दिवसा माझ्याशी चर्चा केलेल्या नेत्याच्या घरी रात्री इन्कमटॅक्सची माणसं पोहचतातच कशी? – शरद पवार

चंद्रकांत पाटील यांनी पवारांना घरभेदी अशी उपमा दिली होती, शिवाय पवारांनी जे पेरलं तेच उगवलं असा उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावर उत्तर देताना पवारांनी मीच गोपीनाथ मुंडेंना भाजप सोडू नका असं सांगितलं होतं असं स्पष्टीकरण दिलं.

मित्रपक्षांचा गेम करत भाजपने बळकावल्या परभणीतील २ जागा; ४ मतदारसंघात ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

परभणी जिल्‍ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.

आम्हाला विकत घेतो काय? शेतकर्‍यांच्या पोरांचा सुजय विखेंना २ हजाराचा चेक

तुमच्या २ हजार रुपयांची भीक आम्हाला नको अस उत्तर देतानाच शेतकऱ्याने २ हजार रुपयांचा चेकही सुजय विखेंच्या नावाने पाठवला आहे.

उदयनराजेंचं कमळ फुलणार का रुतून बसणार ?? पुरुषोत्तम जाधवांचा उदयनराजेंविरूद्ध तिसऱ्यांदा शड्डू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचं मजबूत आव्हान एका बाजूला उभं असताना खंडाळ्याच्या घाटात उदयनराजेंना गाठण्याचं काम पुरुषोत्तम जाधव यांनी हाती घेतलं आहे.

अंदाधुंद गोळीबाराने भुसावळ हादरले; भाजप नगरसेवकासह कुटुंबातील चौघे ठार

भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात रवींद्र खरात (५०), त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (५५), मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) असे चौघेजण ठार झाले आहेत.

राष्ट्रवादी हा मतांची गणितं जुळवून दगाबाजी करणारा पक्ष – सुधीर कोठारी

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून ऐन वेळी तिकीट कापले गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुधीर कोठारी यांनी बंडखोरी केली आहे.

अपक्ष रोहित पवारांचा अर्ज छाननीत बाद

कर्जत प्रतिनिधी |कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांनी दाखल केलेला अर्ज बाद झाला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा डमी म्हणून रोहित पवार या कर्जतचा रहिवाशी असणाऱ्या व्यक्तीने अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. उमेदवारी अर्जाला जोडून देण्यात आलेले प्रतिज्ञा पत्र अपूर्ण असल्याने रोहित पवार यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. २२७ कर्जत-जामखेड विधानसभा … Read more

बारामती : राष्ट्रवादीत खळबळ ; अजित पवारांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही करणाऱ्याने केला पडळकरांचा सत्कार

पुणे प्रतिनिधी | बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा सतीश काकडे यांनी सत्कार केला आहे. त्यांनी पडळकरांचा सत्कार केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. सतीश काकडे यांनी अजित पवारांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही केली आहे. काकडे आणि पवार कुटुंबात जुना राजकीय संघर्ष आहे. १९६७ सालापासून हा संघर्ष अविरत सुरु … Read more

राष्ट्रवादीला धक्का : पुणे जिल्ह्यातील या मतदारसंघातून उमेदवाराचा अर्ज झाला छाननीत बाद

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे उपनगरात भाजपमुळे गंभीर परिस्थिती झाल्याचे चित्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळीच दिसले होते. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानण्यात येते आहे. राष्ट्रवादीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांनी उमेदवारी अर्जाला पक्षाचा एबी फॉर्म … Read more

दोस्तीत कुस्ती ; पुण्याच्या या मतदारसंघात लढणार तीन सख्खे मित्र एकमेकांच्या विरोधात

पुणे प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल शुक्रवारी संपली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे बरेचसे चित्र सध्या स्पष्ट झाले आहे. पुणे शहरात एकाच मतदारसंघात सख्खे तीन मित्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे .त्यामुळे पुणे तिथे काय उणे या म्हणीचा साक्षात्कार विधानसभा निवडणुकीने देखील करून दिला आहे. पुणे कॅटलमेंट बोर्ड … Read more