लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेचे लैंगिक शोषण,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल  

 शहरातील रेल्वस्टेशन परिसरातील पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लॉजमध्ये नेऊन लैगिंक शोषण करणाऱ्या नराधमाविरोधात वेदांतनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदविला. व्यवसायात दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून या महिलेचे २ लाख रुपये घेऊन फसवणूकही केल्याचेही समोर आले आहे. शेख जुबेर शेख अब्दुल अजीज असे या आरोपीचे नाव आहे.

अमरावती शहरात तरुणाला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न, हल्लेखोर आरोपी अटकेत

अमरावती शहरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाला चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आनंदनगरात घडली. अभिजित ऊर्फ गोलू अरुण पार्डीकर असे जखमीचे नाव आहे. अरुणवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात हल्लेखोर आरोपी शंकर गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सराफा दुकानफोडीचा मास्टरमाईंड पोलीसांच्या जाळ्यात; परतवाडा पोलिसांची कारवाई

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका सराफा दुकानात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात २ महिन्यांनी यश आलं आहे. ६० ते ७० लाख रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ करून पळालेल्या कुख्यात आरोपी पंकजसिंह दुधानी याला परतवाडा पोलीसांनी मुंबईतून अटक केलेली आहे.

औरंगाबाद सेक्स रॅकेट प्रकरणाला नवे वळण; ग्राहकांना तरुणींची छायाचित्रे पाठविणारा अटकेत

बीड बायपास परिसरातील राजेशनगर येथे घडलेल्या औरंगाबाद सेक्स रॅकेट प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अटक करण्यात आलेल्या मॉलप्रमुख आणि सहायक व्यवस्थापकांना मोबाईलवर तरुणींची छायाचित्रे पाठविणाऱ्या दलालास अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे. मनोज गोविंदराव जाधव, (४०, रा. दहीहंडे गल्ली, चिकलठाणा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या अजून मुळापर्यंत जाण्यास पोलिसांना यश मिळणार आहे.

कुंटणखान्याच्या दलालांना ग्राहक पुरवणारा अटकेत; पोलिसांची तडकाफडकी कारवाई

औरंगाबाद शहरातील बीड बायपास रोडवरील राजेशनगर आणि यशवंतनगर भागातील कुंटणखान्याच्या दलालांना ग्राहक पुरविण्याचे काम करणाऱ्या एजंटच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. मनोज जाधव असे संशयिताचे नाव असून, तो ग्राहकांनाही महिलांचे फोटो पाठवत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कुंटणखान्यावर ७ डिसेंबरला छापा टाकून चार दलाल आणि ग्राहकांना ताब्यात घेतले आहे.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

ताब्यात घेतल्यानंतर या महिलेला मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून ही महिला काही कामानिमित्त मंत्रालयात गेले अनेक दिवस येरझऱ्या घालत होती

कराडमध्ये प्रीतिसंगमा शेजारीच बेकायदा वाळू उपसा! प्रशासन ढिम्म

जिल्ह्यातील महत्वाचे प्रेरणास्थान असलेल्या कराड येथील प्रीतिसंगमाजवळील कृष्णा नदी पात्रातच बेकायदा वाळू उपसा केला जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

या राज्यात आता बलात्कारातील आरोपीला २१ दिवसांत फाशी; दिशा विधेयक मंजूर

तेलंगणामध्ये काही दिवसांपूर्वीच एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केला. या पार्श्वभूमीवर बलात्कार प्रकरणांमध्ये वेगानं न्याय दिला जावा अशी मागणी जोर धरू लागली.

दाऊद गँगच्या नावाने साताऱ्यातील महिला डॉक्टरला खंडणीचा मेसेज

साताऱ्यातील एका महिला डॉक्टरला अनोळखी मोबाईल नंबरवरुन खंडणीसाठी धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. एका मेसेजमधून ८० हजार रुपये खंडणीची रक्कम न दिल्यास डॉक्टरसह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. हा मेसेज अज्ञात व्यक्तीने दाऊद गँगच्या नावाने इंग्लिश मधून पाठवला आहे.

‘रेप इन इंडिया’वर राहुल गांधी ठाम; मोदींच्या ‘दिल्ली रेप कॅपिटल’ विधानाचा दाखला

Rahul gandhi supreem court

उन्नाव आणि हैद्राबाद मध्ये घडलेल्या अमानुष घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. याच मुद्द्याला धरून आज संसदेत मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर भाष्य करताना रेप इन इंडिया असे वाक्य वापरले आहे.