सरकारने विद्यार्थ्यांना मोफत टॅब द्यावेत; महाराष्ट्र पदवीधर संघटनेच्या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

मुंबई । गेवराई तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची दखल घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोफत टॅब उल्पब्ध करून देण्याबाबत, महाराष्ट्र पदवीधर संघटनेने पुढाकार घेत शासनाला विनंती केली होती. या पत्राची शासनाने त्वरित दखल घेतली आहे. कोरोना पार्श्वभूमीमुळे राज्यात प्रत्यक्ष शाळा महाविद्यालये सुरु करण्यात आलेली नाहीत. मात्र ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. गेवराई तालुक्यात … Read more

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा व्यवस्थेत वाढ

लखनऊ । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लखनऊमधील कालिदास मार्गावरील घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्यानंतर कालिदास मार्गाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. एका कॉल सेंटरवरून ही धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. आज तक या वृत्तवाहिनीनं याबाबतच वृत्त दिल आहे. यापूर्वीही त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कॉल सेंटरवरील या धमकीनंतर लखनऊच्या कालिदास … Read more

निसर्ग चक्रीवादळाची भीती: मुंबईसह इतर भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात 

वृत्तसंस्था। अरबी समुद्रात ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी दिली होती. केरळ किनारपट्टीवरचा कमी दाबाचा पट्टा ज्यावर महाराष्ट्रातील मान्सून अवलंबून होता. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होता. या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे गेल्या १०४ … Read more

शाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar

पुणे । राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होणार का? त्यांचे वर्ग कसे भरणार? असे बरेच प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक याना पडले होते. या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होत्या. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत. १ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु … Read more

महाराष्ट्रात विमान सेवेला अद्याप परवानगी नाही – राज्य सरकार

वृत्तसंस्था । देशातील प्रवास वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु केली जात आहे. त्यानुसार रेल्वेच्या घोषणा करण्यात आल्या होत्या आणि सोमवारपासून हवाई वाहतूकही सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी असे जाहीर केले होते. मात्र महाराष्ट्राच्या संचारबंदी नियमांमध्ये १९ मे नंतर काहीच सुधारणा झाल्या नसून ३१ मे पर्यंत विमान वाहतूक प्रतिबंधित करण्यात … Read more

उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक जाऊन दाखल केला उमेदवारी अर्ज

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. 21 मे रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब जाऊन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी … Read more

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी दवाखान्यात आता प्रायव्हेट डाॅक्टरांना ड्यूटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी डॉक्टरांबाबत महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने असे म्हटले आहे की आता खासगी डॉक्टरही सरकारी रुग्णालयात बसतील. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक (मुंबई) म्हणाले की आम्ही आता खासगी डॉक्टरांना कोरोना विषाणूच्या रुग्णांवर १५ दिवस उपचार करण्यास सांगितले आहे. We’ve asked all private doctors, who are … Read more

उद्धव ठाकरेंवरचं संकट टळलं; निवडणूक आयोगाची विधान परिषद निवडणुकीला परवानगी

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येत असून राज्यात विधान परिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना आयोगाने कोरोनाबाबत काळजी घेण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय … Read more

राज्यपालांचे निवडणुक आयोगाला पत्र; विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी केली निवडणुकीची मागणी

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाला एक पत्र लिहिले असल्याचे समजत आहे. कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाला महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हि जमेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.  राज्यातील विधानपरिषदेच्या ९ सदस्यांचा कालावधी २४ एप्रिल रोजी … Read more

देव मंदिरात नाही तर डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांत आहे – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । आज अक्षयतृतीयाचा सण असूनही सर्व बाजारपेठ ओस आहेत. देशभरातील लॉकडाउनमुळे सर्व मंदिरं बंद आहेत. आज देव मंदिरात नाही तर डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यात आहे. तेव्हा कोणीही प्रार्थना करण्यासाठी घराबाहेर पडू नका असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घरातच जे काही असेल ते करण्याचे आवाहन केले. अक्षयतृतीयेनियमित्त ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या … Read more