाचे दर्शन घडवणारा प्रकार आज घडला. ‘राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार आहोत’, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. … Read more

शिवसेनेसोबत पुन्हा एकत्र यायला तयार, मात्र..; चंद्रकांतदादांनी दिली युतीच्या चर्चांना हवा

मुंबई । राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. पण एकत्र आल्यावर निवडणुका मात्र एकत्र लढवणार नाही, तर स्वतंत्रपणे निवडणुका लढवू, असं सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil)यांनी शिवसेना-भाजप(shivsena-bjp) युतीच्या चर्चांना हवा दिली आहे. पाटील यांचं हे वक्तव्य आल्यानंतर तर्कवितर्क वर्तविले जात असून भाजपने आता नमती भूमिका घेतल्याचं जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना … Read more

फडणवीसांनी टाकला बॉम्ब! म्हणाले, २ वर्षांपूर्वीचं राष्ट्रवादीची भाजपसोबत येण्याची इच्छा होती, पण..

पुणे । २ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती. पण भाजपा नेतृत्वाने शिवसेनेला सोडायला नको अशी आम्ही भूमिका घेतल्याचा गौप्यस्फोट विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते आज पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही दोन वर्षापुर्वी राष्ट्रवादी सोबत गेलो असतो असं वक्तव्य केलं आहे. ही मुलाखत … Read more

मला खोटं पाडल्याबद्दल फडणवीसांचं आभार; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

शिवसेनाप्रमुखांना मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसवेनच असं वचन दिलं होतं. आता ते वचन पाळण्याची जबाबदारी माझी आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी माझी भूमिका ऐकली होती आणि त्यावर त्या दोघांचं एकमत होत नव्हतं. स्वतःला पक्षात अडचण येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मलाच खोटं ठरवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही ठाकरे पुढे म्हणाले. पद आणि जबाबदऱ्यांचं सम-समान वाटप हे ठरलं होतं, आणि आता हेच ते नाकारत असतील तर मी काय बोलणार असं म्हणत गोड बोलून आम्हाला नेहमी फरफटायला लावणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आज उघडकीस आला असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

संजय राऊत पवारांच्या भेटीला, शिवसेना राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करणार?

राज्यात सत्तस्थानेसाठी काहीच अवधी उरला असताना आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपसोबत अजूनही जुळत नसल्याने तसेच मुख्यमंत्रीपदावर शिवसेना अजून असून बसली आहे. या सर्व घडामोडीत आता ट्विस्ट म्हणजे संजय राऊत शरद पवार यांच्या भेट घेत आहेत.

भाजपचा जाहिरनामा नव्हे तर जुमलानामा आहे- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

भाजपने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला जाहीरनामा संकल्पपत्र नावाने प्रसिध्द केला आहे. मात्र हा प्रसिध्द करण्यापूर्वी त्यांनी सन २०१४ च्या निवडणुकीचा जाहिरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यातील अनेक आश्वासने ही २०१४ च्या निवडणुकीत दिलेली होती. मग ही आश्वासने पाच वर्षात का पूर्ण केली नाहीत? त्यांचे हे अपयश आहे, यावर्षीचा त्यांचा जाहिरमाना म्हणजे ‘जुमनलानामा’ असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार बैठकीत लगावला.

अहो पाटील कोथरूडवर बोलू काही! ‘आप’ उमेदवार अभिजित मोरे यांचे चर्चेचे आवाहन

पुण्यातील कोथरूड मतदार संघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार अभिजित मोरे यांनी भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांना कोथरूडच्या मुद्द्यांवर बोलण्याचे आवाहन केले आहे. कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर चर्चेसाठी येण्याचे आवाहन त्यांनी सोशल मीडिया व पत्रकारांच्या द्वारे केलं होतं.