अबब… चक्क शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्षाच्या 50 हजारांवरच चोरट्याने मारला डल्ला (Video)

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या स्टेशन चौक येथे शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्षाच्या सदऱ्यातील रकमेवरच अज्ञात चोरटयांनी डल्ला मारला. पॅन्टच्या खिशात ठेवलेली पन्नास हजार रुपयांचा बंडल हातोहात लंपास केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली होती. सदरचा प्रकार हा २६ मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते (वय ४५ … Read more

पोलीस असल्याचे सांगून वृद्धेला लुटले, 3 लाख 50 हजारांचे दागिने चोरट्यांकडून लंपास

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पोलीस असल्याची बतावणी करीत जत शहरातील मंगळवार बाजार पेठेत राहणार्या श्रीमती सूरजदेवी मिश्रीमल ओसवाल यांच्या अंगावरील साडेसहा तोळ्याचे तीन लाख पन्नास हजार किमतीचे दागिने हातोहात लंपास करण्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. या दिवसा ढवळ्या चोरीत तिघा अज्ञात चोरट्यांनी अत्यंत विश्वासाने या वृध्द महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केल्याने खळबळ … Read more

धक्कादायक !!! मॉलमध्ये खरेदी करणाऱ्या महिलेवर सर्वांसमोर बलात्कार करण्याचा प्रयत्न

फ्लोरिडा । आजच्या काळात महिलांना कुठेही सुरक्षित वाटत नाही. घर असो वा बाहेर, महिलांना सर्व प्रकारच्या छेडछाडीला सामोरे जावे लागते. स्त्रियांना कमी लेखणाऱ्या पुरुषांना आता उघड्यावर त्यांची छेडछाड करण्याची देखील भीती राहिलेली नाही. म्हणूनच फ्लोरिडामधील मियामी येथील एका शॉपिंग मॉलमध्ये इतर अनेक लोकांच्या उपस्थितीत तेथे खरेदी करणाऱ्या महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. फ्लोरिडामधील … Read more

दुकानावर छापा टाकून बेकायदेशीर रित्या साठवलेला 88 हजारांचा गुटखा पोलिसांकडून जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शिराळा तालुक्यातील चरण येथे एका दुकानात विक्रीस प्रतिबंध असलेला, बेकायदेशीर रित्या साठवून ठेवलेला गुटख्याचा साठा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणी लक्ष्मण आनंदा डुबल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या दुकानातून विमल, माणीकचंद गुटखा आणि सुगंधी तंबाखू असा एकूण ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक … Read more

मंगळवेढा येथील खुनाचा सांगली पोलिसांकडून उलगडा, प्रेयसीच्या सांगण्यावरून तिच्या पतीचा तिघांनी केला होता खून

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे प्रेयसीच्या सांगण्यावरून तिच्या पतीचा प्रियकराने साथीदारांच्या मदतीने खून केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी गावामध्ये घडली होती. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आत्महत्येचा बनाव केला होता. या प्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तिघांना सापळा रचून अटक केली. प्रशांत अशोक पवार, शाहरुख रफिक शेख आणि अजय परशुराम घाडगे अशी अटक … Read more

घरफोडी करणाऱ्या चौघांना पोलिसांकडून अटक, 4 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरजेतील सुंदरनगर येथे राहणारे अरूण जयवंत जगताप यांच्या बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 6 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. गांधी चौकी पोलिसांनी जलदगतीने तपास करून 2 लाख 40 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली 2 लाख रूपये किंमतीची रिक्षा असा एकूण 4 लाख 40 हजार रूपयांचा रूपयांचा मुद्देमाल … Read more

हॉटेलच्या रूममध्ये गर्लफ्रेंडसोबत गेला अन् काही दिवसांनी पॉर्न साइटवर व्हिडिओ पाहताच….

बेंगळुरू । कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून सायबर गुन्ह्याची एक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे की, त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच्या हॉटेल रूम मधील व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अशोक नगर येथील एका 25 वर्षीय बीपीओ कर्मचाऱ्याने 24 … Read more

कॉपरचे साहित्य चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक करत पोलिसांकडून लाखोंचा जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून कॉपरचे साहित्य चोरी करून त्यातील तांबे काढून विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. या प्रकरणी पोलिसांनी कुपवाड येथील अहिल्यानगर येथे सापळा रचून रेकॉर्डवरील तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १०१ किलो वजनाचे कॉपर असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दत्तात्रय … Read more

BCCI मध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 10 जणांना 5.50 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्रातील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की,”आरोपी मनीष पेंटर हा मुंबईचा रहिवासी असून तो फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.” पोलिस उपायुक्त (गुन्हे) सुरेश मेंगडे यांनी सांगितले … Read more

किराणा मालाच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला, दुकानातील जीवनावश्यक वस्तूंचा मुद्देमाल गायब

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरजेतील तानाजी चौक, हरीमंदिराजवळ आवटी उद्यानासमोर असलेल्या अमोल अरूण ऐतवडे यांच्या अमोल ट्रेडिंग कंपनी या किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरी झाली असून दुकानातील ६ हजार रूपयांची चिल्लर व दुकानातील साहित्य असा एकूण ६० हजार रूपयांचा मुद्देमाल गायब झाला आहे. ऐतवडे यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली. अमोल ऐतवडे हे … Read more