शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेबांना दिलेलं वचन – उद्धव ठाकरे

 मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आहे असे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेसोबत काही बोलणेच झाले नाही असे म्हणल्यानंतर ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत फडणवीस घोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. … Read more

उद्धव ठाकरेंनी माझे फोनच घेतले नाहीत; त्यांचे नेते मात्र खालच्या पातळीवरचे आरोप करतच राहिले

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.

शिवसेनेला आमच्याशी चर्चा नकोच होती; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ४ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोषयारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला. महाराष्ट्राच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. सोबत काम केलेल्या मंत्रिमंडळाचेही त्यांनी आभार मानले. शिवसेना सोबत होती असं तुम्हाला वाटलं तर त्यांचंही आभार अशी कोपरखळी फडणवीसांनी यावेळी लगावली. यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करणंही फडणवीसांनी टाळलं.

फडणवीसांचे ‘ते’ विधान मागे घेण्यासाठी तयार होत आहे मसुदा

भाजप-सेनेमधील मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून शिवसेनेशी संपर्क साधण्याचे प्रयन्त केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा पेच मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु आहेत.वर्षा बंगल्यावर भाजपच्या नेत्यांची बैठक सुरु आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार ?

सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेना यांच्यात अजूनही दिलजमाई झालेली नाही आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदावर आपला दावा सोडायला तयार होताना दिसत नाही. तर भाजपा एक पाऊल मागे येऊन शिवसेनेच्या मागणीला दाद देतांना दिसत नाही आहे. अशा सर्व परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

संजय राऊतांनी शेअर केले भाजपाला डिवचणारे व्यंगचित्र

काल जाहीर झालेल्या विधानसभा निवडणु निकालात शिवसेना-भाजपाच्या महायुतीने मोठे यश मिळवले. असे असले तरी सुद्धा ‘आघाडी’ने सर्वांना जोरदार धक्का दिला आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. महायुतीची अब कि बार २२० पार ची घोषणा हवेत विरली असून, भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागांवर मर्यादित राहावे लागले. त्यामुळे शिवसेनेनंही मुख्यमंत्रिपदासाठी भाजपावर आतापासूनच दबाव टाकण्यास सुरुवात केले आहे.

आता नमतं घ्यायची वेळ भाजपची; मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

लोकसभा निवडणुकीच्या वेळी युतीचा फॉर्म्युला निम्मा निम्मा असाच ठरला होता. जागा वाटप करताना आम्ही कमी जागा घेतल्या. आता मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केली जाणार नाही. अमित शहा आता बोलणी करायला येतील त्यावेळी पारदर्शकतेने काय निर्णय घ्यायचा तो विचार करू असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या निकालाने आमचे डोळे उघडले असल्याचं सांगितलं आहे.

२०१९ विधानसभा निवडणूकीचा खराखुरा निकाल पहा फक्त इथेच..!!

आज विधानसभा निवाडणुकांचा निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल.

उस्मानाबादमध्ये पायाला मोबाईल बांधून भाजप कार्यकर्ते मतदानकेंद्रात; पोलिसांकडून हकालपट्टी

उस्मानाबादमध्ये मतमोजणीला जाताना भाजप कार्यकर्त्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नितेश राणेंच्या प्रचारात ‘तडीपार’ आरोपी सहभागी; शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा आरोप

राज्यातील विविध भागांतील हद्दपार झालेले आरोपी नितेश राणे यांच्या प्रचारात सहभागी आहेत. आणि ते राजरोसपणे पैसे वाटण्याचे काम करत आहेत असा आरोप सतीश सावंत यांनी केला. सावंत यांच्या आरोपानंतर मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे.