आमचं स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे;मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार
उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी मराठीत केलेल्या भाषणाचा दाखल देत, राज्यपालांनाही सत्ताबदलाचे वारे समजू लागले असल्याचा चिमटा काढला आहे.
उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी मराठीत केलेल्या भाषणाचा दाखल देत, राज्यपालांनाही सत्ताबदलाचे वारे समजू लागले असल्याचा चिमटा काढला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सामनाच दाखल देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्याचा आता ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?’,फडणवीसांच्या या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
आष्टा येथील भाजपचे माजी पदाधिकारी प्रवीण माने यांच्यासह सात जणांच्या टोळीवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. सांगलीसह कोल्हापूर, सातारा तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी ही कारवाई करण्यात आली. दत्तात्रय कोळेकर, अनिल गावडे, सचिन रास्कर, काशिनाथ ढोले, शोएब सनदी आणि उमेश रास्कर अशी टोळीतील अन्य गुन्हेगारांची नावे आहेत.
यावेळी ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो’ अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. तसेच ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
भाजप सरकारकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात असून याची सुरवात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने झाली आहे. हि बाब लोकशाही साठी योग्य नाही. औरंबाद शहरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात २० तारखेला मोर्चा काढ्यात येणार आहे.
बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ काम केलेल्या अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, करण जोहर, हृतिक आणि राकेश रोशन, अक्षय कुमार यांच्याकडून मात्र देशभरातील हिंसक वातावरणावर अद्यापही प्रतिक्रिया आलेली नाही
भाजपला महाराष्ट्रात उभे करण्यात खडसेंचाही वाटा आहे. मागील ४५ वर्षाहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र गेल्या ५ वर्षात खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत.
दोन दिवसापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनात विधीमंडळात पहिल्याच दिवशी विरोधकांनी सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीचे विधिमंडळाच्या कामकाजास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.
मराठवाड्यातील नेते सुजितसिंह ठाकूर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानण्यात येत होते. परंतु एका रात्रीत ठाकूर यांच्या ऐवजी दरेकर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन’ ही घोषणा चांगलीच गाजलेली होती. परंतु निकालानंतर भाजप ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार आल्याने सत्ताधाऱ्यांकडून या घोषणेची खिल्ली उडवण्यात आली