लॉकडाऊनमुळे राज्यात MCA CET 2020 प्रवेश परीक्षा पुढे ढकलली

मुंबई । करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेलं लॉकडाउन आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढल्यानं अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा कधी होणार हा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. कोरोनामुळं संपूर्ण प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक कोलमडल आहे. याच थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार आहे. अशा संभ्रमाच्या परिस्थितीत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र … Read more

वाधवान कुटुंबाला पकडून ठेवा, सीबीआयची सातारा प्रशासनाला सूचना

मुंबई । बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान कुटुंब लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रवासात त्यांना कोणीही अडवलं नाही. कारण राज्याचे गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला आलिशान गाडीतून प्रवास केला. या पत्रात गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाचा उल्लेख ‘फॅमिली फ्रेंड’ असा केल्याने एकच खळबळ माजली होती. काल दिवसभर … Read more

लॉकडाउन तोडण्यात पुणेकर आघाडीवर

पुणे । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील पुणे-मुंबईसह अनेक शहर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. मात्र, अशा स्थितीतही लॉकडाउन भंग करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाल्यानंतर २४ मार्च पासून ते ८ एप्रिल या कालावधीत २७ हजार ४३२ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात पुणे शहर … Read more

धक्कादायक! देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण एकट्या मुंबईत

मुंबई । देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद एकट्या मुंबईत झाली आहे. तर राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी निम्मे मुंबईतील आहेत. त्यामुळं मुंबईच्या पर्यायानं राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६९० वर पोहोचला असून त्यापैकी ४३३ कोरोनाग्रस्त एकट्या मुंबईत आहेत. मुंबईतील वरळी, धारावी, जोगेश्वरी, ग्रॅण्ट रोड ही ठिकाण कोरोनाची हॉटस्पॉट आहेत. आजच्या दिवसातील सर्वात गंभीर … Read more

१४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटू शकतो, पण..- राजेश टोपे

मुंबई । सध्या राज्यात किंवा देशात सर्वांना एकच प्रश्न पडला आहे. तो म्हणजे येत्या १४ एप्रिलनंतर लॉकडाउन उठणार का? या प्रश्नाचे उत्तर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. १४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटवण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे अशी माहिती टोपे यांनी दिली. मात्र, सरसकट सर्व ठिकाणावरून लॉकडाउन हटविणे केंद्र आणि राज्य सरकारला शक्य … Read more