दरोड्यातील तब्बल 2 कोटीचा मुद्देमाल सुरक्षित : वडगाव जिल्हा बॅंक चोरी प्रकरणात 3 युवक अटकेत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव तालुक्यातील वडगांव जयराम स्वामी येथे दि. 7 रोजी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खिडकीचे लोखंडी गज, कापून बँकेचे आतमध्ये प्रवेश केला. तसेच गॅसकटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. सदर बाबत माहिती प्राप्त होताच तात्काळ औंध पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल … Read more

विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकामुळे गावागावात राजकारण तापले

Election

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर आता विकास सेवा सोसायटीच्या निवडणुका लागल्या आहेत. विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकामुळे गावा- गावातील व भावकी- भावकीतील राजकारण चांगलेच तापलेले आहे. पाच वर्षांनी होणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची तयारी आतापासून सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र जिल्हा बॅंकेच्या ठरावासाठी व आपल्यालाच मत मिळावे, यासाठी नेत्यांनी चांगलीच कंबर कसलेली … Read more

भाजपचे आमदारकीचे तिकीट नाकारणारा, मी जिल्हा बॅंकेत स्वाभिमानाने जाईन : सुनिल माने

कोरेगाव | जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी राजकारण झाल्याने शेवटच्या क्षणी पक्षाकडून मला अर्ज मागे घेण्यास सांगितले. पक्षावर असलेल्या विश्वासाने मी क्षणाचाही विचार न करता अर्ज मागे घेतला. सध्याच्या विरोधी (भाजप) पक्षाकडून आमदारकीसाठी पक्षाची तिकीट देण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढवण्याचे काम प्रामाणिकपणे व निष्ठेने केले. तेव्हा माझ्यावर राजकारण करून … Read more

सातारा जिल्हा बॅंक : नविन अध्यक्ष, उपाध्यक्ष 6 डिसेंबरला ठरणार

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणक निकालानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी दि. 6 डिसेंबरला होणार आहे. याबाबतचे पत्र बँकेने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. बॅंकेत विद्यमान अध्यक्ष भाजपचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचेच नाव अध्यक्षपदासाठी गृहीत धरले जात आहे. तर या पदासाठी राष्ट्रवादीचे नितीन पाटील हेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर उपाध्यक्ष पदासाठी पाटण … Read more

कोरेगाव राष्ट्रवादीची मागणी : DCC बॅंकेचे अध्यक्षपद नितिन पाटील यांना द्यावे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा बॅंकेत सहकार पॅनेलमधील बिनविरोध संचालक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नितिन पाटील यांना अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केलेली आहे. कराड येथे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेवून मागणी करण्यात आली. सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकारमंत्री पाटील … Read more

शशिकांत शिंदे तुमचे आव्हान स्वीकारले, आता दोन हात करण्याची तयारी ठेवा : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी हिशोब चुकते करण्याची भाषा शशिकांत शिंदे यांनी करू नये. मी तुमचे आव्हान स्वीकारले आहे. यापुढे दोन हात करण्याची तयारी ठेवा. तुमच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका. मुंबईच्या गुंडगिरीला सातारी हिसका सोसणार नाही. यापुढे तुमची दहशत, गुंडगिरी जावळी तालुका चालू देणार नाही. तुमच्या पराभवाला तुमचा जावळीतील अनावश्यक हस्तक्षेपच जबाबदार आहे, असे … Read more

सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : सोसायटी गटातील जिरवाजिरवीच्या राजकारणात राष्ट्रवादी बॅंकफूटवर

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील सातारा जिल्ह्यात जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे संचालक जास्त निवडूण गेले आहेत. तरीसुध्दा जिरवाजिरवीच्या राजकारणात राष्ट्रवादी बॅंकफूटवर काही प्रमाणात गेलेली आहे. सध्या पक्षनिहास बलाबल पाहिल्यास राष्ट्रवादी पक्ष- 15 भाजप- 3, शिवसेना- 2, एक बंडखोर राष्ट्रवादी- 1 असे दिसत आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी सोसायटी गटातील लढती झाल्या त्यामध्ये केवळ 1 ठिकाणीच … Read more

माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार; थेट आरोप करत शशिकांत शिंदेंनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांना केलं ‘हे’ आवाहन

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्या नंतर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीच शिंदेंचा गेम केला अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेकही केली. या सर्व पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेत शिंदे यांनी भाजप आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर निशाणा साधला. … Read more

जेव्हा दुसऱ्या साठी आपण खड्डा खोदतो तेव्हा ….; नरेंद्र पाटलांची शिंदेंवर खोचक टीका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्या नंतर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नरेंद्र पाटील यांना विचारले असता जेव्हा दुसऱ्या साठी आपण खड्डा खोदतो तेव्हा आपणही कधी ना कधी त्या खड्ड्यात पडतो असा टोला त्यांनी लगावला. माथाडी नेते माजी आमदार … Read more

शशिकांत शिंदे यांचा पराभव घडवून आणण्यात राष्ट्रवादीच्याच लोकांचा हात; शिवसेनेचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर साताऱ्यात राजकीय खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीच शशिकांत शिंदेंचा गेम केला अशी चर्चा रंगली होती. यानंतर शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक केली. या संपूर्ण घडामोडी वर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाष्य केले आहे. शशिकांत शिंदे यांचा पराभव घडवून आणण्यात … Read more