तुम्ही फक्त आवाज द्या! हा ‘सिंघम’ खाकी घालून रस्त्यावर उतरेल – अजय देवगण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाउन लागू आहे. हा लॉकडाउन पाळला जावा म्हणून राज्यातील पोलीस जीव धोक्यात घालून दिवसरात्र रस्त्यावर पहारा देत आहे. दरम्यान, मुंबईच्या अनेक भागात कोरोना फैलावत असताना मुंबई पोलिसांवरील ताण वाढतो आहे. मात्र अशाही परिस्थिती आपल्या कर्तव्याची जाणीव ठेऊन ते रस्त्यावर आपली जबाबदारी पार पडत आहेत. अशा मुंबई पोलिसांचे … Read more

ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवला; महाराष्ट्रात पण वाढणार काय?

वृत्तसंस्था । देशभरात सध्या एकाच विषयावर चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लॉकडाउन लांबणार कि संपणार? करोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यावर विचार सुरू असतानाच ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशामध्ये ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू असणार आहे. तेलगांनानंतर लॉकडाउन वाढवणार ओडिशा … Read more

बारावीची पुस्तकं आता बालभारतीच्या वेबसाईटवर; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारचा निर्णय

मुंबई । राज्यात लॉकडाउनमुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं महतवाची घोषणा केली आहे. बारावी अभ्यासक्रमाचे सर्व शैक्षणिक साहित्य ‘पीडीएफ’ स्वरुपात बालभारतीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे साहित्य विद्यार्थ्यांना डाऊनलोड … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. हळूहळू स्थिती पूर्वपदावर येते आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन वाढवला पाहिजे, असं जवळपास सर्वच विरोधी पक्षीय नेत्यांचं म्हणणं आहे. ज्या काही सूचना मिळत आहेत, त्यानुसार लॉकडाऊन वाढवण्याच्या … Read more

करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?

नवी दिल्ली । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या लॉकडाउनमुळे देशातील बरेच व्यवहार ठप्प आहेत. याचा मोठा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाउनचा सर्वात मोठा फटका हा देशाअंतर्गत रोजगाराला बसणार असल्याचं सीआयआय केलेल्या एका सर्व्हेक्षणात म्हटलं गेलं आहे. कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाउनमुळे देशातील ५२ … Read more

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. अजून सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गेल्या १४ दिवसांपासून घरात असलेले नागरिक लॉकडाउन संपण्याची वाट बघत आहेत. मात्र, देशातील लॉकडाउन शिथिल करण्यात येणार असला, तरी महाराष्ट्रातील लॉकडाउन आणखी लांबणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच तसं स्पष्ट केलं आहे. “१५ एप्रिलपासून लॉकडाउन संपूर्णपणे … Read more

१४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटू शकतो, पण..- राजेश टोपे

मुंबई । सध्या राज्यात किंवा देशात सर्वांना एकच प्रश्न पडला आहे. तो म्हणजे येत्या १४ एप्रिलनंतर लॉकडाउन उठणार का? या प्रश्नाचे उत्तर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. १४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटवण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे अशी माहिती टोपे यांनी दिली. मात्र, सरसकट सर्व ठिकाणावरून लॉकडाउन हटविणे केंद्र आणि राज्य सरकारला शक्य … Read more