भाजप सेनेच्या आमदारांची सभागृहातच हाणामारी; जयंत पाटील, फडणवीस धावले मदतीला

टीम, HELLO महाराष्ट्र| सोमवार पासून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने सावरकरांच्या मुद्यावरून आक्रमक पवित्र घेत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर आज विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली. या वेळी सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेच्या आणि भाजपच्या आमदारांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. … Read more

भारत रशियाकडून खरेदी करणार आण्विक पाणबुडी; पश्चिम समुद्री ताफ्याची मागणी

सातत्याने शत्रूराष्ट्राकडून घुसखोरीची शक्यता असलेल्या पश्चिम समुद्री ताफ्याला आता आण्विक पाणबुडी मिळण्याची अपेक्षा आहे. अशी पाणबुडी रशियाकडून खरेदी करण्याचा करार अंतिम टप्प्यात आला असून, ही पाणबुडी याच महिन्यात नौदलाकडे सुपूर्द होणार आहे. त्यानंतर ती महिनाभरात मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

मासळी विक्रेती आई आणि बस कंडक्टर बापाचा मुलगा विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी

आपला प्रवास सांगत असताना दरेकर यांनी शिवसेनाप्रमुखाचं प्रेम, राज ठाकरेंचं मार्गदर्शन आणि देवेंद्र फडणवीस यांचं सहकार्य याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. पदावर निवड झाल्यानंतर इतर पक्षातील नेत्यांनी दरेकर यांचं अभिनंदन केलं.

उन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सेंगर दोषी, शिक्षा काय होणार याकडे देशाचं लक्ष

उन्नावमध्ये ४ जून २०१७ रोजी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निकाल आज दिल्ली न्यायालयाने दिला असून भाजप आमदार कुलदीप सेंगरला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे.

‘पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’; चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे. ‘पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’ असा सज्जड दम पाटील यांनी दिला आहे. सोलापूरमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यावेळी संवाद साधताना ते बोलत होते.

मी पंकजा मुंडेंच्या मागे होतो, आहे आणि राहील; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी आम्ही संवाद साधू. पंकजा मुंडे यांना जेव्हा जेव्हा टार्गेट केलं गेलं तेव्हा मी कायमच त्यांच्या बाजूने उभा राहिलो आहे. त्यामुळे माझ्या मनात पंकजा मुंडे यांच्याबाबत आदराचीच भावना आहेच,

किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना पत्र; करून दिली जुनी आठवण

शिवसेना आणि भाजपाने एकत्र मिळून बांग्लादेशी घुसकोरांविरुद्ध आवाज उठवला होता. शिवाजीनगर, गोवंडी, चांदिवली, मुबई, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणी बांग्लादेशी नागरिकांनी घुसकोरी केली आहे.

‘खडसेंना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले असते, तर भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का?’

‘पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात, अशा शब्दात नागपूर मधील एका वृत्तपत्राने या दोघांवर निशाणा साधला आहे.

परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजप खासदाराची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत, त्यांच्या मुलानं असं विधान करणं त्यापेक्षा दुर्दैवं ते काय?. तसेच राहुल गांधींच्या विधानानं मी दुःखी असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे

अखेर फिरोदिया करंडक साठी विषय निवडीचे निर्बंध मागे

स्पर्धेच्या आयोजकांकडून जात, धर्म व्यवस्था, काश्मीर ३७०, भारत-पाक, हिंदू-मुस्लीम, राम मंदिर-बाबरी मशीद या विषयांवर एकांकिका सादर न करण्याचे निर्बंध घालण्यात आले होते.